Site icon InMarathi

सलमानचा “भारत”: पाहावा की पाहू नये, हे वाचा आणि ठरवा!

TimesSouth.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारत हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता तो म्हणजे त्याच्या नावामुळे! पण शेवटी हा चित्रपट ५ जूनला प्रदर्शित झाला.

जाणून घेऊयात भारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा कितपत पूर्ण करतो ते..

सलमानच्या भारत या चित्रपटामध्ये भली मोठी स्टार कास्ट आहे. कैटरीना कैफ, तब्बू , दिशा पठणी, जॉकी श्राफ, सुनील ग्रोवर, सोनाली कुलकर्णी या सारखे दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.

अली अब्बास जफर यांनी या पूर्वी सलमान बरोबर सुलतान आणि टायगर जिंदा है हे चित्रपट केले आहेत.

 

socialsamosa.com

या चित्रपटामध्ये आपल्याला सलमानच अश्या रूप दिसत ज्यामुळे तुमचे डोळे पानावतील. सलमानच एक असं रूप जे आपण नेहमी पाहत नाही.

जेव्हा सलमान रडतो कट्टर सलमान चाहत्यांचे डोळे न पाणवता राहूच शकत नाहीत.

अली अब्बास यांनी सलमानच्या याच ताकदीचा वापर योग्य केला आहे. जेव्हा या चित्रपटामध्ये मार्मिक क्षण आला आहे तेव्हा या चित्रपटाने पैसा वसूल करून टाकतो.

या चित्रपटामध्ये सलमानचा एक लहान मुलापासून ते एका वृध्दपर्यंतचा प्रवास दाखवला आहे.

 

ibtimes.com

एक लहान मुलगा, जो आपल्या वडिलांपासून दुरावताना त्यांना दिलेल्या वचनाला आपल्या जीवनाचं सर्वस्व मानतो आणि त्याला पूर्ण करण्यासाठी तो नेहमी अग्रेसर असतो.

समस्या ही आहे की त्याचं प्रत्येक काम हे सुपरमॅन शैलीतच असतं. या नायकांच्या आयुष्यात सामान्य काहीही नाही. सर्व काही larger then life!

त्यामुळे चित्रपट पाहताना गोंधळून जायला होतं. सुनील ग्रोवरचं पात्र खूपच मजेशीर आहे. त्याने त्याला योग्य न्याय दिला आहे.

 

hindustantimes.com

कैटरिनाचं काम साधारण वाटतं. बाकीचे कलाकारही काही विशेष वाटत नाहीत. परंतु जॉकी श्राफ स्क्रीनवर कमी वेळ दिसत असले तरी देखील विशेष वाटतात.

उल्लेखनीय म्हणजे सलमानची दुरावलेली बहीण! तिने फक्त दोनच सीन मध्ये छाप सोडली आहे.

spoiler नाही दयायचा म्हणून इथे त्यांच्या नावाचा उल्लेख नाही करत. पण हे मात्र नक्की त्या सीन मध्ये तुमचे डोळे नक्की पाणावतील.

सोनाली कुलकर्णी सलमानची आई बनली आहे. याबद्दल काय बोलायचं? हे बॉलीवूड वाले काय करतील याचा नेम नाही.

 

Charmboard.com

गाण्याचं बोलायचं झालं तर, गाणे काही खास नाहीत. जिथे गरज नाहीये तिथे गाणे घुसवल्याचं दिसून येतं. चित्रपट आरामात २०-३० मिनिटे कमी होऊ शकला असता.

पाश्चात्य साहित्य आणि चित्रपट जसे जागतिक महायुद्धांच्या कथांनी भरलेले आहेत त्याचप्रमाणे, हिंदी, उर्दू आणि पंजाबी साहित्य भारताच्या फाळणीच्या घटनने व्यापून टाकलेले असते.

चित्रपटामध्ये असलेला भारत- पाक फाळणीचा सीन लक्षणीय आहे.

अली अब्बास जफर यांनी ऐतिहासिक क्षणाचा वापर करून कथा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

भारत पाक फाळणीही दुःखद अश्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनांनी भरलेली आहे. हा चित्रपट आपल्याला गदर आणि भाग मिल्खा भाग या चित्रपटांची आठवण करून देतो.

पण सलमान खानच्या superstardom च्या फायद्यासाठी कथेचा बळी दिला आहे असं सारखं वाटत राहतं.

सलमानचे फॅन असाल तर तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल.  तुम्हाला भारत कसा वाटलं हे आम्हला कंमेंट्स मध्ये कळवा..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version