Site icon InMarathi

भारतातील या ११ ठिकाणी फिरायला जाण्यासाठी लागते सरकारची परवानगी..!

sentanalise featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नवनवीन  ठिकाणी जायला, निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेल्या समृद्धीचा आनंद घायला, फिरायला, नवे लोक, नवी संस्कृती जाणून घ्यायला, तिथल्या विशिष्ट खाद्यपदार्थांची चव चाखायाला कुणाला बरे आवडणार नाही!

भारतीय संविधानाच्या कलम १९ नुसार भारतातील नागरिकांना संपूर्ण भारतात संचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.

तरीही देशात काही अशी ठिकाणे आहेत जिथे पर्यटनासाठी जाताना तिथल्या स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. पंजाब

पंजाब म्हणताच आपल्या नजरेसमोर उभे राहते….

 

 

पगडी घातलेला रांगडा आणि दिलदार पंजाबी माणूस, गव्हाची डुलणारी हिरवीगार शेती, गुरु नानकदेव यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेला शिखांचा नवा भक्ती संप्रदाय, लाल लजपतराय ते भगतसिंग यांसारखे देशासाठी प्राणाची बाजी लावणारे वीरपुत्र, फाळणी नंतरचा रक्तरंजित इतिहास, अशा कित्येक बऱ्या-वाईट संस्कृतीचे संचित घेऊन उभा असलेला पंजाब पर्यटनाच्या दृष्टीनेही तितकाच महत्वाचा आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर झालेल्या फाळणीत पंजाबचे विभाजन झाले.

या प्रदेशाचा काही भाग पाकिस्तानमध्ये तर काही भाग भारतात राहिला. पाकिस्तानला लागून असलेली पंजाबची जी बॉर्डर आहे तिथे जाण्यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव बी.एस.एफ.ची परवानगी घ्यावी लागते.

हा भाग सोडल्यास उर्वरित पंजाबमध्ये तुम्ही कुठेही पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटू शकता.

२. हिमाचल प्रदेश

हिमालयाच्या कुशीत वसलेले राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश. समुद्रसपाटीपासून ठराविक उंचीवर हे राज्य वसलेले असल्याने इथे हवामानातील अनेक बदल एकाचवेळी अनुभवता येतात.

कुठे वर्षभर बर्फ पडत असतो तर, कुठे तापमान वाढलेले असते.

 

 

देशातील कुलू, मानली, शिमला यासारखी प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे याच राज्यात येतात. इथल्या नद्यांना बारमाही पाणी असते.

निसर्गाने नटलेल्या या पहाडी भागात पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय आहे. हिमाचलच्या परांग-ला ट्रेकवर जाण्यासाठी तेथील काजाच्या एस.डी.एम कडून परवनागी घ्यावीच लागते.

३. उत्तराखंड

देशाच्या उत्तर भागत वसलेले, तिबेट आणि नेपाळ अशा दोन शेजारी राष्ट्रांशी जोडून घेणारे राज्य म्हणजे उत्तराखंड.

हिमालयातून उगम पावणाऱ्या  गंगा आणि यमुना या भारतातील बारमाही पाणी असणाऱ्या  दोन मोठ्या नद्या याच प्रदेशातून वाहतात.

 

 

हिंदू धर्मात पवित्र समजली जाणारी, केदारनाथ आणि बद्रीनाथ ऋषिकेश यासारखी तीर्थक्षेत्रे आणि नैनिताल, अलमोडा, भीमताल यासारखी पर्यटन स्थळे, तसेच प्रसिद्ध जिम कॉर्बेट उद्यान देखील इथेच आहे.

इथे अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे परवानगी शिवाय तुम्ही प्रवास करू शकत नाही.

निलोंगला जाण्यासाठी, माणा, मुन्स्यारी आणि धारचुलापासून पुढे जाण्यासाठी सरकारी परवानगी घ्यावी लागते.

===

हे ही वाचा – परदेशातही भारतीयांच्या नावाने आहेत ही ठिकाणं! ५ वं आणि १० वं ठिकाण माहित नसेल!

===

४. लक्षद्वीप

केंद्रशासित प्रदेशापैकी एक असणारे बेट म्हणजे लक्षद्वीप. हा छोट्या छोट्या छत्तीस बेटांचा मिळून एक समूह आहे. ज्यापैकी फक्त ६ बेटांवर भारतीय पर्यटक जाऊ शकतात. परदेशी पर्यटकांना फक्त २ बेटांवर जाण्याची परवानगी आहे.

 

 

येथील प्रदूषण मुक्त हवा, सागराचा तळही दिसेल असे पारदर्शक पाणी, वरून डोकावणारी सागरनिळाई, उंच उंच नारळाची आणि पामची हिरवीगार झाडे, या सगळ्या गोष्टी पर्यटकांना भुरळ घालतात.

पर्यटनाच्या दृष्टीने भारत सरकार या बेटांचा विकास करण्यावर भर देत आहे.

५. अंदमान निकोबार

बंगालच्या खाडीमध्ये हिंद महासागरात असलेले हा अनेक बेटांचा समूह आहे. यामध्ये सुमारे ३०० बेटांचा समावेश आहे. पर्यटन हा तेथील मुख्य व्यवसाय आहे.

अत्यंत रमणीय आणि पर्यावरण स्नेही असे हे ठिकाण आहे. निसर्गाचे वरदहस्त लाभलेल्या या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जैवविविधता पाहायला मिळते.

 

 

भारतीय पर्यटकांना अंदमान बेटाला भेट द्यायची असेल तर, परवानगी लागत नाही पण, आदिवासी प्रदेशाला भेट द्यायची असेल तर पोर्टब्लेअरच्या उपयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. परदेशी पर्यटकांना मात्र अंदमान भेटीसाठी परवानगी घ्यावी लागते.

६ सिक्कीम

भारताच्या पूर्वेला असणारे हे राज्य नेपाळ, भूतान, तिबेट, चीन अशा अंतरराष्ट्रीय सीमांनी वेढलेलं आहे. नथुला पासून भारताची सरहद्द संपते आणि चीनची सरहद्द सुरु होते.

नथुला दरी, गुरडोंगमार तळे, झिरो पोईंट अशी ठिकाणे पहायची असल्यास सरकारची परवानगी घ्यावी लागते.

 

 

प्राचीन काळातील प्रसिद्ध सिल्क रूट(रेशीम मार्ग) याच राज्यातून जातो.

प्रदूषण विरहित पर्यावरण, निळ्याशार पाण्यात पडणारे हिमालयाचे प्रतिबिंब, प्राचीन संस्कृतीची साक्ष देणारी बौद्ध विहारे अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे सिक्कीममध्ये आहेत.

७. नागालँड

भारताच्या पूर्वेला असणारे हे राज्य पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे. नागा लोकांची भूमी म्हणून या राज्याला ओळखले जाते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या राज्यात पर्यटन करताना, दिवसा उजेडी आपल्या निवास स्थानी परतणे चांगले असते.

 

 

कोहिमा, डीमापूर, मोकोकचुंग, वोखा या प्रदेशात फिरण्यासाठी परवानगी मिळवणे आवश्यक असते.

===

हे ही वाचा – भारतातील ही “७” अद्भुत ठिकाणं बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नाही बसला तर नवल…!!

===

८. मिझोरम

मिझोरम हे राज्य भारताच्या ईशान्येला वसलेले आहे. येथील ऐझवाल, लुंगलेईव, चम्पैइ हि ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून घोषित केली आहेत. इथे जाण्यासाठी देखील तुम्हाला अंतर्गत परवानगी घ्यावी लागते. मिझोरम हे शेतीप्रधान राज्य आहे.

 

 

भौगोलिक दृष्ट्या पूर्व भारतातील हे सर्वात मोठे राज्य आहे. राज्याची राजधानी इटानगर येथे असून; इथे ‘इटा किला’ पाहायला मिळतो. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या राज्यामध्ये हिमालय डोंगर रांगातील अनेक उंच उंच शिखरे आढळतात.

येथील काही ठिकाणी पर्यटनासाठी जाताना सरकारची परवानगी आवश्यक आहे.

९. जम्मू काश्मीर

जम्मु-काश्मीर म्हणजे धरतीवरील स्वर्ग असे संबोधले जाते. निसर्गाच्या अद्भुत आविष्काराने सजलेली अनेक ठिकाणे येथे पाहायला मिळतात.

बर्फाच्छादित पर्वत शिखरे, झऱ्यातून वाहणारे निळेशार पाणी, पौराणिक वास्तुकलेची साक्ष देणारी मंदिरे असा कितीतरी खजाना या खोऱ्यात  लपलेला आहे.

 

 

वारंवार होणारे दहशतवादी हल्ल्याने थोडीफार हानी झाली असली तरी, आजही या राज्याच्या निसर्गाची पर्यटकांना भुरळ पडते. या राज्यात जाण्यासाठी सरकारी परवानगी आवश्यक आहे.

१०. गुजरात

अहमदाबाद, पोरबंदर, गांधीनगर, भावनगर अशी अनेक प्रयत्न स्थळे गुजरात मध्ये पाहायला मिळतात. याशिवाय अनेक धार्मिक स्थळे आहेत. ओक्टोंबर ते मार्च या दरम्यान या राज्यात फिरण्यास काळ अनुकूल असतो.

 

 

गुजरातच्या सीमेचा काही भाग हा पाकिस्तान सीमेशी लागून असल्याने या भागात फिरण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे.

११. देशातील सर्व राष्ट्रीय उद्याने

राष्ट्रीय उद्याने हि राष्ट्राची संपत्ती आहे. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे राष्ट्रीय उद्याने आहेत. जिथे दुर्मिळ होत चाललेल्या वन्यजीवांचे रक्षण केले जाते. त्यांना भेट देण्यासाठी सरकारची परवानगी काढणे आवश्यक आहे.

 

 

विविध राज्यातील मिळून भारतात एकूण ९६ राष्ट्रीय उद्याने आहेत.

या सर्व ठिकाणी तुम्हाला पर्यटनासाठी जायचे असल्यास तुम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लागते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – जगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version