Site icon InMarathi

वसीम अक्रमच्या प्रश्नावर सचिनच्या ‘बॅट’ ने दिले तडाखेबाज उत्तर!

Sachin IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेट हा आपल्या देशातील सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेट न आवडणारा भारतीय विरळाच.

आपल्या देशात अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू जन्माला आले आणि त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला.

जसं क्रिकेट हा खेळ आपल्याइथे लोकप्रिय आहे तसंच क्रिकेट च्या काही मजेशीर गोष्टी सुद्धा फेमस आहेत!

जसं कि ड्रेसिंग रूम मधलं संभाषण आणि गंमती जमती, क्रिकेट च्या मैदानावर होणाऱ्या शाब्दिक चकमकी या सगळ्याशी आपण परिचित आहोतच!

या शाब्दिक चकमकींचे आणि मैदानावर होणाऱ्या स्लेजिंग चे आपण सगळेच साक्षीदार आहोत. ऑस्ट्रेलियन टीम च स्लेजिंग तर आपल्याला चांगलंच ठाऊक आहे!

आणि ही गोष्ट काय आजची नसून कित्येक वर्षांपासून हे चालत आलं आहे, आणि हि गोष्ट चक्क क्रिकेट चा देव मानल्या जाणाऱ्या क्रिकेटपटू बरोबर सुद्धा झाली आहे ते सुद्धा त्याच्या सुरुवातीच्याच मॅच मध्ये, हो तुमच्या मनात अगदी योग्य नाव आलेलं आहे!

आणि हे नाव म्हणजे सचिन तेंडुलकर ह्याचे.

 

 

 

DNA india

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – 

 

क्रिकेटच्या सगळ्याच प्रकारात सचिन तेंडुलकर ह्याच्या नावावर जवळपास सगळेच विक्रम आहेत. जवळपास २२ वर्ष सचिन भारताकडून आंतराष्ट्रीय क्रिकेटखेळला. पण ह्या सगळ्या प्रवासाची सुरवात फार मजेशीर आहे.

१९८८ साली सचिन तेंडुलकरने मुंबई संघाकडून आपला पहिला रणजी सामना खेळला आणि पहिल्याच सामन्यात त्याने शतक मारून आपल्या आगमनाची वार्ता पूर्ण जगाला दिली.

ह्यावेळी सचिनचे वय होते फक्त १५ वर्षे. त्याच्या रणजी सामन्यातील धडाक्याने त्याला लगेचच भारतीय संघात जागा मिळवून दिली.

 

India TV

 

फक्त सोळा वर्ष वय असलेला सचिन आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला.

महत्वाची गोष्ट म्हणजे हा सामना त्याला भारताच्या बाहेर खेळायचा होता आणि तो सुद्धा पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्याच विरुध्द.

त्यावेळी पाकिस्तानचा संघ हा जगात सगळ्यात चांगले गोलंदाज असणारा संघम्हणून मानला जात होता.

इम्रान खान, वासिम अक्रम, वकार युनुस हे जगातले सगळ्यात घातक वेगवान गोलंदाज पाकिस्तानच्या संघात होते.

सचिनबद्दल त्यावेळी जागतिक क्रिकेटमध्ये फार चर्चा होती. 

पाकिस्तानच्या संघाने सुद्धा सचिन बद्दल खूप ऐकले होते. सचिन हा मुंबईचा सोळा वर्षे वयाचा अत्यंत प्रतिभाशाली खेळाडू होता हे पाकिस्तानच्या सुद्धा सगळ्या खेळाडूना माहित होतं.

 

circleofcricket.com

 

पण जेव्हा सचिन आपला पहिला सामना खेळायला मैदानात उतरला तेव्हा पाकिस्तानच्या सगळ्याच खेळाडूंना आश्चर्य वाटले.

ह्या प्रसंगाबद्दल त्यावेळी मैदानात असलेला पाकिस्तानचा गोलंदाज वासिम अक्रम ह्याने एका मुलाखतीत माहिती दिली.

अगदी बालिश चेहरा आणि लांब कुरळे केस असणारा सचिन हा आपल्या खऱ्या वयापेक्षा सुद्धा खूप लहान वाटत होता.

 

cricketcountry.com

 

वासिक अक्रमला तर तो चौदा वर्षांचा शाळेत जाणारा मुलगाच वाटला होता आणि तो जेव्हा मैदानात फलंदाजी करायला आला तेव्हा त्याला चिडवण्यासाठी वासिम अक्रमने त्याला विचारले की

तो खेळायला यायच्या आधी आपल्या आईला विचारून आलाय ना ?

 

hindi news

 

सचिनने ह्यावर काही उत्तर दिल नाही. मात्र ह्या आपल्या पहिल्याच मालिकेत सचिनने दाखवून दिले की तो येणाऱ्या काळात काय करणार आहे.

ह्या मालिकेत त्याने काही चांगल्या भागीदारी मध्ये सहभाग दिला आणि भारताला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले.

ह्या मालिकेतील एका सामन्यात तर सचिन फलंदाजी करत होता आणि समोर वकार युनुस आपल्या वेगवान गोलंदाजीने आग ओकत होता.

त्याचा एक उसळणारा चेंडू सरळ सचिनच्या नाकावर येऊन आदळला आणि त्याच्या नाकातून रक्त वाहायला लागले.समोरच्या बाजूला फलंदाजी करणारा नवज्योतसिंग सिद्धू काळजीने त्याच्या जवळ आला.

डॉक्टरने मैदानात येऊन थोडा प्रथमोपचार केला आणि त्याला आपल्याबरोबर बाहेर घेऊन जाऊ लागला.

आता भारत पराभवाच्या छायेत होता. तेवढ्यात सचिनने डॉक्टरला सांगितले की त्याला बाहेर जायचे नाही तर भारताला पराभवाच्या छायेतून बाहेर काढायचे आहे.

हे ही वाचा – 

 

sportzwiki

 

सिद्धू आणि डॉक्टर दोघेही हे ऐकून आश्चर्यचकित झाले. नाकावर पट्टी बांधून सचिनने आपल्या संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले.

नंतर सुद्धा सचिनने त्याला तोंडाने काहीही बोलणाऱ्याला कधीच तोंडाने उत्तर दिले नाही तर आपल्या फलंदाजीने त्याला गप्प केले. ह्यात अनेक जणांचे नाव येते.

झिम्बावेचा जलदगती गोलंदाज हेन्री ओलंगा एका सामन्यात सचिनला बाद केल्यानंतर त्याच्या समोर जाऊन खूप जोरात नाच केला होता आणि त्याला विचित्र हावभाव करून दाखवले होते.

 

Indiatimes.com

 

सचिन खाली मान घालून चुपचाप मैदानाच्या बाहेर गेला होता मात्र पुढच्या सामन्यात पहिल्या चेंडू पासून हेन्द्री ओलंगाची धुलाई सुरु झाली.

पूर्ण सामन्यात सचिनने त्याची एवढी धुलाई केली की त्यानंतर त्याने कधीच सचिनचा अपमान करायचा विचार सुद्धा केला नाही.

 

ntv

 

सचिनला त्याचे वय आणि लहान दिसणे ह्यावरून बोलणे वासिम अक्रमला सुद्धा फार महागात पडले आणि पुढची जवळपास १० ते १२ वर्षे सचिनने वासिम अक्रमची धुलाई केली.

वासिम अक्रमच्या शेवटच्या सामन्यात म्हणजे २००३ साली विश्वचषक सामन्यात सुद्धा सचिनने वासिम अक्रमची जोरदार धुलाई केली आणि भारताला एकहाती विजय मिळवून दिला.

पण शोएब अख्तर प्रमाणे वासिम अक्रम ने कधीच सचिन चा अपमान केला नाही!

वासिम अक्रम हा एक उत्तम खिलाडू वृत्तीचा खेळाडू असल्याने मैदानावरचे किस्से त्याने कधी जाहिरपणे उघड केले नाही किंवा सचिन ला त्याने कधीच कमी समजले नाही!

ज्याप्रमाणे सचिन शेन वॉर्नला स्वप्नात दिसायचा अगदी तसाच वासिम अक्रमला त्याची कारकीर्द संपेपर्यंत सचिनने त्याच्या बोलण्याची शिक्षा दिली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version