Site icon InMarathi

देवगडचा अस्सल हापूस आंबा ओळखण्याच्या खास टिप्स… चुकूनही विसरू नका!

mango im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हापूस आंबा..! आपल्याकडील उन्हाळ्याचं सर्वात मोठं आकर्षण!

 

MomJunction.com

रत्नागिरीचा हापूस रत्नागिरी टाईम्स वरून ओळखण्याचा पुणेरी विनोद ‘आम’ सिजन जसजसा जवळजवळ येऊ लागतो, तसतसा व्हाट्सअप्प आणि फेसबुकवर पुनरागमन करतो.

रत्नागिरी टाईम्सची रद्दी हे लक्षण रत्नागिरी/देवगडचा हापूस ओळखण्यासाठी खरंच उपयोगात आणलं जाऊ शकतं का?

– या प्रश्नाचं उत्तर एखादा पुणेरी दुकानदार सहज एखाद्या बॉक्समध्ये रत्नागिरी टाईम्सच्या रद्दीवर केसर वगैरे इतर जातीचे आंबे घालून देईल.

फक्त इतकंच नाही, तर फसवणुकीचा दुसरा प्रकार म्हणजे फळं लवकर मोठी व्हावीत पिकावीत, चांगली दिसावीत म्हणून त्यावर रासायनिक औषधं फवारली जातात. अशा औषधं मारलेल्या फळांचे तुमच्या मुलांवर, कुटुंबावर दुष्परिणाम होऊ शकतात.

 

mangifera.com

या औषधांच्या साईड इफेक्ट्स मध्ये अगदी पोटातल्या गॅससारख्या साधारण तक्रारींपासून ते कॅन्सरसारख्या दुर्दम्य आजारापर्यंत अनेक आजार समाविष्ट आहेत.

घाबरू नका. चांगले आंबे खरेदी करणं हे काही रॉकेट सायन्स इतकं कठीण नाही.

फक्त नैसर्गिक रित्या पिकलेल्या अस्सल हापूसची काही लक्षणं माहीत असली तर तुम्ही तुमच्या मुलांच्या, कुटुंबाच्या प्रकृतीशी न खेळता त्यांचे आवडते हापूस आंबे त्यांना खाऊ घालू शकता.

म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ‘हापूस’ची अशी काही लक्षणं ज्यामुळे तुम्ही हापूसची पारख रद्दीवरून नाही तर आंब्यावरूनच करू शकाल.

 

krishijagran.com

१) सुगंध :-

तुम्हाला नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अस्सल हापूसचा वास लांबूनही ओळखता येतो.

खोलीत असा एखादाच आंबा असला तरीही त्याचा तीव्र घमघमाट सुटतो आणि तुमच्याही नकळत तुम्ही आंबा तुमच्या हातात कधी घेता? हेच तुम्हाला कळत नाही.

 

Goldbelly.com

याउलट कृत्रिम पध्दतीने पिकवलेल्या फळांचा वास घेण्यासाठी तुम्हाला तो आंबा देठाशी खरवडावा लागतो.

हा हापूस आणि इतर प्रजातींमधला फरक आहे आणि हा फरक भारताच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केले आहे.

२) पातळ साल :-

 

realfoods.co.uk

हापूस जर नैसर्गिकरित्या पिकलेला असेल तर त्याची साल फक्त हातालाच नाही तर दिसायलाही पातळ असते.

याउलट औषध मारून पिकवलेला हापूस किंवा दाक्षिणात्य भारतातल्या प्रजातींच्या साली या जाड असतात. तसंच सालीवर डाग, सुरकुत्या नसाव्यात.

सुरकुत्या असलेला आंबा चांगला असतो असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे.

पण खरंतर सुरकुत्या हे फळ जास्त पिकल्याचं लक्षण आहे, त्यामुळे शक्यतो खरेदी करताना सुरकुत्या नसल्याचं पाहूनच खरेदी करावी.

जर फळावर सुरकुत्या पडूनही फळ हिरवं दिसत असेल तर ते कच्चं असतानाच काढलं जातं.

३) रंग :-

 

krushi.com

फळाच्या रंगाकडे लक्षपूर्वक बघितलं तरीही प्रमुख फरक जाणवू शकतो. जर आंबा कृत्रिमरित्या पिकवला असेल तर तो पिवळाधमक आणि एकाच रंगाचा वाटतो.

पण चांगल्या आंब्याच्या रंगात हिरवा आणि पिवळा(पिवळाधमक नाही, पिवळा आणि केशरी यांच्यामधला रंग) या दोन रंगांच्या विविध छटांचं मिश्रण स्पष्ट दिसतं.

४) आकार :-

 

plantogram.com

होय, आंब्याच्या आकारातही फरक असतो. नैसर्गिकरित्या पिकलेला अस्सल हापूस आंबा हा खालच्या टोकाशीसुद्धा गोलाकार आणि वजनदार असतो.

याउलट दक्षिणेतून किंवा गुजरातेतून आलेल्या आंब्यांचं खालचं टोक हे निमूळतं असतं.

५) गर :-

 

youtube.com

फळांचा राजा जर आंबा असेल तर आंब्यांचा राजा हापूस आहे; याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचं रसाळ असणं.

या आंब्याची फोड इतर आंब्याच्या फोडीपेक्षा मोठी आणि जास्त रसदार असते. याउलट इतर प्रजातींच्या आंब्यात फायबर(तंतूसदृश पदार्थ)चं प्रमाण अधिक असून गर कमी असतो.

६) चव :-

 

ourfont.com

हे या आंब्याच्या जगभर पसरलेल्या ख्यातीचे एकमेव कारण! वर्षातून फक्त दोन-चार महिने मिळणारा हा आंबा जितका नैसर्गिक चवीला तितकाच गोड आणि चवदार असतो.

याउलट इतर जातीच्या फळांमध्ये इतकं माधुर्य नसतं, त्यातले काहीतर आंबट असतात.

तर अश्या या आंबे खरेदी करतानाच्या, फसवणूक टाळण्याच्या आणि अस्सल हापूस निवडण्याच्या खास टिप्स. आंबे खरेदी करताना या टिप्स वापरा आणि तुमची होणारी फसवणूक थांबवा.

तुमच्या मुलांच्या, कुटुंबाच्या चेहऱ्यावर तुम्ही उत्तम आंबे निवडल्याचा आनंद पाहण्याचा अनुभव अवर्णनीय असेल, हो ना?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version