आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
चित्रपटांमधील हिरो सर्वाना माहीत असतात. जरी त्यांनी चित्रपटात सुंदर काम केलं तरीही आपल्याला त्याचं कौतुक असतं. हो,ना? पण असेही काही असतात जे आपल्या कर्तृत्वाने आपल्या जनमानसात उत्तुंग उंची गाठतात.
आप्तस्वकीयांसाठी सगळेच अनेक गोष्टी करतात परंतु अनोळखी लोकांसाठी धोका माहीत असताना प्राण धोक्यात घालणारे विरळाच
काश्मीर मधील स्थानिक टुरिस्ट गाईड ‘राउफ अहमद दार ‘असाच एक रिअल लाइफ हिरो.
त्याने राफ्ट उलटल्यावर बुडणाऱ्या पाच पर्यटकांचे जीव वाचवले परंतु तो स्वतःचा जीव काही वाचवू शकला नाही. कोण होता हा राउफ, काय आहे त्याचं कर्तृत्व, पाहूया आपण !
झालं असं, ‘राउफ अहमद दार’ हा अनेक गोष्टींमुळे संकटात अडकलेल्या कुलगाम मधील रहिवासी.
३२ वर्षाचा राउफ बी ए, बी एड होता तसेच इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालयातून राज्यशास्त्र (पोलिटिकल सायन्स ) ह्या विषयात एम् ए ची डिग्री घेत होता.
तो एक स्थनिक टूर गाईड म्हणूनही काम करीत असे. तो व्यावसायिक राफ्टरही होता.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
कलकत्त्याच्या काही पर्यटकानी आणि दोन परदेशी पर्यटकांनी त्याला राफ्टिंगसाठी विनंती केली. पहलगाममधील माऊरा राफ्टिंग पॉईंट येथून राउफबरोबर पर्यटकांनी राफ्टिंग सुरु केलं, परंतु थोड्याच वेळात जोराचा वारा सुरू झाला आणि ‘लिडर’ नदीच्या वेगवान प्रवाहामुळे राफ्ट बोट उलटली.
राउफ ने स्वतःचा जीव पोहून वाचवला. परंतु जेव्हा त्याने पाहिलं की काही पर्यटक पाण्यात बुडत आहेत आणि जीव वाचवण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे.
तेव्हा त्याने पुन्हा पाण्यात उडी मारली आणि त्यांचे जीव वाचवले. मात्र, ह्या प्रयत्नात वेगवान पाण्यामुळे त्याला स्वतः चे प्राण वाचवता आले नाही आणि तो आपल्या प्राणास मुकला.
–
- पुण्याच्या या आजीबाई ७५ व्या वर्षी काश्मीरचा खडतर ‘नथू-ला पास’चा ट्रेक करून आल्यात!
- जीव द्यायला निघालेल्या शेकडो जणांना वाचवणारा “खरा हिरो”!
–
राज्य आपत्ती प्रतिसाद फोर्स (SDRF) काही स्वयंसेवक आणि स्थानिकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढला आणि औपचारिकता पूर्ण करून तो कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.
त्याच्यामागे त्याचे आई वडील, भाऊ आणि बायको आहे, दोनच वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. त्याच्या मृत्यूनंतर समाजाच्या सर्व स्तरात हळहळ व्यक्त झाली.
अनेक नेत्यांनी, स्थानिकांनी त्यांच्या बहादुरीची प्रशंसा केली. नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्ला ह्यांनी ट्विट करुन त्याच्या शौर्याची
स्तुती केली.
“त्याने पर्यटकांचे जीव वाचवले परंतु स्वतः चा जीव वाचवू शकला नाही, अल्लाह त्याला जनन्तमध्ये सर्वोच्च जागा देवो.” असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.
राज्यपाल सत्य पाल मलिक ह्यांचे सल्लागार, खुर्शीद अहमद गणी, म्हणाले, “दार ने दाखवलेल्या शौर्याचा उचित मरणोत्तर सम्मान केला जाईल. त्याच्या कुटुंबाला राज्य सरकारने २ लाखाची मदत केली आणि राज्यपालांनी ५ लाखाची मदत जाहीर केली.
गणी ह्यांनी PTI ला सांगितलं, “हीच काश्मीरीयत आहे, जी बंधुभाव, प्रेम आणि सौहार्द शिकवते. राउफ हे कश्मीरीयतचं उदाहरण आहे.”
राज्य काँग्रेस प्रमुख, गुलाम अहमद मीर ह्यानी दार बद्दल, दार ही काश्मीरियतची खरी ओळख आहे असे गौरवोद्गार काढले.
“मी राज्य शासनाकडे मनापासून विनंती करतो, की त्यांनी दारच्या कुटुंबियांना अशी आर्थिक मदत करावी जेणेकरून त्यांची उदरनिर्वाहाची सोय होईल.” असे ते म्हणाले.
तेथील स्थानिकांनी मात्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दोष दिला. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन सेल आणि राज्य संकट निवारण केंद्र ह्या दोघानाही तिथे सुटका पथक नसल्याबद्दल धारेवर धरले.
“ह्या ठिकाणी एक दशकाहून अधिक काळ राफ्टींग होत आहे. परंतु ना SDRF (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) किंवा SDMA(स्टेट डिझास्टर मॅनेजमेन्ट अथॉरिटी) ह्यांपैकी कुणीही त्यांची माणसे, त्याची टीम, त्यांची आपत्ती व्यवस्थापन सामग्री तिथे ठेवली नाही आहे.”
असं रियाज अहमद लोन, ‘ग्रेटर काश्मीर’ वहिनीला सांगत होता.
–
- ३ बालकांना वाचवण्यासाठी, अवघ्या २२व्या वर्षी प्राणांची आहुति देणारी शूर कन्या!
- असामान्य धाडस; अपहरण झालेल्या विमानातल्या १५२ प्रवाशांचे जीव तिच्यामुळे वाचले…
–
मुहंमद युसूफ, तिकडचा स्थानिक म्हणाला, “राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) अकार्यक्षम आहे. त्यांनी सुटका कार्य देखील बरोबर व्यवस्थित पार पाडले नाही.”
‘राउफ’चा त्याग लक्षात ठेवताना एक गोष्ट वाचकांनी लक्षात ठेवली पाहिजे की संध्याकाळी राफ्टिंग करणं हे नियमांविरूद्ध आहे.
राफ्टिंगचं कोणतंही मॅन्युअल पहा, राफ्टिंग संध्याकाळनन्तर करता येत नाही. तसं करणं नियमांविरुद्ध आहे. सगळ्या राफ्टिंगच्या मॅन्युअलमध्ये सूर्यास्ताअगोदर १ तास राफ्टिंग संपवावं असं लिहिलेलं आहे.
नियम न पाळून, वृथा आग्रह करून आपण आपल्याबरोबर सर्वांचे प्राण संकटात घालतो. निर्सगाच्या पुढे आपण जाऊ शकतो का?
हया दुर्दैवी अपघातामुळे काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांचे मनोधैर्य खच्ची व्हायला नको. भारताचं नन्दनवन समजलं जाणारं काश्मीर खोरं, पर्यटकांना भुरळ घालत आहेच. परंतु हल्लीच झालेल्या अतिरेकी कारवाया, घटनांनी पर्यटकांचे प्रमाण कमी झालं आहे.
२०१८ साली एकूण ८.५ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती, जे आठ वर्षातील नीचांक आहे.
असे प्रसंग आपल्याला ह्या सर्व परिस्थितीत काळजी कशी घ्यावी हे शिकवतात आणि त्याच वेळी तेथील पर्यटनाबद्दल विश्वासही जागवतात.
‘राउफ अहमद दार’ ने जे शौर्याचं काम केलं आहे ते निस्वार्थीपणाचं आणि शौर्याचं असं उदाहरण आहे जे आजकालच्या स्वतःपुरतं, स्वतःच्या फायदयापुरत्या पहाणाऱ्या, माणुसकीची खोटी जाहिरात करणाऱ्या लोकांसाठी अंजन आहे व माणुसकीचं एक नितांतसुंदर उदाहरण आहे.
खऱ्या टुरिस्ट गाईडचं कर्तव्य त्याने निभावलं. जेव्हा आपणही आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात दोन पावलं स्वतः च्या पुढे जाऊन छोट्या छोट्या गोष्टी दुसऱ्यांसाठी करू तेव्हा राउफला ती आपल्याकडून श्रद्धांजलीच असेल.
‘राउफ अहमद दार’ च्या बहादुरीला मनापासून सलाम!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.