Site icon InMarathi

हे किडे पाहूनच मळमळायला होतं, खाण्याची हिंमत आहे का, या १० किळसवाण्या डिशेस?

Stinkbugs IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पुण्याच्या सदाशिव पेठेतील एसपी बिर्याणी हाऊस येथे जेवणात अळ्या सापडल्याचा व्हिडीओ मागे सगळीकडे व्हायरल झाला होता . काही लोक म्हणत होते की हे सगळं त्या हॉटेलची प्रतिमा मलीन करण्यासाठी मुद्दाम घडवून आणलेला प्रताप होता तर काही लोक म्हणतात की इथले जेवण तसेही चांगले नसते.

ह्यातून अनेक चर्चा सगळीकडे सुरु होत्या.

बाहेरचं खाऊ नये, घरचंच जेवण बेस्ट, बाहेरच्या जेवणात असे आढळणारच इथपासून तर बायका घरी स्वयंपाक करत नाहीत म्हणून हॉटेलवाल्यांचा धंदा जोरात सुरु आहे इथपर्यंत लोक वाटेल त्या चर्चा करत होते.

काही लोक गमतीत तर असेही म्हणत होते की नॉनव्हेज खाता ना, अख्खी कोंबडी आणि अख्खाच्या अख्खा बोकड त्याच्या आतल्या अवयवांसकट खाता.

बाहेरच्या देशात गेल्यावर बीफ, पोर्क खाता, मग इतकी बारीकशी अळी निघाली तर त्यात इतका थयथयाट कशाला करता?

 

 

नॉनव्हेज तर नॉनव्हेजच असतं, काय फरक पडतो? नॉनव्हेजचे चाहते खवय्ये लोक मात्र म्हणतात, चिकन मटण खातो म्हणून अळ्या खायच्या का आम्ही?

पण आता जे तुम्ही वाचणार आहात, ते वाचून मळमळु लागल्यास आम्ही जबाबदार नाही.

आपापल्या रिस्कवर वाचा, वाटल्यास तोंडात खडीसाखरं, लवंग, लिमलेटची गोळी ठेवून वाचा कारण जगातले काही लोक काय भयानक प्रकार खातात त्याबद्दल पुढचा लेख आहे.

तो वाचून पट्टीच्या नॉनव्हेज खाणाऱ्यांना सुद्धा ईईईईईई ..यक्क! असे वाटण्याची दाट शक्यता आहे. सो प्रोसिड ऍट युअर ओन रिस्क!

फ्राईड ब्रेन सॅन्डविच

 

 

नाव ऐकूनच पोटात कसंतरी झालं ना? पण हा पदार्थ पूर्वी मध्य अमेरिकेत खूप प्रसिद्ध होता आणि अमेरिकन लोक अतिशय आवडीने हा पदार्थ खात असत. पण नंतर मॅड काऊ रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि बऱ्याच लोकांनी हा पदार्थ खाणे सोडून दिले.

अमेरिकेत अजूनही काही ठिकाणी हा पदार्थ मिळतो पण गाईचा ३० महिन्यांपेक्षा जुना मेंदू पदार्थांत वापरणे आता अमेरिकेत बेकायदेशीर आहे. तरीही तिथले बरेच लोक हा पदार्थ खातात.

एस्कॅमोल

 

एग्वेव्ह ह्या झाडाच्या मुळाशी ज्या मुंग्या असतात त्या मुंग्यांच्या लार्व्ही म्हणजे मेक्सिकोमधील अतिशय आवडीचा पदार्थ आहे. अळीस्वरूपात असलेल्या मुंग्या इथे लोकप्रिय आहेत.

हा इथला खास पदार्थ आहे. नटी बटरसारखी ह्याची चव लागते म्हणे. इथले लोक ह्या पदार्थाला इन्सेक्ट कॅव्हिअर असेही म्हणतात.

 

हकार्ल

 

 

हा पदार्थ आइसलँडमध्ये खाल्ला जातो. हा पदार्थ म्हणजे फर्मेंट केलेला शार्क मासा होय.

शेफ अँथनी बोर्डेन ह्यांनी हा पदार्थ म्हणजे जगातील सगळ्यात बेक्कार चवीचा, घाणेरडा व किळसवाणा आहे असे म्हटले आहे. इतका घाणेरडा लागणारा पदार्थ मी अख्ख्या हयातीत खाल्ला नाही असे ते म्हणाले होते.

 

बर्ड्स नेस्ट सूप

 

 

तुम्हाला वाटत असेल की पक्ष्यांच्या काटक्यांच्या घरट्यापासून हा पदार्थ बनवतात तर तसे नाही. पक्ष्यांची लाळ किंवा थुंकी वाळवून त्यापासून हे सूप बनवतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

ह्याच्या असंख्य व्हरायटी आहेत. चायनीज लोकांचा हा पारंपरिक पदार्थ आहे आणि गेली शेकडो वर्षे ते हा पदार्थ खात आले आहेत.

जगातील सर्वात महागड्या पदार्थांपैकी हा एक पदार्थ आहे. ह्याचा जो रेड नेस्ट नावाचा प्रकार आहे त्याची किंमत दहा हजार डॉलर्स पर बाउल इतकी जास्त आहे. पक्ष्यांच्या लाळेची इतकी किंमत?? वाचून विश्वास बसत नाही ना?

ड्रंकन श्रिम्प

 

 

चीनच्या काही भागात हा पदार्थ खाल्ला जातो. हे लोक श्रीम्प म्हणजेच साध्या भाषेत झिंगा कच्चा आणि जिवंत असतानाच खातात.

खाण्याआधी हे लोक झिंग्याला स्ट्रॉंग अल्कोहोलमध्ये थोड्यावेळ ठेवतात आणि नंतर तसाच जिवंत असतानाच कच्चाच खातात.

अमेरिकेतील काही भागात सुद्धा हा पदार्थ खाल्ला जातो. पण अमेरिकन लोक झिंगा शिजवून मग खातात. एखादा प्राणी तो जिवंत असतानाच खाण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.

सरस्ट्रोमिंग

 

 

उत्तर स्वीडनमध्ये खाल्ला जाणारा हा पदार्थ म्हणजे फर्मेंट केलेला बाल्टिक हेरिंग मासा होय. हा पदार्थ कॅनिंग करून मग विक्रीस ठेवला जातो.

मासा कॅनमध्ये असताना कधी कधी इतका जास्त फर्मेंट होतो की कॅन फुगतात.

ह्याचा वास इतका भयंकर असतो की हा पदार्थ घरात खाऊच शकत नाही. जगातील सगळ्यात घाणेरडा वास कुठल्या पदार्थाचा असेल तर तो हा वास आहे असे जपान मध्ये झालेल्या एका पाहणीत आढळून आले आहे.

Sannakji

 

 

 

पूर्व आशियात हा पदार्थ प्रसिद्ध आहे. ऑक्टोपस ह्या मासा जिवंत असतानाच त्याचे तुकडे करून त्यावर तिळाचे तेल घालून तो मासा कच्चाच खायला देतात.

कधी कधी तर हे तुकडे तुमच्या ताटात असताना सुद्धा हलत असतात.

फिश टॅंक मधून तुमच्या आवडीचा छोटा ऑक्टोपस तुम्ही निवडल्यावर तो विकणारा माणूस त्या ऑक्टोपसचे तुमच्याच समोर तुकडे करतो आणि त्या अर्धमेल्या ऑक्टोपसचे तुकडे सारखे हलत असतानाच इथले लोक चॉपस्टिकमध्ये पकडून खाऊन टाकतात.

कोरिया मध्ये कधी गेलात तर तिथल्या मार्केटमध्ये हा पदार्थ मिळतो. हिम्मत असेल तर मासेप्रेमी लोक मनाचा हिय्या करून तिथे हा पदार्थ खाऊ शकतात.

रॉकी माउंटन ऑयस्टर्स

 

तुम्हाला वाटत असेल की पहाडी भागातील शिंपले वापरून हा पदार्थ बनवतात तर तसे नाही. बैल किंवा वासराचे अंडकोष म्हणजे रॉकी माउंटन ऑयस्टर्स होय.

हे अंडकोष सोलून, तुकडे करून तळून अनेक लोक खातात. वाळवंटात असेच उंटाचे किंवा बोकडाचे अंडकोष खाल्ले जातात. हे वाचून शाकाहारी लोकांना नक्कीच मळमळायला लागले असणार!

स्टींकबग्ज

 

 

इंडोनेशियात हे किडे खाल्ले जातात. इंडोनेशियन लोकांना हे लहान लहान किडे खायला फार आवडते. आपण जसे खारे शेंगदाणे वगैरे खातो तसे इंडोनेशियन लोक हे किडे सर्रास खातात.

असे म्हणतात की ह्याची चव बिनमिठाच्या सूर्यफुलाच्या बियांप्रमाणे आहे. हे किडे खाताना एकच अट आहे, पटापट चावून गिळून टाकायचे! हे किडे पाहूनच किळस येते, खाण्याची तर कल्पनाही करवत नाही.

Casu Marzu

 

 

सार्डिनिया ह्या ठिकाणी हा पदार्थ खाल्ला जातो. मेंढीच्या दुधापासून तयार केलेल्या चीजमध्ये जिंवत किडे आणि अळ्या असतात. ह्याच पदार्थाला Casu Marzu म्हणतात.

हे किडे जिवंत असतानाच हे चीज खावे लागते. ह्या अळ्या ८ मिमी इतक्या लांब असतात आणि त्या चीजच्या बाहेर आल्या तर १५ मिमी पर्यंत लांब असू शकतात.

कोण खाऊ शकेल असे काहीही जे बघूनच माणूस ४ दिवस जेवू शकणार नाही?

तर असे हे भयानक पदार्थ आहेत जे जगाच्या पाठीवर आवडीने खाल्ले जातात. तुम्हाला हे वाचून मळमळायला लागलं असेल तर साहजिकच आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version