ऑस्ट्रेलियाच्या या २ जुळ्या भावांनी ५ पार्टनरशिपमध्ये भल्याभल्या संघांना धूळ चारली!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
क्रिकेट जगतात अनेक संघ वेगवेगळ्या वेळी चांगले खेळलेल आहेत. कधी कुठला संघ चांगला खेळतो तर कधी कुठला. तरीही चाहत्यांच्या मते वेगवेगळ्या कालखंडातील दोन संघ असे होते जे जवळपास अपराजित होते आणि समोरच्या संघाच्या मनात त्याच्याशी खेळतात भीती असायची.
पहिला संघ म्हणजे १९७५-१९८३ दरम्यानचा वेस्टइंडीजचा संघ. ह्या संघाने २ विश्वचषक जिंकले होते आणि हा संघ ह्या आठ वर्षात जवळपास अपराजित राहिला होता.
ह्यानंतर असा समोरच्या संघाच्या मनात धडकी भरवणारा संघ होता १९९३ ते साधारण २००३ दरम्यानचा ऑस्ट्रेलियाचा संघ. ह्या संघाने ह्या कालावधीत झालेल्या ३ विश्वचषक स्पर्धांपैकी दोन स्पर्धा जिंकल्या होत्या.
ह्या ऑस्ट्रेलियन संघात सगळेच एकापेक्षा एक चांगले खेळाडू होते. गोलंदाजी , फलंदाजी, क्षेत्ररक्षण सगळ्याच क्षेत्रात हा संघ परिपूर्ण होता . तर अशा ह्या संघात दोन जुळे भाऊ सुद्धा खेळत होते.
क्रिकेटच्या इतिहासातच नव्हे तर अगदी कुठल्याही खेळाच्या इतिहासात जुळे भाऊ एकाच संघात एकाचवेळी खेळणे हे फार दुर्मिळ. तर त्या जुळ्या भावांचे नाव होते मार्क आणि स्टीव्ह वॉ.
वॉ बंधूपैकी मार्क हा सलामीचा फलंदाज होता आणि जगातला सर्वोत्तम स्लीप मधला क्षेत्ररक्षक होता.
तंत्रशुध्द फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या मार्क वॉ ने ऑस्ट्रेलियन संघाला अनेक सामन्यात उत्कृष्ट सुरवात करून दिली होती. त्याचा भाऊ स्टीव्ह वॉ हा मधल्या फळीतील भरवश्याचा फलंदाज आणि एक चांगला कामचलाऊ मध्यमगती गोलंदाज होता.
स्टीव्ह वॉ हा ऑस्ट्रेलियाचा एक अत्यंत यशस्वी कर्णधार सुद्धा होता. ह्या दोन्ही भावांमधल्या केमेट्रीची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतील कितीतरी वेळा ह्या दोघांनी एकत्र येऊन आपल्या संघाला संकटातून बाहेर काढलेले आहे.
आज आपण अशाच पाच भागिदाऱ्यावर नजर टाकूया.
१. किंगस्टन टेस्ट १९९५ :-
–
हे ही वाचा – या किडकिडीत भारतीय खेळाडूने ओढली होती ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची मिशी!!
–
भेदक जलदगती गोलंदाजांनी भरलेल्या वेस्टइंडीज संघाविरुद्ध १९९५ साली ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका खेळत होता. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर वेस्टइंडीजने दुसरा सामना जिंकून बरोबरी केली होती. आता शेवटचा सामना जो किंगस्टनमध्ये होणार होता तो जिंकणारा संघ मालिका जिंकणार होता.
सत्तरच्या दशकापासून ऑस्ट्रेलिया वेस्टइंडीज मध्ये जाऊन कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करत होती मात्र त्यांना यश येत नव्हत. ही त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी होती.
वेस्टइंडीजने २६५ पहिल्यांदा फलंदाजी करत २६५ धावा फलकावर लावल्या. तो काळ गोलंदाजांचा होता त्यामुळे ह्या धावा खूप जास्त मानल्या जात असत.
प्रतिउत्तर देताना ऑस्ट्रेलियाचे पहिले ३ गडी फक्त ७३ धावांत बाद झाले आणि त्याच्या मालिका विजयाच स्वप्न धूसर होऊ लागलं. मात्र ह्याचवेळी मार्क आणि स्टीव्ह ह्या दोन्ही भावांची जोडी जमली आणि त्यांनी २३१ धावांची भागीदारी रचली. शेवटी मार्क वॉ १२६ धावा काढून बाद झाला.
तरीही स्टीव्ह वॉ ने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरून संघाची एकून धावसंख्या पाचशेच्या पार नेली. स्टीव्ह वॉ च्या कारकिर्दीतील हे एकमेव द्विशतक होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि ५३ धावांनी जिंकला.
मजेची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाने काढलेल्या एकून ५३१ धावांपैकी ३२६ धावा ह्या वॉ भावांनी काढलेल्या होत्या.
२. विशाखापट्टणम वनडे १९९६
१९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ हा जिंकण्याचा प्रमुख दावेदार मानला जात होता. साखळी फेरीत अत्यंत कमजोर मानल्या जाणाऱ्या केनिया संघाविरुद्ध तर हा आरामात जिंकेल असा सगळ्यांचाच अंदाज होता.
मात्र सुरवातीचे दोन फलंदाज अगदीच स्वस्तात बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोटात थोडी भीती पसरायला लागली होती.
नेमक्या ह्या संकटाच्या वेळी पुन्हा हे दोन्ही जुळे भाऊ आपल्या संघाच्या मदतीला एकत्र आले. तिसऱ्या विकेटसाठी ह्या दोघांनी एकूण २०७ धावांचे भागीदारी केली आणि ती सुद्धा अवघ्या ३२ षटकात.
मार्क वॉ ने १२८ चेंडूत १३२ तर स्टीव्ह वॉ ने ८८ चेंडूत ८२ धावा काढल्या. ह्या दोघांच्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने केनिया समोर विजयासाठी ३०६ धावांचे अशक्य लक्ष्य ठेवले आणि हा सामना ९५ धावांनी अगदी आरामात जिंकला.
३. ओव्हल टेस्ट २००१
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ह्यांच्या दरम्यान खेळली जाणारी एशेस मालिका ही खूप महत्वाची मालिका मानली जाते. ह्या मालिकेतील विजय- पराजय ह्या दोन्ही संघांसाठी फार महत्वाचे असतात.
२००१ साली ह्याच मालिकेतील ओव्हल मैदानावरच्या टेस्ट मध्ये हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र आले. तिसऱ्या विकेटसाठी ह्या दोघांनी मिळून १९७ धावांची भागीदारी केली होती.
मार्क वॉ ने १२० तर स्टीव्ह वॉ ने १५७ धावा काढल्या ज्यामुळे ऑस्ट्रेलिया चार बाद ६४१ धावांचा डोंगर उभा करू शकली आणि इंग्लंडला फॉलोऑन देऊ शकली. हा सामना ऑस्ट्रेलियाने एका डावाच्या फरकाने जिंकला होता.
४. बर्मिंगहम टेस्ट १९९३
अजून एका एशेस टेस्ट मध्ये आपल्या परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंड विरुद्ध ह्या भावांनी आपल्या संघाला तारून नेले होते. इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करत २७६ धावा केल्यानंतर त्याचे उत्तर देताना ऑस्ट्रेलिया सुद्धा चार बाद ८० अशा अत्यंत नाजूक स्थितीत होते.
अशावेळी त्यांचे संकटमोचक असलेले हे भाऊ परत एकदा एकत्र जमले आणि त्यांनी इंग्लंडची धुलाई सुरु केली. त्यांनी १५३ धावांची भागीदारी केली होती.
मार्क ने १३७ धावा काढल्या तर स्टीव्हने ५९ धावा काढल्या होत्या. ही टेस्ट क्रिकेट मधली सगळ्यात पहिली दोन भावांमधली शतकी भागीदारी होती. ह्यानंतर त्यांनी अनेकवेळा हा पराक्रम केला असला तरी ही त्याची सुरवात होती.
५. पर्थ टेस्ट १९९७
–
हे ही वाचा – ५० चेंडू, ७ धावा, ३ बळी… कांगारूंविरुद्ध ‘हरून सुद्धा’ त्याने जिंकली सगळ्यांची मनं!
–
पर्थची खेळपट्टी ही जगातील सगळ्यात वेगवान खेळपट्टी मानली जाते. तिथला वेग आणि चेंडूला मिळणारी उसळी ह्यामुळे तिकडे फलंदाजी करणे म्हणजे फार कठीण काम असते.
न्यूझीलंडचा संघ २१७ धावा काढून बाद झाल्यावर ऑस्ट्रेलिया सुद्धा तीन बाद सत्तर अशा कठीण अवस्थेत आले होते. नेहमीप्रमाणे त्यांना ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी वॉ बंधू पुढे सरसावले.
चौथ्या गड्यासाठी त्यांनी एकूण १५३ धावांची भागीदारी केली. मार्क वॉ ने ८६ तर स्टीव्ह वॉ ने ९६ धावा काढल्या. ह्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने एकूण २४४ धावांची आघाडी घेतली आणि त्यांना परत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी यायची सुद्धा गरज पडली नाही . हा सामना ऑस्ट्रेलियाने अगदी आरामात एका डावाने जिंकला.
तर असे हे ऑस्ट्रेलियन संघाचे तारणहार असलेले जुळे भाऊ मार्क आणि स्टीव्ह वॉ.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.