घरात बोअर झाला असाल तर भारतातल्या १० प्रवासाची रेल्वे व्हर्चुअल सहल तुमचा मुड एकदम फ्रेश करेल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
रेल्वे….लहान मुलांना झुकझुक गाडी, कूऽऽ गाडी म्हणत जितकी भुरळ घालते तितकंच सिनेमावाल्यांनाही तिनं प्रेमात पाडलं. राजेश खन्नाने मेरे सपनों की रानी म्हणत किती पिढ्यांवर गारुड केलं.
बर्निंग ट्रेन हा निव्वळ रेल्वेवर सिनेमा आला. परिणीता मध्ये सैफ आणि विद्या बालन रेल्वेतून गाताना दिसले. अशी ही रेल्वे इंग्रजांनी भारतात आणली.
आज ही रेल्वे आपलं जुनं कोळशावर चालणाऱ्या इंजिनाची रुप बदलून इतकी दिमाखदार झाली आहे…
रोज रेल्वेतून १८ अब्ज लोक प्रवास करतात. १.४ अब्ज कर्मचारी १७ हजार रेल्वे ६४ हजार किलोमीटर रुळांवरुन चालवतात, हे सरासरी चित्र आहे.
पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चालणाऱ्या या रेल्वे मार्गावर मुंबईत चालणाऱ्या लोकल ट्रेन आहेत आणि कानाकोपऱ्यात पोचणाऱ्या रेल्वे आहेत.
काही हाॅस्पिटल आॅन व्हील्स आहेत, जुन्या टाॅय ट्रेन आहेत, शाही रेल्वे आहेत. या संपूर्ण देशातील ज्या सुंदर रेल्वे आहेत त्यांची आज माहीती पाहूया.
१. गोवा एक्स्प्रेस रुट ( वास्को दोन गामा-गोवा) ते लोंढा (कर्नाटक)
सेकंड क्लास स्लीपर कोच रेल्वे पश्चिम घाटातून घनदाट जंगल पार करत धबधब्याच्या जवळून जाते.
त्यावेळी गोव्याच्या ग्रामीण भागातील संस्कृती पार करत जाते त्यावेळी लाल मातीचा उठणारा धुळीचा थर आणि मावळता सूर्य यांचे विहंगम दृश्य दिसते.
२. दिब्रूगढ न्यू राजधानी एक्स्प्रेस ( जलपैगुडी-तिनसुकीयाआसाम)
या रेल्वे मध्ये दोन रेल्वे एकत्र येतात. जी पश्चिम बंगालमध्ये राजधानी सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रवास सुरु करते आणि आसाममधील तिनसुकीया या टोकाला पोचते.
दुतर्फा असलेल्या हिरव्यागार चहाच्या मळ्यातून हा सुंदर प्रवास घडतो.
ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरुन ही रेल्वे आसाममधील तिनसुकीयाला पोचते. गुवाहाटी शहराच्या भागातील झोपडपट्टी ओलांडत ही रेल्वे सकाळी खेड्यापाड्यातून तिनसुकीयाला पोचते.
मजेचा भाग असा की या रेल्वेतून आसपासच्या घरातील लोकांना चहा पितानाही आपण पाहू शकतो इतकी या मार्गाच्या जवळ जवळ घरे आहेत. संपूर्ण प्रवास १६ तास ३० मिनीटे आणि लेडोपासून १ तास ३० मिनीटे.
३. निजामुद्दीन दुरांतो एक्स्प्रेस (पुणे ते दिल्ली)
विनाथांबा असलेली आणि भारतातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ही रेल्वे पुण्याहून २६ तासांचा प्रवास २० तासांत पार करते.
या प्रवासात विविध नद्या, वाळवंट, खेडी डोंगर पार करत प्रचंड वेगाने धावते.
नवी दुरांतो एक्स्प्रेस म्हणजे बंगाली भाषेत चटकन्.
या रेल्वेच्या तिकीट दरात रुचकर जेवण, स्वच्छता, वाचण्यासाठी दिवे, फोन चार्ज करण्यासाठी साॅकेट होल्डर या सुविधा प्रवाशांना पुरवल्या जातात.
४. मांडवी एक्स्प्रेस ( गोवा- मुंबई)
सह्याद्रीच्या रांगा आणि अरबी समुद्राच्या दरम्यान धावणारी ही रेल्वे कोंकण रेल्वे म्हणूनही ओळखतात. ९२ बोगदे, हजारो नद्या, आणि २००० पूल ओलांडून ही रेल्वे मुंबईत पोचते.
या प्रवासात डावीकडचे दरवाजे उघडे ठेवून भातशेती, आंब्याच्या झाडांची लागवड, छोटी छोटी खेडी आणि रानफुलांच्या विहंगम रांगांचे दृश्य दिसते.
५. भारतीय डेक्कन ओडिसी एक्स्प्रेस-(मुंबई – दिल्ली)
ही पूर्वीची पॅलेस ऑन द व्हील्स आता डेक्कन ओडिसी या नावाने ओळखली जाते. मुंबई ते दिल्ली व्हाया राजस्थान ही रेल्वे प्रवास करते.
या रेल्वेमधून रजपूत लोकांसारख्या शाही थाटात प्रवास करता येतो.
१० दिवसाच्या या प्रवासात रणथंबोर, अजिंठा, एलोरा येथील लेणी, ताजमहाल, थरचे वाळवंट पार करत पहाता येते.
६. आयलंड एक्स्प्रेस- (कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम)
भारताचं शेवटचं दक्षिणेचं टोक, जिथं तीन समुद्र मिळतात तेथे या एक्स्प्रेसचा प्रवास सुरु होतो. आणि दोन तासात ही त्रिवेंद्रम येथे पोहोचते.
रेल्वेच्या उघड्या दारातून नी खिडक्यांमधून केरळमधील अनोखे सृष्टीसौंदर्य मन मोहून टाकते.
पामची गर्द हिरवी राई, सभोवताली पसरलेली हिरवाई आणि लिंबासारखा दरवळ या सर्वांनी मन प्रसन्न होते.
बारकाईने पाहिले तर त्या गर्द हिरव्या झाडीत असलेली चर्च, घरं सुध्दा दिसतात.
७. हिमालया क्विन-( कालका- शिमला)
शिमला ही इंग्रजांची उन्हाळ्यातील राजधानी होती. आजही त्यावेळची ऐतिहासिक मीटरगेज रेल्वे तिथे आहे.
जी तेथील १०२ बोगदे, ८७ पूल आणि ९०० वळणं पार करत १९०३ पासून आजपर्यंत चालते आहे.
या रेल्वेचे दृश्य अतिशय देखणे आहे.
विविध प्रकारच्या फुलांनी फुललेल्या बागा, खळाळत वाहणारे झरे आणि सर्वत्र पसरलेले छोटे छोटे पावसाळ्यानंतरचे धबधबे हे दृश्य विलोभनीय असते.
गाई गुरे सारख्या त्या रेल्वेच्या रुळावर थांबतात. त्यामुळे आधीच हळूहळू चालणारी ही रेल्वे मध्येच रुळावर थांबते.
या संथ गतीने प्रवासी चालत्या रेल्वेतून उतरुन पकोडे चहा यांचा आस्वाद घेत घेत पुन्हा रेल्वेतून जाऊ शकतात.
५ तास १० मिनीटांचा हा प्रवास रमणीय होतो.
८. जम्मू मेल ( जम्मू – उधमपूर)
भारताच्या उत्तर टोकाला जाणारी ही रेल्वे ५३ किलोमीटर अंतर कापते. हा लोहमार्ग इंजिनीअरिंगचा एक अतुलनीय नमुना आहे.
शिवालीक पर्वताच्या खडकाळ दरी खोऱ्यातून जाणारा हा रस्ता मोठ्या नदीमुखाकडून आणि दरीखोऱ्यातून २० बोगदे आणि १५८ पूल पार करत जातो.
गंभीर पुलावरुन जाताना दिसणारे दृश्य आ वासायला लावते. उधमपूर मात्र सपाट मैदानी प्रदेश असल्यासारखा आहे. ३ तासाचा कालावधी असलेला प्रवास या वळणवाटांमुळे लांबतो कधी कधी.
९. गोल्डन चॅरीएट- (बेंगळुरू- गोवा)
विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी असलेल्या हंपी, काबिनीच्या अभयारण्यातून ही रेल्वे प्रवास करते. बदामी, हंपी या ठिकाणाहून जाताना ही रेल्वे मोठमोठ्या खाणी, नैसर्गिक गुहा आणि विजयनगर साम्राज्याचे अवशेष ओलांडत येते.
या रेल्वेच्या खिडकीतून सूर्यास्ताचे मनमोहक दृश्य अतिशय सुंदर दिसते. ही शाही रेल्वे प्रवाशांचे जेवणाखाणाचे लाड करतेच पण या रेल्वेतील रुम अतिशय सुंदर आहेत.
जेवण आणणाऱ्या छोट्या ट्राॅलीज थेट अॅगाथा ख्रिस्तीच्या कादंबरीतून ओढून आणल्यासारख्या वाटतात.
१०. टाॅय ट्रेन ( न्यू जलपैगुडी- दार्जिलिंग)
दार्जिलिंग आणि सिलीगुडी यांच्यामधील बटाटे व्यापार शोषण बंद व्हावे यासाठी ट्रामचा रस्ता म्हणून बांधला होता. आता त्याचा जागतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे.
१२ किमी प्रतितास या वेगाने चालणारी ही रेल्वे हिरव्यागार चहाच्या मळ्यातून नेते. जाताना चहा गोळा करणाऱ्या बायकांची बास्केटमधून आपण चहाची पानं वेचू शकतो.
Agony point वर जाताना विविध वळसे, पार करत जाते. हा रस्ता शहरातून जातो. दुतर्फा बसलेले भाजी विक्रेते यांना ओलांडून जाते.
हवामान स्वच्छ असेल तर कांचनगंगा या हिमालयातील अत्त्युच्च शिखराचे बर्फाच्छादित टोकही दिसते.
ह्या आहेत भारतातील सर्वात सुंदर रेल्वे, मग कधी निघताय प्रवासाला ?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved..