चीनने शेक्सपिअरच्या कलाकृतींवर बंदी घालण्यामागच्या या कारणांची कल्पनाही आपण करू शकत नाही…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
‘तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्यावर प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेन, आणि जर तू माझा तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेन.’
हे वाक्य कोणाचं आहे माहीत आहे का? – विल्यम शेक्सपिअर.
विल्यम शेक्सपिअर हे एक जगप्रसिद्ध इंग्रजी कवी, नाटककार आणि अभिनेता होते. त्यामुळे शेक्सपिअर हे नाव माहीत नाही असा एकही माणूस सापडणे मुश्कील आहे. ४०० वर्षांपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या कलाकृती आजही अजरामर आहेत.
इंग्रजी भाषेतील लेखक म्हणून शेक्सपिअरचा दर्जा अर्थातच मोठा आहे. त्यांना ‘जगाचा नाटककार’ असे म्हटले जाते.
‘रोमिओ-ज्युलिएट, मॅकबेथ, ‘किंग लिअर’, ‘हॅम्लेट’ या शेक्सपिअरच्या काही अजरामर कलाकृती आहेत. या नाटकांचे विविध भाषांमध्ये अनुवादन झालेले आहे. आजही आपल्या मराठी रंगभूमीवरसुद्धा या नाटकांचे प्रयोग होत आहेत.
त्यातील प्रसंग ४००-४५० वर्षं जुने असूनसुद्धा आजही लोकांना जवळचे वाटतात आणि समाजात आजही या प्रकारच्या वृत्ती अगदी हमखास दिसून येतात.
म्हणजे किती दूरदर्शीपणाने लिहिली गेली असतील ना ही नाटके? या लिखाणावर काळाचा, बदलत्या जीवनशैलीचा परिणाम होतो का?
लेखन, साहित्य या गोष्टी समाजावर प्रभाव पाडतात. जनजागृती करणे, लोकांमध्ये एखादा विचार रुजवणे यासाठी लेखन हे नक्कीच प्रभावी माध्यम आहे. आजच्या तुलनेत पूर्वीचे लेखक फारच प्रभावी विचारांचे होते हे आपण मान्य केलेच पाहिजे.
तर शेक्सपिअरचं साहित्य जागतिक पातळीवर खूप प्रसिद्ध आहे, होतं. खुद्द ब्रिटनपेक्षाही चिनमध्ये शेक्सपिअरची लोकप्रियता जास्त होती, पण १९६६ साली ‘माओ-त्से-तुंग’ रिपब्लिक ऑफ चायना चा नेता याने ‘सांस्कृतिक क्रांती’ जाहीर केली.
तो साम्यवादी/कम्युनिस्ट विचारसरणीचा होता. त्यामुळे त्याने वेगळेच नियम अस्तित्वात आणले.
याचा त्याच्या दृष्टीने असा उद्देश असा होता की, ‘साम्यवादी/कम्युनिस्ट क्रांतिकारकांना व चिनी समाजाला उत्साह आणि सामर्थ्य देणे’ त्याची पत्नी चियांग चिंग ही चायनाच्या संस्कृतीची अनधिकृत सचिव होती.
या क्रांतीअंतर्गत शासनाला व साम्यवादाला पूरक नसणार्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात आली.
साम्यवाद विरोधी कार्याला देशद्रोही ठरवण्यात आलं. त्याचप्रमाणे साम्यवादी विचार व त्याला पूरक असलेली विचारधारा नसलेल्या म्हणजेच सर्व सांस्कृतिक गोष्टी, संगीत, साहित्य, सिनेमा, नाटकं यावर बंदी घालण्यात आली.
त्यामुळे साहजिकच शेक्सपिअरच्या साहित्यावरही बंदी घालण्यात आली. खरं तर ते अमाप लोकप्रिय होतं, त्यावरही बंदी घालण्यात आली होती. कारण पाश्चात्त्य देशांच्या संस्कृतीचा त्या कलाकृतींवर पगडा होता.
परंतु अशा धाकदपटशा दाखवून कोणत्याही कलेवर बंदी घालता येते का? किंवा त्याची लोकप्रियता कमी होते का?
आणि जे नाणं खणखणीत आहे ते तुम्ही कितीही चोरून ठेवलं तरी वाजणारच, त्यासाठी वेगळा प्रयत्न करायची गरज नाही. तर अशी बंदी आली तरीसुद्धा चीनमध्ये शेक्सपिअरच्या साहित्याची आणि नाटकाची लोकप्रियता कमी झाली नव्हती.
शेक्सपिअरची नाटकं, त्यांचे साहित्य हे पदवीपुस्तकांच्या अभ्यासक्रमांचा भाग आहेत. अजूनही ते साहित्य शिकवलं जातं. त्यामुळे ते कितीही झाकून ठेवलं तरी अभ्यासक्रमातून वगळता येत नव्हतं.
अगदी सांस्कृतिक क्रांतीनंतर लगेचच झालेल्या एका इंग्रजी साहित्य पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतही शेक्सपिअरच्या नाटकासंबंधी व व्यक्तिरेखांसंबंधी प्रश्न होते. म्हणजेच लोकप्रियता टिकून होती.
नाटकामुळे, लिखाणामुळे समाजाची करमणूक होत असते, प्रबोधन होत असते. त्यावर बंदी घातल्याने साहित्यावर काहीच परिणाम होत नाही, हे त्या नेत्यांना कधी कळलेच नसावे, पण ही क्रांती व बंदी याचा फटका मात्र चीनला निश्चितच बसला.
१९७० पर्यंत देशावर आर्थिक आणि सांस्कृतिक अडथळ्यांची पकड घट्ट होती.
सोव्हिएत राष्ट्रांपासून हल्ला होण्याची भीती असलेल्या चीनने निक्सॉन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन सरकारकडे व्यापारी सौदे व नवे संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा दर्शवली.
परिणामी अमेरिकेने सर्व प्रथम कम्युनिस्ट विचारधारा दूर करावी असा दबाव वाढवला. त्यामुळे मानवाधिकारांच्या दृष्टिकोनाचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले. आणि त्यामुळे चीनच्या सांस्कृतिक क्रांतीचा शेवट झाला.
साहित्यावरील बंदीमुळे झालेल्या नुकसानाची त्या कालखंडातील चिनी विद्वानांना जाणीव झाली असेलही कदाचित. पण सांस्कृतिकदृष्ट्या मंद बुद्धीच्या पक्षाच्या हास्यास्पद सदस्यांनी कम्युनिस्ट शिकवणीवर भाषण देणे क्रूरतेचे वाटले असावे.
शेक्सपिअरच्या लिखाणावरील बंदीने त्यांच्या लिखाणावर काहीच परिणाम झाला नाही, पण माओ सरकार कोणत्याही स्वरूपात यशस्वी झाले नाही आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाचा पगडाही भंग पावला नाही.
त्यामुळे चुकीच्या वेळी, चुकीच्या देशात जन्माला येणारं सरकार किती हानिकारक आहे याचं हे स्पष्ट उदाहरण आहे.
ऑक्टोबर १९७६ मध्ये सांस्कृतिक क्रांतीची अधिकृतपणे घोषणा झाली आणि मे १९७७ मध्ये विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी संपल्याचे जाहीर झाले.
बंदी उठवताच चीन सरकारने जाहीर केलं की, ‘आम्ही शेक्सपिअरच्या कलाकृतींचं चिनी भाषेत भाषांतर करू त्याची आवृत्ती लगेचच प्रकाशित होईल.’
तर अशी ही कथा आहे की, लोकप्रिय शेक्सपिअरच्या साहित्यावर चीन सरकारने बंदी घातली होती. ‘एक मूर्ख स्वत: शहाणा होण्याचा विचार करतो, पण एका शहाण्या माणसाला स्वत:ला माहीत असतं की मूर्ख व्हायचंय’.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.