' घरच्यांनी हाकललं, तरी हिमतीने उभारलं साम्राज्य; जेसीबीच्या निर्मितीची असामान्य कथा! – InMarathi

घरच्यांनी हाकललं, तरी हिमतीने उभारलं साम्राज्य; जेसीबीच्या निर्मितीची असामान्य कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या बांधकाम क्षेत्राला जगभरच खूप मोठी उभारी मिळालेली आहे. उंचच उंच, सर्व सोयींनी युक्त इमारती बांधल्या जात आहेत. बुर्ज खलिफा सारखी जगातील सर्वात उंच इमारती पाहण्यासाठी लोक दुबई वारी करू लागलेत.

आता त्याही पेक्षा उंच इमारत दुबईत बांधली जात आहे. या उंच इमारती बांधण्यापूर्वी त्याचा पाया जेव्हा रचला जातो तेव्हा तिथे पहिले जे मशीन जमिनीत खोदकाम करण्यासाठी वापरले जाते ते असते जेसीबी.

 

JCB inmarathi

 

बांधकाम क्षेत्रात ‘अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट्स’चा वापर करताना डोळ्यासमोर येते ते एकच नाव. हे नाव आहे जेसीबी.

जेसीबी हे नाव खरंतर याच्या निर्मात्याच्या नावावरून आलेले आहे.

बऱ्याचदा आपल्याला अशा वेगळ्या प्रकारच्या नावामागील कहाणी माहीती नसते. जसे विख्यात मर्सिडीज गाडीचे नाव हे कार निर्मात्याने स्वतःच्या मुलीच्या म्हणजे मर्सिडीजच्या नावाने ठेवले.

अशीच काहीशी कहाणी आहे जेसीबी नावाची.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दुसऱ्या महायुद्धाने युरोपची पार वाट लागली होती. त्या आधी पहिले महायुद्ध देखील युरोपच्या भूमीवरच घडले होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपची आर्थिक घडी पार विस्कळीत झाली होती. शस्त्रास्त्र निर्मिती व्यतिरिक्त इतर कारखानदारी पार लयास गेली होती.

शेतीची वाट लागली होती. लाखो लोक बेकार झाले होते. हाताला काम आणि पोटाला घास एवढी एकच मागणी जोर धरू लागली होती. युद्धकाळात चालू असलेले अन्नधान्याचे रेशनिंग बंद केल्याने बाजारात महागाई वाढली होती.

 

old jcb 1 inmarathi

 

त्यामुळेच परत एकदा शेतीकडे वळणे क्रमप्राप्तच होते.

शेतीसाठी नवीन प्रकारच्या अवजारांची गरज निर्माण झाली होती. अवजारे अशी हवी होती की कमीतकमी वेळात नांगरणीसारखी कामे जलद गतीने व्हायला हवी होती.

युरोपचे वातावरण मुळातच अतिशय थंड. शेतीसाठी पूरक हवामानात काम जलद गतीने उरकणे अतिशय महत्वाचे होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर रिकामे पडलेले ट्रेलर्स सरकारने विक्रीस काढले. या ट्रेलर्सवर प्रयोग करून आधी दोन चाकी आणि नंतर चारचाकी ट्रॅक्टर्स हळूहळू बाजारात दाखल होत होते.

 

old tractor inmarathi

 

अशीच एक कंपनी शेतीची अवजारे सन १८३० पासून बनवत होती. हा त्यांचा फॅमिली बिझनेस होता. ती कंपनी होती हेन्री बॅमफोर्ड यांची. शेतीसाठी लागणारी विविध प्रकारची मशिनरी तयार होत होती.

याचवेळी त्यांचा मुलगा सॅम्युअल याने Leighton Ironworks Company ची सुरवात केली आणि पुढे हीच कंपनी हेन्री बॅमफोर्ड अँड सन्स नावाने ओळखली जाऊ लागली. हे होते जोसेफ सिरील बॅमफोर्ड यांचे आजोबा.

तरुण जोसेफ आपल्या घरच्या कंपनीत काम करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी दाखल झाला.

त्याच्या डोक्यात नवनवीन कल्पना घोळत होत्या, ज्या जरा अवास्तव आहेत असे त्याच्या काकांना वाटत होते. त्यामुळे जोसेफला आपल्या मनातील अवजारांची कल्पना प्रत्यक्षात आणता येत नाही हे लक्षात आले.

दरम्यान त्याच्या काकांना देखील बहुतेक साक्षात्कार झाला असावा, की हा मुलगा आपल्या कामाचा नाही. जोसेफला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.

जोसेफने काही काळ इकडेतिकडे नोकरी केली आणि नंतर स्वतःचे एक छोटेसे वर्कशॉप उघडले. सहा वर्षे युद्धाच्या खाईत लोटलेल्या युरोपची शेती अवजारांची गरज लक्षात घेऊन जोसेफने याच क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.

 

joseph cyril inmarathi

 

एक छोटेसे गॅरेज त्याने भाड्याने घेतले. एक टिपिंग ट्रेलर बनवून ४५ पाउंडला विकला. आणखी एक असेच मशीन ४५ ला विकले. हळूहळू ६ कामगारांची नियुक्ती करून त्यांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची डिझेल इंजिन्स बनवायला सुरवात केली.

१९४८ मध्ये पहिला हायड्रॉलीक टिपिंग ट्रेलर त्याने बनवला. ही एक क्रांतीच होती. १९५० मध्ये युरोपियन मार्केटमध्ये याची चलती झाली. त्या वर्षी त्याने आपले उत्पादन पिवळ्या रंगात रंगवायला सुरवात केली.

पिवळा रंग हा खूप दुरून दिसणारा आणि धोक्याची सूचना देणारा असल्याने मुद्दाम याच रंगाची निवड केली.

१९५७ मध्ये त्याचे एसकेव्हेटर्स मार्केटमध्ये आले आणि सर्वात जास्त चर्चा झाली ती मेजर लोडर आणि बॅकहाऊ या मशीनची. खोदकामासाठी याचा चांगला उपयोग होऊ लागला.

१९६० मध्ये हायड्रॉलिक ट्रॅक्टर्स उत्तर अमेरिकेत दाखल झाले आणि आजही लोकप्रिय आहेत. प्रत्येक वेळेस त्यात नवीन कल्पना राबवून आणखी जास्त कार्यक्षम मॉडेल्स बाजारात आणली गेली.

१९६४ मध्ये ३००० बॅकहोऊ ट्रॅक्टरची विक्री झाली आणि पुढील वर्षीच जेसीबी ७ ची निर्मिती झाली.

जेसीबी हे नाव या कंपनीला देण्याचे श्रेय जाते त्याच्या मुलाकडे. १९४५ ला जोसेफच्या मुलाचा जन्म झाला. पुढे लॉर्ड बॅमफोर्ड म्हणून ओळखल्या गेलेल्या मुलाने आपल्या वडीलांचेच नाव कंपनीला दिले.

 

anthony bamford inmarathi

 

आज कंपनीच्या एक दोन नव्हे तर १२२ फॅक्टरीज भारत,आशिया खंड ,युरोप खंड आणि दक्षिण आणि उत्तर अमेरिकेत कार्यरत आहेत. भारतात १९७८ पासून जेसीबी कंपनी आपली उत्पादने बनवून जगभर त्याची विक्री करत आहे.

आज जगभरात त्यांची वेगवेगळी मॉडेल्स शेती आणि बांधकाम व्यवसाय तसेच उत्खनन क्षेत्रात कार्यरत आहेत.सध्या एक्स सिरीज प्रचलित आहे.फोर्क लिफ्ट आणि ३६० अंशात खोदकाम करणारे टेलिस्कोपीक हँडलर खूप प्रसिद्ध आहे.

जेसीबीची मिनी वर्जनस देखील लोकप्रिय आहेत.

‘व्हील्ड 360 डिग्री एक्सकेव्हेटर्स JS 130 W’ आणि JS 200W अशी मोठी रेंज त्यांनी डेव्हलप करून मार्केटमध्ये आणली आहेत.

इंडस्ट्रीयल आणि अग्रीकल्चरल व्हील्ड लोडर्स कॉम्पॅक्ट ६ टन ते २५ टन अशी रेंज ही उपलब्ध करून दिलेली आहे. ट्रॅक्टर क्षेत्रात जेसीबीची Fastrac सिरीज प्रसिद्ध आहे.

 

fastrack tractor inmarathi

 

मिलिटरीसाठी अनेक लोडिंग व्हेईकल्स जेसीबीने बनवली आहेत.तसेच उतख्तनन करण्यासाठी सुद्धा मशिनरी बनवून दिलेली आहे.

जेसीबीचे लँड स्पीड रेकॉर्ड हे व्हेईकल “जेसीबी डिझेलमॅक्स” नावाने ओळखले जाते ज्यात दोन मोटर्स वापरून एका मोटरने पुढील चाके चालतात तर दुसऱ्या मोटरने मागील चाके चालतात.

 

jcb inmarathi

 

जेसीबी फोन आणि स्मार्ट फोनच्या क्षेत्रात देखील उतरली आहे.

जेसीबीचा लोगो लेस्ली स्मिथ यांनी बनवला आहे आणि बेस्ट लोगोचे अवार्ड जिंकले आहे. जेसीबी इन्शुरन्स क्षेत्रात उतरली आहे हे कित्येकांना ठाऊकच नाही.

अशी आहे ही जेसीबीची कहाणी.सर्वांना प्रेरणादायी ठरणारी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?