बिल्डिंगला आग लागली तर गोंधळून न जाता नेमकं काय करायचं? लक्षात ठेवा, इतरांनाही सांगा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
‘आग लागली’ हा शब्दच इतका भीतीदायक आहे की, माणूस हातातलं काम सोडून पळून जाण्यास तयार होतो.
‘डोंगराला आग लागली पळा पळा’ हेच आपण शिकत आलोय, तर असं नुसतं पळून किंवा गोंधळून न जाता आग लागल्यावर नेमकं काय करता येईल याचा विचार करुया.
खरं आहे की, उपदेश देणं सोपं असतं, पण निदान १० गोष्टी माहिती असतील तर त्यातील ४ तरी आपण प्रतिकूल परिस्थितीत करू शकतो.
मागील वर्षी, सुरतमध्ये एका कोचिंग क्लासच्या बिल्डिंगला आग लागली.
जीव वाचवण्यासाठी म्हणून मुलांनी चौथ्या माळ्यावरून उड्या मारल्या त्यात १५ मुलं गेली. मुलांनी उड्या का मारल्या? तर आगीशी सामना कसा करायचा याचं शिक्षणच त्यांना दिलं गेलं नव्हतं.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत काय करावं याचं शिक्षण शाळा-कॉलेजातून दिलं गेलं तर बरेचसे धोके टळतील.
विशेषत: मोठ्या बिल्डींगमध्ये म्हणजे हॉस्पिटल, हॉटेल, चित्रपटगृहं, उंच इमारती, डिपार्टमेंटल स्टोअर, गोदाम, जंगल याठिकाणी असणाऱ्या वस्तुंमुळे (चिमणी, कपडे, कापूस, चारा) या ठिकाणी आग लागण्याची आणि लगेच पसरण्याची शक्यता जास्त असते.
तर आग लागल्यावर काय काय करता येईल याची माहिती आपण घेऊ. सर्वांत प्रथम आग कशामुळे लागू शकते याचा आधी आपण विचार करू.
१. रासायनिक प्रक्रियेमुळे (प्रयोगशाळा)
२. वणवा (जंगल)
३. शॉर्ट सर्कीट (विद्युत)
४. गॅस सिलेंडर किंवा एखादी स्फोटक वस्तू. (हॉस्पिटल, घरं, हॉटेल्स, इमारती)
५. सोसाट्याचा वारा (हवामान)
६. ज्वालाग्रही पदार्थ (घरं, हॉटेल्स, इमारती)
आग लागू नये यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय तसेच कायदे करण्याची आवश्यकता आहे. prevention is better than cure (प्रतिबंध हे उपचारापेक्षा चांगले) अशी म्हण आहे.
१. स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर निरीक्षण सेवा, प्रतिबंध आणि अलार्म सेवा आयोजित करणे. अमेरिकेमध्ये घरामध्ये धूर झाला तर अलर्ट म्हणून जोरजोरात अलार्म वाजतो. त्यामुळे तिकडे हे संभाव्य धोके आधीच लक्षात येतात.
घरात किंवा इमारतीत धूर झाला आणि तो आपल्या निष्काळजीपणामुळे झाला असेल तर त्यासाठी दंड असतो. म्हणजेच आग लागू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय त्यांनी केलेले आहेत.
२. जंगलात किंवा परिसरात उपस्थित असलेल्या सर्व लोकसंख्येद्वारे अग्नीचा नियंत्रित वापर करा या कायद्याची अंमलबजावणी करणे.
३. सज्जता व्यवस्थापन आणि प्राधिकरणाच्या हस्तक्षेपांच्या माध्यमांच्या वापराचा समन्वय आणि लोकसंख्येसाठी माहिती आणि अलार्म सेवांचा समन्वय साधणे म्हणजे रेडिओ नेटवर्क आवश्यक आहे.
४. आग लागण्याच्या धोक्यामुळे, अलर्ट प्लॅन (मूलभूत हस्तक्षेप योजना) सक्रीय करणे आवश्यक आहे.
५. हस्तक्षेप यंत्रणा करणे आणि कॉक्रिटिझेशन यासाठी जबरदस्त व कार्यक्षम उपकरणांचे समन्वय सुनिश्चिशत करण्यासाठी विशिष्ट व्यवस्थापन कार्यक्रमांची स्थापना करणे आवश्यक आहे.
६. लहान मुलांपासून माचिस आणि लाइटर्स लांब ठेवा, ज्वलनशील वस्तूंच्या आसपास सावधगिरी बाळगा.
७. उष्णतेच्या कोणत्याही स्रोताजवळ ज्वलनशील उत्पादने (अल्कोहोल, पेट्रोल, गॅस, कंटेनर्स, पेपर, कापड, वाळलेल्या भाज्या, पदार्थ इत्यादी) ठेवू नका.
८. आग संबंधित सूचना जाणून घ्या, संरक्षण उपायांबद्दल जाणून घ्या. गॅस आणि वीज कंट्रोलाची ठिकाणे जाणून घ्या आणि घरगुती फायर-फाइटिंग उपकरणे वापरा.
९. धुम्रपान करू नका. प्रकाशात आग लावू नका.
१०. अग्निशामक व नागरी संरक्षण सेवा आणि पोलिसांचे दूरध्वनी क्रमांक माहीत असावा.
११. हिंसक वायुच्या दरम्यान जंगलात, वृक्षारोपण, शेतीविषयक प्रतिष्ठान लाकडी घरे इत्यादीमध्ये राहणे, अग्निशामक प्रकाश किंवा धूम्रपान करणे प्रतिबंधित करण्याचा निर्देश.
१२. अधिकार्यांच्या नियम आणि आदेशांचे पालन, त्यांचे नियंत्रण आणि अग्निशमन किंवा पोलीस सेवा प्रतिनिधींचे पालन करणे.
तर हे झालं आग लागू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय. तरीही आग लागलीच काय करता येईल याचा विचार करुया.
१. आग लागल्यावर सर्वांत आधी अग्निशामक दलाला कळवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्याकडे अग्निशामक दलाचा नंबर असणे अत्यावश्यक आहे.
२. बिल्डिंगमध्ये असलेल्या व्यक्तींना धोक्याची सुचना देऊन त्यांना बाहेर येण्यास मदत करा. लहान मुलं कोणी आत राहिली नाहीत ना याची काळजी घ्या. संकटकाळी बाहेर पडण्याच्या मार्गाचा अवलंब करा.
३. वाऱ्याने आग वाढेल म्हणून सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद करा.
४. लिफ्टचा वापर करू नका. बिल्डींग सोडण्यासाठी पायऱ्यांचा वापर करा. जर पायऱ्या धुराने किंवा आगीने भरल्या असतील तर फ्लॅटमध्येच आगीापसून संरक्षण होईल अशा ठिकाणी राहा आणि बंद खिडकीतूनही तुमची उपस्थिती जाणवेल याची काळजी घ्या.
५. आग विझवण्यासाठी असलेल्या सर्व उपलब्ध साधनांसह आगीशी लढा द्या. म्हणजे बाथरूम किंवा सिंकचा वापर करून भांड्यातून, बादलीतून पाणी ओतणे, कांबळ्याचा वापर करा. त्यातसुद्धा जर विद्युत यंत्रणेमुळे आग लागली असेल तर पाण्याचा वापर करू नका.
आगीचा जोर कमी झाल्यानंतर
१. आपल्या अंगावर आगीसाठी प्रतिबंधक वस्तू परिधान करा. (लेदर शूज, ग्लोव्हज, टोपी, कॉटन कपडे)
२. आपल्या घराची तपासणी करा आणि जळत असलेले विझवण्याचा प्रयत्न करा.
३. आपल्या घराभोवतालच्या झाडांना पाणी द्या आणि छोट्या ज्वाळांना पाण्याने विझवा.
४. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याच्या सूचना तंतोतंत पाळा.
अग्निशामक संरक्षण मॅनेजमेंट आणि आपत्ती संरक्षण व्यवस्थापन या संस्थांनी घ्यावयाची काळजी
* अग्निशामक दलाची मुख्य जबाबदारी असते ती जास्तीत जास्त संरक्षण देणे आणि कमीत कमीत विध्वंस टळेल याची काळजी घेणे. त्यासाठी त्यांना अतिशय जबाबदार माणसांची निवड करणे आवश्यक आहे. अग्नीसुरक्षा व्यवस्थापनासाठी ते जबाबदार आहेत.
* एक व्यक्ती अग्नी सुरक्षा आणि आपत्ती संरक्षक व्यवस्थापक म्हणून असणं आवश्यक आहे.
अग्नी संरक्षणाचे व्यवस्थापनाने खालील गोष्टी करण्याची गरज आहे –
* अग्नी सुरक्षा व्यवस्थापनसाठी अग्नी संरक्षणाची योजना तयार करणे.
* अग्नीशामक प्रशिक्षण, आणीबाणी अहवाल आणि निर्वासन प्रशिक्षण
* अग्नीसंरक्षणाचे उपकरणे तपासणी आणि देखभाल
* खुल्या फ्लेम, उष्णता इत्यादीच्या योग्य हाताळणीमध्ये मार्गदर्शन
* निर्वासन/अग्निरोधक यंत्रणा आणि उपकरणे यांचे व्यवस्थापन व देखभाल
* इमारतीमधील लोकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवा.
जर अग्नीशामक दलाने आपल्याला मदत केली नाही तर त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई होऊ शकते त्यामुळे आपल्याला मदत करणे हे त्यांना बंधनकारक असते.
कोणत्याही कारणास्तव ते मदत करणं किंवा सेवा देणं टाळू शकत नाहीत. कारण ही अत्यावश्यक सेवा आहे. यावर लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो.
तर मंडळी ही थोडीफार माहिती आपल्याला असेल तर आपण आपल्यावर आलेल्या आव्हानांना सामोरे जाऊ शकता. ‘देव न करो आणि कोणावर अशी वेळ येवो.’ पण थोडीफार प्राथमिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे.
घरातसुद्धा आपण छोटीछोटी काळजी घेणं आवश्यक आहे. कधीतरी गॅस शेगडीचं बटण सुरूच राहतं आणि फ्लेम मात्र बंद असते त्यामुळे त्यातून गॅस नुसताच बाहेर पडत असतो. किंवा सिलेंडर लिक झालेला असतो अशा वेळी आधी खिडक्या उघडून टाका.
लाईट, पंखा, काडेपेटी कशाचाही वापर करू नका. सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करा आणि सर्व गॅस बाहेर गेला आहे याची खात्री झाल्यावरच कामाला सुरुवात करा.
ओल्या हातांनी लाईट, मिक्सर, पाण्याचा गिझर किंवा कोणतेही विद्युत उपकरण हाताळू नका. कितीही गडबड असली तरी. असं म्हणतात ‘अती घाई, संकटात नेई.’
घरातून जेव्हा ८-१० दिवसांसाठी बाहेर जाणार असाल तेव्हा मेन स्वीच बंद करा. गॅसचा रेग्युलेटर बंद करा. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी पाळून जीवनातील धोक्याला दूर ठेवा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.