Site icon InMarathi

या कारणांमुळे सोशल मीडियावर “जेसीबी”ने धुमाकूळ घातला होता, आठवतोय?

viral jcb inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

(पुनः प्रकाशित)

===

आपण रस्त्यावरून जात असताना कधी कधी एखाद्या बांधकामाच्या साईटवर खूप गर्दी झालेली आपल्याला दिसते.

 

JCB

आपण उत्सुकतेने तिथे बघायला गेलो तर आपल्याला दिसते की तिथे जेसीबीच्या साहाय्याने काहीतरी काम सुरु आहे आणि लोक अगदी मन लावून “जेसीबी की खुदाई” बघत उभे असतात.

लहान मुलांना जेसीबीचे आकर्षण वाटतेच, त्यांच्या खेळण्यांमध्ये एक तरी जेसीबी असतोच. पण मोठ्या मोठ्या वयस्क लोकांना सुद्धा जेसीबीच्या खोदकामात काय इतका रस वाटतो हे एक न उलगडलेले कोडे आहे.

रस्त्यावर कुठेही जेसीबीचे काम सुरू असेल तर लोक तिथे एखादी मनोरंजक मॅच किंवा सिनेमाचे शूटिंग सुरु असल्यासारखे आणि आपल्याला काहीच कामधंदा नसल्यासारखे तिथे उभे राहून जेसीबीचे खोदकाम बघत गर्दी करतात.

 

YouTube

सध्या सोशल मीडियावर सुद्धा “जेसीबी की खुदाई” ट्रेंडिंग आहे. फेसबुक म्हणू नका, इंस्टाग्राम म्हणू नका अगदी ट्विटरवर सुद्धा सगळ्या महत्वाच्या घडामोडी सोडून लोक “जेसीबी की खुदाई” बघत आहेत.

सगळीकडे ह्या जेसीबीच्या जोक्सने, मिम्सने अक्षरश:धुमाकूळ घातला आहे. ट्विटरवर तर “#JCBKiKhudayi” ह्या हॅशटॅगखाली हजारो मिम्स ट्विट रिट्विट होत आहेत. जेसीबीच्या ट्विटट्वीवाटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे.

आपल्याकडे लोकांना त्या जेसीबीच्या खोदकामाचे काय आणि का आकर्षण वाटते हे कळत नाही.

लोकांना ती अवाढव्य मशीन इतकी आवडते की मध्यंतरी एक नवरदेव स्वतःच्या लग्नाच्या वरातीला जेसीबी मशीनमध्ये बसून आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यावर सुद्धा अनेक मनोरंजक प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

तसेच जेसीबी मशीनने केलेल्या खोदकामाचा सामान्य साधा व्हिडीओ सुद्धा १० ते ४० लाख लोकांनी बघितला आहे. खरंच का आपल्याकडे इतके रिकामटेकडे लोक आहेत जे जेसीबी मशीनचे काम ऑनलाईन सुद्धा बघतात? असतीलच म्हणा!

 

YouTube

त्याशिवाय का जेसीबीचे खोदकाम मन लावून बघायला रस्त्यांवर इतकी गर्दी जमते? मध्यंतरी ह्यावर एक जोक सुद्धा वाचनात आला होता की पाकिस्तान सुपर लीगच्या मॅचेसना सुद्धा इतके प्रेक्षक नसतात जितके प्रेक्षक आमच्याकडे जेसीबीचे खोदकाम बघायला असतात.

आपल्याकडे काय, लोक इतके क्रिएटिव्ह आहेत की त्यांना फक्त एक हॅशटॅग हवा असतो आणि मग सगळे डोकेबाज लोक त्या एका हॅशटॅगवर शेकडो मिम्स बनवून लगेच व्हायरल करून टाकतात.

आता ही जेसीबीचे खोदकाम बघायला येणाऱ्या लोकांना ट्रोल करण्यासाठी असेच शेकडो मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण मध्येच हे जेसीबी की खुदाई इतके ट्रेंडिंग होण्याचे कारण काय?

काही लोक म्हणतात जेव्हा तो जेसीबी लव्हर नवरदेव स्वतःच्या लग्नाला फुल स्वॅगमध्ये जेसीबी घेऊन अवतरला, तेव्हापासून “जेसीबी की खुदाई” हा हॅशटॅग ट्रेंडिंग झाला.

 

thenewsminute.com

तसेही आपल्याकडच्या लोकांना जेसीबीविषयी एक अनामिक आकर्षण आहेच, त्यात असा हा नवरदेव व्हिडीओमध्ये दिसल्यावर तर लोकांच्या डोक्याला चालना मिळाली आणि विनोदबुद्धी अक्षरश: बहरात आली आणि जेसीबीवर व भारतीयांच्या जेसीबीप्रेमावर शेकडो मिम्स तयार झाले.

सिनेतारका आणि लाखो लोकांच्या ह्रदयाची धडकन असलेल्या सनी ताई लिओनीला सुद्धा जेसीबीचा मोह आवरला नाही आणि तिनेही जेसीबीवर उभे राहून एक फोटो काढून “करियर चेंज? lol” ह्या कॅप्शन सह तिच्या ट्विटर हॅन्डलवर तो फोटो टाकला.

 

 

“जेसीबी की खुदाई’ हा ट्रेंड आणखीनच लोकप्रिय होण्यास मदत केली.

ह्या ट्रेंडमध्ये प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब ह्यांच्या नावाखाली नवशायरांचे शेर खपू लागले आहेत.

“दिल मेरा टूटा था जब की थी उसने जुदाई,

अब तो झोला उठा कर चल देता हू देखने जेसीबी की खुदाई”

आणि

“यहां खुदा है, वहां खुदा है,

जहाँ नहीं खुदा… वहां कल खुदेगा”

असे शेर मिम्समध्ये जेसीबीच्या फोटोंसह सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि ह्या मिम्सवर ढिगाने लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. ह्या मिम्सवर लोकांची मोठ्या प्रमाणावर टॅगाटॅगी सुरु आहे.

तर सोशल मीडियावरील पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि प्रेरणादायी व्हिडीओ आणि कोट्सचा साईड इफेक्ट म्हणून काही लोक ह्यात सुद्धा काहीतरी मोटिव्हेशनल शोधून काढत आहेत.

पार्थ चौहान नावाचा तरुण म्हणतो

“I’d like to take a moment and would love to say how much watching JBC digging and being used in construction has changed my life, i remember when i first saw JCB it was looking like beast and that moment i suddenly knew this is next big thing. JBC has taught me to be strong in lyf”

 

 

“भीड का हिस्सा नाही, भीड का कारण बनो! – जेसीबी

तर अश्या प्रकारे जेसीबीने ऍव्हेंजर्स आणि गेम ऑफ थ्रोन्सला मागे टाकत सोशल मीडियावर पहिला क्रमांक मिळवण्यात यश मिळवले आहे. लोक म्हणत आहेत की ,”Move over Avengers and Game of Thrones. JCB has an altogether separate fan base.”

आपल्या लोकांचे जेसीबीप्रेम आणि हा जेसीबीकीखुदाई ह्या ट्रेंडची खुद्द जे. सी. बॅमफोर्ड एक्सकेव्हेटर्स लिमिटेड उर्फ जेसीबी ह्या ब्रिटिश कंपनीने सुद्धा दखल घेतली आहे.

त्यांच्या ट्विटर हॅन्डलने ह्या हॅशटॅग्सची दखल घेत त्यावर “व्हॉट अ डे!” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी पुढे भारतीयांचे आभार व्यक्त हि व्यक्त केले आहे.


अश्याप्रकारे जेसीबी ट्रेंड ने भारतीयांचा एक संपूर्ण दिवस आनंदात गेला आहे !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version