Site icon InMarathi

सर्व ऋतूंमध्ये उन्हामुळे त्वचा रापते… त्यावरील सोपे घरगुती उपाय

Home-Remedies-For-Anti Tan Feature inMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

भारतात उष्णकटिबंधीय वातावरण असल्याने वर्षातले बहुतांश दिवस कडक ऊन असते. उन्हाळ्यात तर कानाला रुमाल बांधल्याशिवाय बाहेर पडणे गुन्हा आहे.

अशा उन्हात जर चेहेरा न झाकता आणि ग्लोव्ज न घालता गाडी चालवली किंवा फिरलो तर चेहरा आणि इतर ठिकाणची त्वचा हमखास काळवंडतेच.

 

 

प्रखर सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांमुळे त्वचेवर गंभीर परिणाम होतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

हे टॅन घालवणे नंतर फारच कठीण होऊन बसते आणि त्यासाठी विविध महागडी क्रीम्स, फेस पॅक्स आणि डी टॅन ट्रीटमेंट आहेत ज्यावर हजारो रुपये खर्च होतात.

 

 

पण आज आपण असे काही घरगुती उपाय बघणार आहोत जे तुम्ही नियमित केलेत तर तुमची रापलेली त्वचा पूर्ववत होण्यास नक्की मदत होईल. त्याचबरोबर तुम्हाला उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे सुद्धा गरजेचे आहे.

हे उपाय करून बघा आणि आपल्या त्वचेची ह्या कडक उन्हात काळजी घ्या.

१.लिंबाचा रस

लिंबाचा रस त्वचेसाठी चांगला असतो हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. एक लिंबू घ्या आणि ते मधोमध अर्धे चिरून घ्या. आणि कापलेले लिंबू तुमच्या टॅन झालेल्या त्वचेवर हळुवार चोळून घ्या.

 

 

थोड्यावेळ थांबून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला जर जखम झाली असेल किंवा भाजलेले वगैरे असेल तर त्या ठिकाणी लिंबू चोळू नका नाहीतर त्वचेची आग होऊ शकेल. लिंबू हे सी व्हिटॅमिनचा खजिना आहे.

तसेच त्यात सायट्रिक ऍसिड सुद्धा असते. त्यामुळे ते नैसर्गिक स्किन ब्राईट्नर आहे. व्हिटॅमिन सी हे खूप चांगले अँटी ऑक्सिडन्ट सुद्धा आहे त्याने कोलॅजेन प्रॉडक्शन वाढते. त्यामुळे त्वचेसाठी लिंबाचा उपयोग करणे सोपे आणि अतिशय उत्तम आहे.

ह्याने चेहेऱ्यावरील मुरूम व पुरळ सुद्धा कमी होऊ शकते आणि ब्लॅकहेड्स सुद्धा कमी होतात. फक्त तुमच्या चेहेऱ्याच्या त्वचेला सूट होते की नाही ह्याची खात्री करून घेऊन तुम्ही डी टॅनिंगसाठी लिंबाच्या रसाचा उपयोग करू शकता.

२. काकडीचा रस आणि गुलाबपाणी

लिंबाप्रमाणेच काकडी सुद्धा त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. काकडी व गुलाबपाण्याने त्वचा तजेलदार होते. काकडीचा रस, लिंबाचा रस व गुलाबपाणी समप्रमाणात घेऊन ते कापसाच्या साहाय्याने तुमच्या टॅन झालेल्या त्वचेवर लावा आणि थोड्यावेळाने पाण्याने धुवून घ्या.

 

 

ह्या उपायाने तुमची तुमच्या त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यास मदत तर होईलच शिवाय तुमची त्वचा निरोगी व तजेलदार राहील.

काकडीने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते शिवाय त्यात व्हिटॅमिन सी आणि कॅफेईक ऍसिड असल्याने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

कुठे सूज आली असेल तर काकडीच्या रसामुळे ती सूज कमी होण्यास मदत होते. किंवा भाजले असल्यास त्यावर काकडीचे काप ठेवल्यास त्यातील नैसर्गिक घटकांमुळे त्वचेची आग होणे थांबते.

३. हळद आणि बेसनाचा लेप

हळद आणि बेसन हे त्वचेसाठी चांगले आहे हे तर आपल्या आज्या पणज्या लहानपणापासून आपल्याला सांगत आल्या आहेत. दोन टेबलस्पून बेसनपिठात थोडीशी हळद घाला आणि त्यात थोडे दूध व गुलाबपाणी घालून लेप तयार करा.

 

 

टॅन झालेल्या त्वचेवर हा लेप लावा आणि पंधरा वीस मिनिटे ठेवून नंतर धुवून टाका. हा तर अगदी खात्रीशीर उपाय आहे तसेच सोपा सुद्धा आहे. बेसन, हळद ,दुध ह्या वस्तू तर घरात सहजरित्या उपलब्ध असतात.

आंघोळीच्या आधी हा उपाय करणे अगदीच सोपे आहे. टॅन कमी करण्याबरोबरच बेसन पीठ मुरूम सुद्धा कमी करण्यास मदत करते तसेच तेलकट त्वचा असेल तर बेसनाचा उपयोग केल्याने त्वचेचा तेलकटपणा कमी होतो.

हळद तर अँटी बॅक्टरीयल म्हणून आपल्याला माहितच आहे. हळद अतिशय गुणकारी असल्यामुळेच आपल्याकडे नवरा नवरीला लग्नाआधी हळद लावतात.

४. मसूर, टोमॅटो आणि कोरफड

एक टेबलस्पून मसूर डाळ पाण्यात भिजवून घ्या आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या. ह्यात टोमॅटोची पेस्ट आणि कोरफडीचा गर समप्रमाणात घालून मिसळून घ्या आणि हा लेप तुमच्या टॅन झालेल्या त्वचेवर लावा.

 

 

तीस मिनिटे हा लेप लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या. मसूर डाळ ही नॅचरल स्किन ब्राईट्नर आहे. ह्याने तुमची त्वचा स्वच्छ होते आणि मऊ होते. तसेच तिला पोषण मिळते आणि त्वचेचा तेलकटपणा सुद्धा कमी होतो.

स्क्रब म्हणून तर मसूर डाळ अतिशय उत्तम आहे. ह्याने तुमच्या त्वचेची रंध्रे टाईट होतात. टोमॅटो सुद्धा टॅनिंग कमी करण्यासाठी अतिशय गुणकारी आहे.

टोमॅटोमध्ये लायकोपेन हे अँटी ऑक्सिडन्ट असते त्याने त्वचेचे आरोग्य आणि पोत सुधारतो. आणि सुरकुत्या कमी होतात. कोरफडीचे गुण तर सर्वांनाच ठाऊक आहेत. उत्तम त्वचेसाठीचे अतिशय खात्रीशीर औषध म्हणून कोरफडीचे नाव घेतले जाते.

५. मध आणि पपई

मध हासुद्धा हळदीप्रमाणेच अँटी बॅक्टेरियल आहे. त्यात भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट्स आहेत आणि मधामुळे त्वचेला तजेला व तेज मिळते. तसेच टॅनिंग निघून जाण्यास मध अतिशय फायदेशीर आहे.

 

 

पिकलेल्या पपईच्या गरामध्ये एक टेबलस्पून मध घाला व हा लेप टॅन झालेल्या त्वचेवर लावून तीस मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. पपईमधील नैसर्गिक घटक त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.

टॅनिंगवर पपई हा एक खात्रीशीर उपाय आहे. त्यातील काही एन्झाइम्समुळे नैसर्गिकपणे त्वचेवरील डाग आणि व्रण फिकट होतात आणि त्वचा तजेलदार होते व टॅनिंग निघून जाते.

पपईमधील पोटॅशियम त्वचेला हायड्रेट करते आणि निस्तेज त्वचेवर तकाकी येते, तजेला येतो. कोरड्या त्वचेसाठी तर पपई हे गुणकारी औषध आहे.

६. ओट मील व ताक

ह्याचप्रमाणे ओट मील व ताक सुद्धा टॅनिंग कमी करण्यास फायदेशीर आहे. २ टेबलस्पून ओटमीलमध्ये ३ टेबलस्पून ताक घाला व हा लेप टॅन झालेल्या त्वचेवर लावून हळुवारपणे गोलाकार मसाज करा. थोड्यावेळाने धुवून टाका.

ताक तर त्वचेसाठी अतिशय उत्तम औषध आहे. रोज ताक प्यायल्याने पोटाचे आरोग्य तर सुधारतेय,शिवाय त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. ताकाप्रमाणे दही सुद्धा त्वचेसाठी पोषक आहे.

दही व टोमॅटोचा रस एकत्र करून तो लेप टॅन झालेल्या त्वचेवर लावा व अर्ध्या तासाने धुवून टाका. दही हे नॅचरल अँटी बॅक्टरीयल व अँटी फंगल आहे. दह्याने त्वचेवरील मृत पेशी सहज निघून जातात आणि टॅनिंग कमी होते.

 

 

तसेच सुरकुत्या सुद्धा कमी होतात. दह्यात लॅक्टिक ऍसिड असल्याने ते नैसर्गिकपणे ब्लीचिंगचे काम करते. त्यामुळे दही हे नैसर्गिक स्किन व्हाईट्नर आहे असे म्हणायला हरकत नाही.

७. तसेच स्ट्रॉबेरी आणि संत्र्यासारखी फळे सुद्धा टॅन कमी करण्यास मदत करतात.

संत्र्यात असलेल्या सायट्रिक ऍसिड मुळे त्वचेचा काळपटपणा कमी होऊन त्वचेचा पोत आणि आरोग्य सुधारते कारण संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात. तसेच स्ट्रॉबेरीमध्येही व्हिटॅमिन सी असल्याने त्या सुद्धा स्किन व्हाईटनिंगचे काम करतात.

तसेच त्वचेवरील डाग आणि व्रण सुद्धा पुसट होतात. स्ट्रॉबेरीमुळे त्वचेचा तेलकटपणा सुद्धा कमी होतो आणि त्वचेला पोषण मिळते. संत्र्याचा लेप करण्यासाठी एक टेबलस्पून संत्र्याचा रस आणि दही एकत्र करून टॅन झालेल्या त्वचेवर लावा आणि अर्ध्या तासाने धुवून टाका.

तुम्हाला स्ट्रॉबेरीचा लेप करायचा असल्यास दोन टेबलस्पून दुधाच्या सायीमध्ये ५ स्ट्रॉबेरींचा गर घालून एकत्र करा आणि हा लेप टॅन झालेल्या त्वचेवर लावा. आणि अर्ध्या तासाने धुवून टाका.

 

 

ह्याने तुमच्या त्वचेवरील टॅनिंग कमी होण्यास नक्कीच मदत होईल. ह्याशिवाय चंदन हे सुद्धा त्वचेसाठी एक उत्तम औषध आहे. चंदनातील नैसर्गिक तत्त्वांमुळे चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या कमी होतात.

त्वचेवरील टॅनिंग जाते, सुरकुत्या कमी होतात. सनबर्नवर तर चंदन हा एक रामबाण उपाय आहे. रोज रात्री झोपताना चंदन उगाळून लावल्यास हमखास फायदा होतो. ह्याने त्वचेला थंडावा तर मिळतोच शिवाय त्वचा तजेलदार होते.

 

 

वरील सर्व उपाय हे सोपे आणि घरच्या घरी अगदी कमी वेळात करण्यासारखे आहेत. हे उपाय नियमित केलेत तर तुमची रापलेली त्वचा परत निरोगी आणि तजेलदार होण्यास नक्की मदत होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version