आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पंचमहाभूतांचे बनलेले आपले शरीर आपण किती काळजीपूर्वक सांभाळतो? बहुतांश लोक याचं होकारार्थी उत्तर देणार नाहीत. जोपर्यंत आपण फार आजारी पडत नाही तोवर आपल्याला या निरोगी असण्याची किंमत कळत नाही.
आपण वेळी अवेळी अरबट चरबट खातो, हाॅटेलातील तेलकट, तळकट, आंबवलेले शाकाहारी, मांसाहारी पदार्थ खातो. त्याचे परिणाम वेगवेगळ्या स्वरुपात समोर येतात. वजन वाढणं, अपचन होणं, चयापचय क्रिया बिघडतंय हे त्याचेच परिणाम.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
चयापचय क्रिया-
आपलं शरीर जिवंत आणि क्रियाशील ठेवणारी ही एक रासायनिक क्रिया आहे. आपण किती कॅलरीज खर्च करतो त्यावर आपले वजन नियंत्रणात ठेवणे या चयापचय क्रियेमुळे शक्य होते.
उत्तम चयापचय क्रिया आपल्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करते. मात्र ही चयापचय क्रिया वय, लिंग, शरीरातील चरबी, स्नायूंची क्षमता, आणि अनुवंशिकता यावर अवलंबून असते.
आपण जास्त निरोगी आणि क्रियाशील राहू शकतो. ही चयापचय क्रिया व्यवस्थित रहावी यासाठी काही नियम पाळावेत. काय आहेत ते नियम?
===
हे ही वाचा – रोजच्या वापरातील ‘या’ २ पदार्थांचं मिश्रण आहे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी
===
१. प्रथिनांचे प्रमाण वाढवणे-
रोजच्या आहारात प्रथिनांचा वापर जास्तीत जास्त करावा. Thermic Effect म्हणजे औष्णिक परिणाम जो शरिरातील चयापचय क्रिया १५-३०% वाढवण्याची क्रिया प्रथिने पार पाडतात.
हे प्रमाण कर्बोदके आणि मेदाच्या तुलनेत फार जास्त आहे. त्यामुळे प्रथिनांचे सेवन तुम्हाला जाडी वाढण्यापासून रोखू शकते.
स्नायूंना कार्यक्षम ठेवण्याचं काम प्रथिने करतात. म्हणजे जाडी वाढते म्हणून तुम्ही डाएटींग करु लागला तर स्नायूंची झीज होऊ नये म्हणून प्रथिने मदत करतात.
२. भरपूर पाणी प्या
गोड प्येय जसं चहा कॉफी किंवा फळांचा रस पिण्यापेक्षा भरपूर पाणी प्या त्यामुळं वजन वाढणं थांबेल आणि वजनाचा काटा स्थिर राहील.
पेय प्यालामुळे त्यातील साखर आणि पाणी वेगळे करण्यासाठी जास्त कॅलरीज खर्च होतात.
तर पाणी पचवण्यासाठी शरीराला वेगळं काही करावं लागत नाही. पाणी पिण्यानं चयापचय क्रियेचा वेग वाढतो. शरीराचे तापमान योग्य राखले जाते. जेवणापूर्वी अर्धा तास पाणी प्याल्याने तुमच्या खाण्यावर नियंत्रण राहते.
याचा उपयोग वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. जेवणापूर्वी अर्धा लिटर पाणी पिणाऱ्या लोकांना ४४% आहार नियंत्रण ठेवणे शक्य होते हा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला.
३. जेवणाच्या वेळा पाळा-
रोज जेवणाची एक वेळ ठेवा. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि चयापचय क्रिया व्यवस्थित चालते.
जर एखादा माणूस बराच काळ न जेवता काम करत राहीला तर शरीर कॅलरीज हळूहळू खर्च करते आणि मेद म्हणजे चरबी साठवून ठेवते त्यामुळे जाडी वाढते.
४. कॅलरीज सेवन-
या सर्व गोष्टी सोबतच योग्य प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ सेवन करणे महत्त्वाचे आहे.
एखादा माणूस वजन कमी करण्यासाठी व खाता भूक मारत राहीला तर त्याचा विपरीत परिणाम चयापचय क्रियेवर होतो.
शरीर कॅलरीज साठवून ठेवते आणि चयापचय क्रिया मंदावते.
५. भरपूर व्यायाम करा-
यामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होऊन चयापचय क्रिया सुधारते.
HIIT म्हणजे High Intensity Interval Training. शरीरातील चरबी कमी करतात.
६. वजन उचलणे-
स्नायूंना कार्यक्षम ठेवण्याचं काम उत्तम चयापचय क्रिया करते. चरबीयुक्त पदार्थ टाळणे हे कधीही उत्तमच आहे. वजन उचलण्याच्या प्रक्रियेत कॅलरीज खर्च करुन स्नायू बळकट होतात आणि चयापचय क्रिया सुधारते.
===
हे ही वाचा – अगदी सहज उपलब्ध होणा-या या बहुगुणी फळाकडे लक्ष देणं तुमच्यासह कुटुंबियांसाठीही गरजेचं आहे
===
एका अभ्यासात असे लक्षात आले की, ४८ अतिजाड स्त्रीयांना ८०० कॅलरी युक्त आहार दिवसाला दिला व कोणताही व्यायाम जसे एरोबिक्स करु दिले नाही. त्यांच्या वजनात घट झाली पण स्नायू शिथिल झाले व चयापचय क्रिया कमी झाली.
त्यावरुन निष्कर्ष काढला की – वजन उचलण्याचा व्यायाम करणे शरीरातील स्नायू बळकट करतो त्याचबरोबर चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवतो.
७. उभं रहा-
बैठं काम हा वजनकाटा वाढवणारा फार मोठा भाग आहे. कारण जास्त वेळ बसून काम करत राहिल्यास कमी कॅलरीज खर्च होतात
आणि वजन वाढते.
पण थोडा वेळ उभ्याने काम केलं तर १७४ कॅलरीज खर्च होतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.
जर तुमचं बैठं काम असेल थोडा वेळ उभ्याने काम करा.म्हणूनच रोज थोडा वेळ उभ्याने काम करा.
८. ग्रीन टी-
रोज सकाळी आपण दुधात चहा करतो त्यापेक्षा ग्रीन टी हा उत्तम पर्याय आहे. यातील घटकांचा उपयोग चयापचय क्रिया चांगल्या रितीने होण्यासाठी होतो. तुमच्या शरीरातील चरबीचे रुपांतर आम्लात करायचे काम ग्रीन टी करतो.
त्यामुळे वजन कमी करणे व कमी झालेले वजन कायम राखण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त आहे.
९. मसालेदार पदार्थ
मिरीमधील घटक तुमचे स्नायू कार्यक्षम ठेवण्याचं काम उत्तम रित्या करतात. एका अभ्यासात असे आढळले आहे की, capsaicin ची योग्य मात्रा १० कॅलरीज जाळते.
थोडक्यात मसाले युक्त आहार तुमची चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवतो.
१०. शांत झोप-
कमी झोप किंवा अनिद्रा हे सुद्धा वजनदार होण्याचं एक कारण आहे. झोप नीट न झाल्याने चयापचय क्रिया बिघडते. शरीरातील रक्त, साखर यांचे प्रमाण वाढते.
इन्सुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि परिणामी मधुमेह आणि रक्तदाब यासारखे विकार होतात, संप्रेरकांचे कार्य बिघडते.
त्यामुळे शांत आणि भरपूर झोप आरोग्यासाठी उत्तम आहे.
११. काॅफी प्या-
एका अभ्यासात हे सिध्द केले आहे की, काॅफी सेवनाने चयापचय क्रिया ३ ते ११% व्यवस्थितपणे चालते. पण सडपातळ लोकांवर याचा परिणाम जास्त जाणवला.
जाड स्त्रीयांमध्ये काॅफीने १०% कॅलरीज जाळल्या तर सडपातळ स्त्रीयांमध्ये २९%. पण काॅफीमुळे वजन कमी करणे व कमी वजन नियंत्रणात ठेवणे शक्य होते.
थोडक्यात काॅफीमुळे चयापचय क्रिया व्यवस्थित चालते व वजन नियंत्रणात ठेवणे शक्य होते.
१२. आहारात खोबरेल तेलाचा उपयोग-
इतर कोणत्याही तेलापेक्षा खोबरेल तेल हे चयापचय क्रिया नीट चालण्यासाठी मदत करते.कारण यात चरबीचे प्रमाण अत्यल्प असते. तुलनेने बटर, गोडेतेल यात चरबीचे प्रमाण जास्त असते.
त्यांच्या वापराने शरीरात मेद वाढतो आणि वजन वाढते. त्यामानाने खोबरेल तेल वापरणे हे जास्त उपयुक्त आहे.
१३. व्हिटॅमिन बी चे सेवन-
आहारात व्हिटॅमिन बी चे सेवन करणे महत्त्वाचे आहे. चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी महत्त्वाचा घटक आहे.
===
हे ही वाचा – तुरट चवीच्या आवळ्याचे हे ८ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या…
===
केळं, शिजवलेले बटाटे,अंडी, संत्र्याचा रस, शेंगदाणा बटर व कडधान्ये यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी असते.
हे सोपं साधं आहारशास्त्र पाळले तर तंदुरुस्त राहणे ही अवघड गोष्ट नाही.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.