Site icon InMarathi

“तुला पाहते रे” मधील या ६ हास्यास्पद चुकांनी मालिकेचा पुरता बाजार उठवून टाकलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

विक्रांत सरंजाम्यांच्या भूमिकेत असणाऱ्या सुबोध भावे व ईशा निमकरच्या भूमिकेत असणाऱ्या गायत्री दातार यांच्या ‘तुला पाहते रे’ मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात फार सुरुवातीपासूनच अत्यंत उत्कंठा होती.

महिला वर्ग तर विक्रांतच्या आकंठ प्रेमात बुडालेला होता.

त्यानंतर मात्र हळूहळू चर्चा व्हायला लागली ती मालिकेच्या शीर्षक गीतात असणाऱ्या सावलीतल्या चेहऱ्याची.

तो चेहरा होता शिल्पा तुळसकर यांचा, ज्या विक्रांतच्या पहिल्या पत्नी म्हणजे राजनंदिनी च्या भूमिकेत दिसणार आहेत हे नंतर स्पष्ट झालं.

 

marathistars.com

त्यानंतर ईशा म्हणजेच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे, आणि विक्रांतने केलेल्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी ती परत आलीये असे कथानक सुरू झाले.

विक्रांतला खलनायक रूपात पाहावे लागणार म्हणून हवालदिल झालेल्या महिलावर्गास गूढ कथेबाबत मात्र उत्सुकता होती.

पण राजनंदिनीच्या ईशा रुपातल्या पुनर्जन्माची ही गूढ कथा दाखवताना अनेक गंभीर चुका केल्या गेल्या आहेत, त्या तुमच्या लक्षात आल्या का?

१. ईशाचे वय

विक्रांत जेव्हा ईशाच्या पासपोर्टचे कारण काढून निमकरांकडून ईशाची कागदपत्रे मागवून घेतो, त्यात ईशाचा जन्माचे साल असते १९९८.

 

youtube.com

मात्र गेल्या काही भागांत जेव्हा मानसोपचारतज्ञांकडे ईशाचे वय विचारले जाते, तेव्हा तिचे बाबा – म्हणजेच अरुण निमकर उत्तरतात, २३ वर्षे. आता हे खरंच कळायला मार्ग नाही की, १९९८ सालच्या ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या ईशाचे वय २०१९ सालच्या मे पर्यंत २३ कसे काय झाले !!

२. राजनंदिनीच्या मृत्यूचा आणि ईशाच्या जन्माचा घोळ

विक्रांत जेव्हा आईसाहेबांना ‘ईशा हीच गतजन्मीची राजनंदिनी आहे’ हे पटवून देण्याच्या प्रयत्नात असतो, तेव्हा आईसाहेबांना समजतं की राजनंदिनीच्या मृत्यूनंतर बरोबर १० महिन्यांनी ईशाचा जन्म झालेला आहे.

 

zee5.com

मात्र, गेल्या काही भागांत असा उल्लेख वारंवार होतोय की राजनंदिनी २५ वर्षांपूर्वी सोडून गेली.

वरच्या चुकीप्रमाणेच या गणितात सुद्धा ईशा, राजनंदिनी आणि त्यांच्या जन्ममृत्यूचा फेरा, यांचे गणित काही बसत नाही !

३. विक्रांतचे लग्नाप्रसंगीचे वय

मालिकेच्या सुरुवातीपासूनच विक्रांतचे वय ४५ वर्षे आहे ही बाब वारंवार निदर्शीत करण्यात आली होती. मात्र मालिकेच्या गत काही भागांचा आधार घ्यायचा झाला, तर लग्नानंतर लगेचच राजनंदिनी विक्रांतला सोडून गेली, आणि हे घडले २५ वर्षांपूर्वी.

 

zee5.com

म्हणजे त्या वेळी विक्रांत केवळ २० वर्षांचा होता काय? असे असेल तर राजनंदिनी आणि विक्रांतचे लग्न बेकायदेशीरच म्हणावे लागेल !

४. राजनंदिनी साडीचे लाऊंचिंग

प्रारंभीच्या भागांत आईसाहेब विक्रांतला सांगतात की राजनंदिनी ही साडी दादासाहेबांनी ४० वर्षांपूर्वी बाजारात आणली.

 

njmweb.com

मात्र गेल्या काही भागांत असे दाखवण्यात आले की राजनंदिनीचे लग्नाचे वय उलटून गेल्यानंतर दादासाहेबांनी तिच्या एका वाढदिवसाच्या दिवशी ही साडी बाजारात आणली.

वर उल्लेख केलेल्या चुकांचा या अनुषंगाने पुन्हा विचार करता लेखकाच्या बेजबाबदारपणाबद्दल हसावे की रडावे हेच कळत नाही!

५. जालिंदरची अटक आणि सुटका

 

youtube.com

जालिंदर नेहमी सांगत असतो की त्याने विक्रांतच्या कारस्थानामुळे तब्बल १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे. राजनंदिनीचा भूतकाळ दाखवताना मात्र ती जाण्याआधिच जालिंदरला अटकही झालेली आहे. त्यामुळे इथे पुन्हा एकदा नेमकी २५ की १५ वर्षे, हा घोळ आहेच.

६. दादासाहेब आणि जयदीपचे वय

भूतकाळ दाखवताना जयदीप अगदीच लहान – फार फार तर ५ वर्षांचा दाखवला आहे. आणि त्याचे वडील – दादासाहेब अगदीच म्हातारे, जणू जयदीपचे आजोबा शोभतील इतके वयस्कर.

 

पिता-पुत्राच्या वयातला हा घोळही नुसताच अनाकलनीय नाही तर अतर्क्य आहे !

वास्तविक पाहता पुनर्जन्मासारखा काल्पनिक विषय हाताळायचा असेल तर किमान लेखकाने काळाचे गणित अत्यंत काटेकोरपणे पाळावे ही मूलभूत गरज असते.

‘तुला पाहते रे’ या मालिकेत मात्र लेखक-दिग्दर्शकाने लॉजिकचा पुरता बट्याबोळ उडवून टाकला आहे !!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version