Site icon InMarathi

थंडीमध्ये त्वचा तजेल राखायची असेल, तर या पदार्थांच सेवन सुरु करा!

aditi rao haydri im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

थंडी सुरु झाली, की त्वचा कोरडी आणि निस्तेज पडायला लागते. याला कारणीभूत असतो हवामानात होणारा बदल आणि त्वचेतील कमी आर्द्रता! निस्तेज त्वचा ही कोणालाही आवडत नाही. मग अश्यावेळी या ना त्या क्रीम लावून त्वचा तजेल राखण्याचा आपण निष्फळ प्रयत्न करतो.

निष्फळ यासाठी की या क्रीम्स वगैरे लावून काहीच वेळ आपल्या त्वचेमध्ये तजेलपणा येतो आणि मग पुन्हा त्वचा निस्तेज दिसू लागते. तुम्ही देखील थंडीमधील त्वचेच्या या समस्येने ग्रस्त असाल तर आता आम्ही तुम्हाला अशी उपयुक्त माहिती सांगणार आहोत की तुमच्या या समस्येवर रामबाण उपाय ठरेल.

थंडीच्या दिवसात रोजच्या आहारामध्ये काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केले तर तुमची त्वचा निस्तेजपणाला बळी पडणार नाही. चला तर जाणून घेऊया अश्या काही पदार्थांबद्द्दल ज्यांचे सेवन केल्याने थंडीममध्ये तुमची त्वचा अगदी तजेल राहील.

 

अॅवाकाडो

अॅवोकाडो शरीरासाठी अत्यंत पोषक आणि उपयुक्त फळ आहे. या फळात व्हिटामिन ई चे प्रमाण जास्त आहे.

मासे

 

बांगडा, ट्युना, रावस यांसारख्या माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते. या अॅसिडमुळे त्वचेचा दाह कमी होण्यास मदत होते. तसेच जळजळीमुळे त्वचेवर येणारा लालसरपणाही या ओमेगा 3 फॅटी अॅसिडमुळे कमी होतो.

संत्री

 

संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यामुळे त्वचेचा ओलावा कायम राहतो. दररोज संत्र्याचे सेवन केल्यास शरीरातील अनावश्यक घटक बाहेर फेकण्यास मदत होते.

गाजर 

 

गाजरात ए आणि सी व्हिटामिन्स असतात. सी व्हिटामिन्समुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते तर ए व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास तसेच त्वचेचा रंग निखरण्यास मदत होते.

थंडीचे दिवस तर सुरु झालेत, मग आतापासूनच या पदार्थांचे सेवन सुरु करा!!

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version