आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
क्रिकेट मधील सर्वात मोठा आणि महत्वाचा समजला जाणारा वर्ल्ड कप हा इंग्लंडमध्ये ३० में पासुन सुरु होतोय ..
आयपीएल च्या व्यस्त वेळापत्रकानंतर, खेळाडूंना आराम भेटवा म्हणून BCCI ने त्यांना काही दिवसांची विश्रांती देण्यात आली होती.
विश्रांती नंतर खेळाडू २१ में रोजी मुंबई वरून लंडन ला रवाना झाले.
मुंबई मध्ये काही खेळाडू PUBG खेळण्यात व्यस्त दिसले तर काही खेळाडू फोटो काढताना दिसले.
भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकण्यासाठी हे ५ खेळाडू हुकमी एक्के ठरू शकतात.
१) शिखर धवन
गब्बर म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन हा आक्रमक असा फलंदाज आहे. शिखर धवनने चांगली खेळी करून भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
शिखर धवन हा आयसीसी स्पर्धेत नेहमी उत्कृष्ट फलंदाजी करतो असा इतिहास आहे. या स्पर्धेत देखील तो चांगली फलंदाजी करेल आशी अपेक्षा सर्व भारतीय चाहत्याना आहे. आयसीसी एकदिवसीय क्रमारीत शिखर हा १३ स्थानी आहे.
२) रोहित शर्मा
हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा हा भारतीय संघाचा सर्वात आक्रमक असा फलंदाज आहे. रोहितच्या नावावर ३ द्विशतकाचा विक्रम आहे. रोहित सध्या संपुर्ण जागामध्ये सर्वोत्कृष्ट सलामीवीर आहे.
रोहितने इंग्लंड मध्ये झालेल्या २०१३ , २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पिअनस ट्रॉफी मध्ये उत्तम कामगिरी केली आहे. रोहित आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे.
रोहित हा भारतीय संघाचा उपकर्णधार असुन तीही जबाबदारी रोहित चा खांद्यावर असणार आहे.
जर भारतीय संघाला वर्लडकप जिंकायचा असेल तर हे दोन्ही सलामीवीर उतम फॉर्ममध्ये असणे गरजेचे आहे .
३) विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार व रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली भारतीय संघासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. विराटने आपल्या फलंदाजी मध्ये सातत्य राखले आहे. विराट हा भारतीय संघात सर्वात जास्त धावा करणार खेळाडू आहे.
विराट हा आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. विराट हा खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाजी चा स्तंभ आहे. जेव्हा जेव्हा संघाला गरज भासली आहे तेव्हा विराट ने महत्वाची खेळी केली आहे.
फक्त फलंदाज म्हणून नव्हे तर कर्णधार म्हणूनही कोहली ने स्वतःला सिध्द केलं आहे. कोहली त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्म चालू ठेवावा हीच सर्वांना अशा आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने सलग ८ मालिका जिंकून नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. विराट हा आक्रमक असा कर्णधार आहे. विराट कोहलीचे ४१ शतके आहेत. सर्वात वेगवान १०,००० धावा काढणयाचा विक्रम ही कोहलीच्या नावावर आहे.
कोहली आपल्या नेतृत्वात भारतीय संघास आयसिसी क्रमवारीत २ स्थानावर घेऊन गेला आहे . कोहली आपल्या नेतृत्वात भारतीय संघास आपला तिसरा वर्ल्डकप मिळवून देईल हीच प्रत्येक भारतीय चाहत्यांला अपेक्षा आहे
४) महेंद्र सिंह धोनी
महेंद्र सिंह धोनी हा भारतीय संघासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. धोनीचा अनुभव हा भारतीय संघासाठी फायदेशीर असणार आहे, भारतीय संघामध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप खेळणारे खेळाडू हि आहेत याना धोनीचे मार्गदर्शन महत्वाचे ठरू शकेल.
धोनी हा जगातील सर्वात मोठा मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो. जेव्हा केव्हा भारतीय संघाचा टॉप ऑर्डर ढासळला आहे तेव्हा तेव्हा धोनी ने संघाला सावरण्याच काम केलं आहे.
फक्त फलंदाज म्हणून नव्हे तर यष्टीरक्षक म्हणूनही धोनी महत्वाचा आहे.
तो नेहमी विकेटच्या मागून खेळाडूना सल्ला देतो हे तुम्ही मॅच पाहताना बघितलं असेल, त्याचा असलेला अनुभवं भारतीय संघासाठी नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही.
५) जसप्रीत बुमराह
इंग्लन्ड मधील खेळपट्टी हे फलंदाजांना अनुकूल आहे, साधारणतः या खेळपट्टीवर ३५० पेक्षा जास्त धावा होतात. तेव्हा तुमच्याकडे उत्तम गोलंदाज असणे आवश्यक आहे. जसप्रीत बुमराह हा भारतीय संघासाठी x फॅक्टर ठरू शकतो.
बुमराह हा सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्म मध्ये आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल मध्ये त्त्याचा फॉर्म हा अप्रतिम होता. आयपील च्या अंतिम सामन्यात त्याला सामानावीराचा पुरस्कार भेटला.
जेव्हा जेव्हा संघाला विकेट ची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा बुमराह हे काम नियमित करत असतो. बुमराह हा आयसिसिच्या गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. बुमराह वर्ल्डकप मध्ये विरोधी फलंदाजाची झोप उडवेल हे मात्र नक्की.
वर्ल्डकपसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे:-
विराट कोहली (कर्णधार ), रोहित शर्मा (उपकर्णधार ), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, एमएस धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी .
भारतीय संघाच्या अभियानाची सुरुवात ५ में पासून होत आहे. भारतीय संघ हा या वर्ल्डकप मध्ये प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाने जवळपास सर्वच क्षेत्राची पूर्ण तयारी केली आहे.
फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यामध्ये भारतीय संघ आपल्याला इतर संघानं पेक्षा वरचढ असल्याचे आपल्याला दिसतो.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.