' व्यसन सुटत नाही? मेंदूच बदलून टाकू…! व्यसनमुक्तीसाठी चीनचा अघोरी उपाय – InMarathi

व्यसन सुटत नाही? मेंदूच बदलून टाकू…! व्यसनमुक्तीसाठी चीनचा अघोरी उपाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

=== 

व्यसनं अनेक प्रकारची असतात काही चांगली तर काही वाईट. वाईट व्यसनं सोडवणं फार कठीण असतं. दारू, सिगरेट, ड्रग्स असल्या व्यसनाच्या तावडीत सापडलेल्या माणसाला त्यातून बाहेर काढणं हे जवळपास अशक्यच.

व्यसनी माणसांना कंटाळून त्यांच्या आजूबाजूचे, खास करून त्यांचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी वेगवेगळ्या प्रकाराने त्यांना त्यांच्या व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.

परंतु बहुतेक वेळा त्यांचे हे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात किंवा अगदी व्यसनी माणसाचं व्यसन सुटलं तरी ते फार काळ टिकत नाही आणि आयुष्यात परत कधीतरी तो त्या व्यसनाच्या आहारी जातोच.

 

 

 

addiction inmarathi
Medical News Today

 

पण आता ह्यावर एक अनोखा उपाय सापडला आहे जो अशा लोकांसाठी नक्कीच वरदान ठरू शकतो. व्यसनमुक्तीसाठी चीनमधले शास्त्रज्ञ एकदमच आगळ्या-वेगळ्या शोधाच्या प्रयत्नात आहेत.

ह्या प्रयत्नांचा परिणाम असा झालेला आहे की, चीन ह्या देशाने जगातल्या पहिल्या-वहिल्या क्लिनिकल चाचणीची, म्हणजेच माणसांवर प्रयोग करण्याची, पूर्ण तयारी केलेली आहे, फक्त ही चाचणी जरा वेगळी आहे. ती कशी ते आपण जाणून घेऊया…

ही चाचणी व्यसनमुक्तीसाठीच्या कोणत्या औषधांची किंवा थेरपीची नसून एका वेगळ्याच प्रक्रियेची आहे ज्याचं नाव ‘डीप ब्रेन स्टीम्यूलेशन’ किंवा डीबीएस असं आहे.

ह्या प्रक्रियेत व्यसनाने ग्रासलेल्या माणसांच्या कवटीत दोन छिद्र पाडली जातात व त्यात दोन इलेक्ट्रोड घातले जातात आणि हातात मावेल इतक्या लहान यंत्राने ह्याद्वारे मेंदूला स्टीम्यूलेट केलं जातं.

ह्याआधी ही नाविन्यपूर्ण संकल्पना पार्किनसन नावाच्या रोगाच्या उपचारासाठी वापरली गेली आहे, परंतु अशा प्रकारच्या व्यसनी माणसांच्या उपचारासाठी प्रथमच डीबीएस वापरण्यात येत आहे.

 

DBS inmarathi
PDlink

 

अशी ही जगातली पहिली क्लिनिकल चाचणी मेथामफेटामाईन नावाच्या एका मादकद्रव्याच्या आहारी गेलेल्या लोकांवर वापरण्यात येणार आहे. ही चाचणी चीनमधील शांघाय ह्या शहरातील रुईजीन ह्या इस्पितळात होणार आहे.

यूएस नॅशनल इंस्टीट्युटस ऑफ हेल्थ डेटाबेसच्या अनुसार जगभरातून केवळ आठ ठिकाणीच ही चाचणी होणार आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आठपैकी सहा चाचण्या चीनमधे होणार आहेत.

ह्या चाचणीतल्या पहिल्या रुग्णाचं नाव ‘येन’ असे आहे. हा येन २०११ पासून मेथामफेटामाईन वापरत आहे. ह्या वेडात त्याने आपले शारीरिक नुकसान तर केलेच आहे त्याचबरोबर त्याने नशेत सुमारे दीड लाख डॉलर जुगारात घालवले आहेत.

ह्या नशेच्या नादाला लागून येनचा घटस्फोट तर झालेलाच आहे आणि तो अनेक वेळा सुधारगृहातही जाऊन आलेला आहे, परंतु त्यानंतर ही त्याचं व्यसन काही सुटलं नाही. म्हणूनच आता ह्या सगळ्याला कंटाळून तो ह्या चाचणीत सहभागी होण्यासाठी तयार झाला आहे.

 

हे ही वाचा – दारू, सिगारेट नव्हे तर `ही’ ७ व्यसनं तुमचा घात करू शकतात

आपल्या पुढच्या मेंदूचा भाग हा व्यसनाशी निगडीत असल्याने डॉक्टर ली दियान यु ह्यांनी येनच्या कवटीतून दोन छिद्र पाडून इलेक्ट्रोड घातले व काही तासांनी त्याच्यावर एक शस्त्रक्रिया केली गेली ज्यामधे डॉक्टरांनी त्याच्या छातीत एक बॅटरी घातली.

ह्या सगळ्या गोष्टी वाचून आपल्याला आयर्नमॅन सारखा सुपरहिरो आठवू शकतो आणि हे फार मस्त वाटू शकतं, परंतु ह्यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांचा ही गांभीर्याने विचार करायला हवा आहे.

 

DBS 1 inmarathi
Wikipedia

 

ह्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान पेशंट ब्रेन हेमरेजने मरू शकतो, त्याला फिट येऊ शकते किंवा एखाद्या इन्फेक्शनच निमित्त होऊन तो आपला जीव गमवू शकतो.

पण चांगली बातमी म्हणजे यानला ह्यातला काहीच त्रास झाला नाही उलट, त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला त्याच्या नवीन मेंदूमुळे एकदम छान व प्रसन्न वाटत होतं. डॉक्टर ली यांनी यानच्या ह्या नवीन मेंदूला खूप अंतरावरून एका रिमोटच्या मदतीने चालवण्याचा प्रयत्न केला.

डॉक्टर ली यांना यानच्या मेंदूत असणाऱ्या भावनांचा ताबा मिळवता येत होता, म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर डॉक्टर ली यांना रिमोटची काही बटण दाबून यानला आनंदी किंवा दु:खी करता येणार होतं.

‘हे मशीन म्हणजे एक जादू आहे, तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर हे तुम्हाला आनंदी करतं किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटून हवं असेल तर ते देखील ह्या मशीनमुळे शक्य आहे.’ असं यान सांगतो.

आता सहा महिने उलटून गेले आहेत आणि तरी ही यान परत नशेच्या आहारी गेलेला नाहीये.

 

DBS 3 inmarathi
ABC

 

मात्र चीन  प्रमाणे युरोपमध्ये ह्या चाचण्यात सहभागी होण्यासाठी लोकं तयार होताना अढळत नाहीत व यु.एस.ए.मध्ये ही चाचणी नैतिकदृष्ट्या योग्य आहे की नाही? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

कारण एखाद्या माणसाला असा रिमोट वापरून आनंदी किंवा दुःखी करणे हे त्याला रोबोट बनवण्यासारखेच आहे.

परंतु आणखी एक आनंदाची बातमी ही आहे की, गेल्या काही महिन्यात डीबीएस मुळे होणाऱ्या दुष्परिणामांपेक्षा त्यातून होणारे फायदे जास्त आहेत असे सिद्ध झाले आहे.

फेब्रुवारी महिन्यात युएसएफडीएने वेस्ट वर्जीनीया ह्या अमेरिकेतील एका भागात डीबीएसची चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. इथे होणाऱ्या चाचणीत ओपिअम ह्या मादकद्रव्याच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना सहभागी करण्यात येणार आहे.

 

opium addict inmarathi
Council on Foreign Relations

 

डीबीएसच्या एकूण सगळ्या प्रक्रियेला साधाहरण एक लाख डॉलर इतका खर्च येऊ शकतो व अमेरिकेत अजून ह्याच्या यशाचा नेमका अंदाज आलेला नाही, परंतु चीनमध्ये मात्र ड्रगच्या व्यसनाने ग्रासलेल्या माणसांना ह्या डीबीएसने यशस्वीरित्या बाहेर काढलं आहे.

चीनमध्ये ह्या प्रयोगाला इतकी जास्त प्रमाणात मान्यता का मिळत आहे? ह्यामागे मात्र अजून एक कारण आहे. चीनचे ड्रग घेणाऱ्या लोकांच्या संदर्भात फार पूर्वीपासूनच फार कठोर कायदे आहेत.

त्यांना त्यांच्या व्यसनासाठी उपचार तर घ्यावे लागतातच पण त्याचबरोबर सुधारगृहात त्यांना शारीरिक कष्टांची कामे करावी लागतात.

हे सगळे तो माणूस व्यसनातून पूर्णपणे बाहेर येई पर्यंत म्हणजे अनेक वर्षे सुद्धा चालू शकतो आणि म्हणूनच ह्याला पर्याय म्हणून डीबीएसचा स्वीकार चीनने केला आहे. कारण ह्याला आधी केवळ एकच पर्याय होता आणि तो म्हणजे मेंदूचे ऑपरेशन.

एक अत्यंत दु:खदायक गोष्ट ही आहे कई चीनमधल्या अनेक परिवारांनी हेरोईनच्या व्यसनाने ग्रासलेला लोकांना मेंदूचे ओपेरेशन करून बाहेर काढण्यात बेसुमार पैसा खर्च केला आहे.

 

DBS 2 inmarathi
Pitt Neurosurgery – University of Pittsburgh

 

ह्यात अजून एक वाईट बातमी अशी आहे की, ऑपरेशन हे अत्यंत प्राथमिक स्थितीतले आहे आणि ह्यात अनेक प्रकारचे धोके आहेत. ह्यात डॉक्टर रुग्णाच्या मेंदूच्या पेशींना खरवडून काढतात.

हे ऑपरेशन अशा काही कारणांमुळे फार धोक्याचं आहे. ह्यामुळे खूप लोकांना अनेक विपरीत परिणामांना सामोरे जायला भाग पाडले आहे, जसे की मूड स्वीन्ग्स किंवा विस्मृती होणे. ह्याचमुळे डीबीएस हा एक ‘प्रोमिसिंग’ उपचार आहे कारण ह्याद्वारे केले जाणारे हस्तक्षेप हे उलट करता येणारे असतात आणि ह्यामुळे कायमस्वरूपी कोणताच अपाय होत नाही.

रुईजीन हॉस्पिटलचे डायरेक्टर सध्या डीबीएसचे फायदे मानसिक आजार असलेल्या रुग्णांना कसे देता येतील ह्या प्रयत्नात आहेत.

सध्याच्या परिस्थितीत डीबीएस हे अगदी प्राथमिक स्थितीत आहे. खुद्द शास्त्रज्ञ ही एकूण सगळ्या प्रकियेबद्दल साशंक असल्याने जगभरातून त्याचा म्हणावा तितका स्वीकार होत नाहीये. ह्याचमुळे ह्या चाचण्या सुरु ठेवाव्यात की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ह्यात एकच आशेचा किरण म्हणजे, डीबीएसद्वारे यानच्या आयुष्यात झालेलं परिवर्तन.

 

USFDA Inmarathi
BTVi.in

 

एफडीएने मान्यता दिलेली वेस्ट वर्जिनियामधील चाचणी जूनच्या महिन्यात सुरु होणार आहे. ह्या चाचणीच्या निकालाकडे पूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.

एकदा का ह्या चाचणीला अमेरिकेत चांगले यश मिळाली की नंतर जगभर त्याचा प्रसार होणे सोपे होऊ शकते.

तर अशी ही माणसाला आनंदी किंवा दुःखी बनवू शकणारी चाचणी आहे. ह्या उपचाराचा उपयोग चांगल्या कामासाठी करणे किंवा वाईट कामासाठी करणे हे आता आपल्या हातात आहे.

 

हे ही वाचा – ‘व्यसनाधीन’ लोकांनी कोरोनाच्या संकटात ही काळजी घेतली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?