' शत्रुच्या घरात घुसून अतिरेक्यांना ठार करण्यासाठी भारतीय सैन्याचा हा मास्टरप्लॅन पाहून अंगावर रोमांच उभे राहतात. – InMarathi

शत्रुच्या घरात घुसून अतिरेक्यांना ठार करण्यासाठी भारतीय सैन्याचा हा मास्टरप्लॅन पाहून अंगावर रोमांच उभे राहतात.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

शत्रूला त्याच्या घरांत घुसून मारणे हे बहादुरीचे लक्षण मानले जाते. कारण शत्रू हा त्याच्या अंगणात शस्त्राविना देखील प्रबळ ठरू शकतो. पण या सर्वमान्य कल्पनेला भारताने नुकतेच सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करून सुरुंग लावला.

भारताचे हे कृत्य म्हणजे रस्त्यावर गुंड्प्रवृतीच्या लोकांनी घातलेला धुमाकूळ नव्हता, तर त्यामागे होते शिस्तबद्ध नियोजन, अभ्यास, मेहनत, धैर्य आणि आत्मविश्वास.

खवळलेल्या शत्रूला वारंवार प्रत्युत्तर देण्याची वेळ येणार आहे गृहित धरून देशाला या आघाडीवर अधिक सजग, मजबूत आणि सतर्क बनवण्याकरता भारत क्रियाशील बनत आहे.

त्यांच्या या धोरणाची अंमलबजावणी म्हणून भारताने स्पेशल फोर्सेस डिव्हिजनची निर्मिती केली आहे.

 

ops division inmarathi
theprint.com

या डिव्हिजनमध्ये लष्करातील स्पेशल फोर्सेस, नाविक दलातील मरीन कमांडो युनिट आणि वायू सेनेतील गरुड यांचे मिळून एकूण ३००० कमांडोज कार्यरत असतील.

पारंपारिक युद्धातील भारताच्या लष्करी कारवाया तसेच दहशतवादविरोधी कारवायांच्या धोरणांना बळकटी मिळावी म्हणून उचललेले पाउल म्हणजे या डिव्हिजनची निर्मिती.

अशा प्रकारची एक डिव्हिजन असावी हा मूळ मुद्दा या अगोदर २०११ मधील नरेश चंद्र समितीने मांडला.(पण अशा प्रकारच्या डिविजनच्या निर्मितीची मूळ संकल्पना यु एस ची आहे ज्यांच्याकडे जॉइंट स्पेशल ओपेरेशन कमांड ही संघटना कार्यरत आहे).

या डिव्हिजनला पूर्वी स्पेशल ओपेरेशन्स कमांड हे नाव होते.

 

command inmarathi
medium.com

सूत्रांनी सांगितले की आर्मीचे मेजर जनरल रँक ऑफिसर यांची नियुक्ती या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी झाली आहे. आय.डी.एस ( इंटिग्रेटेड डिफेस्न्स स्टाफ )च्या मार्गदर्शनाखाली सर्व काम करतील.

तीनही सेना मिळून ज्या मोहिमा हाती घेणार आहेत त्यांना पूर्णत्वास नेण्यासाठी लागणाऱ्या उमेदवारांची भरती सुरु आहे.

प्रत्येक फोर्सचे कमांडो विंग स्वतंत्र रित्या काम करणार असले तरी देश व देशाबाहेरील काही संवेदनशील मुद्द्यावरील प्रश्नांवर काम करत असताना, आवश्यक ती गुप्तता पळून तीनही सेनांच्या विचार आणि कृतीमध्ये समन्वय असणे अपेक्षित आहे.

सीमेबाहेरील तसेच दहशतवादी कृत्यविरोधी कारवाया करते वेळी शत्रूचा तळ उध्वस्त करणे हे यांचे मुख्य लक्ष्य आहे.

काही काही ऑपरेशन्स असे असतात की लष्कर, नौसेना आणि वायुसेना या तीनही विभागांनी त्यांचे प्रशिक्षण, अनुभव आणि कौशल्य पणाला लावणे गरजेचे असते.

स्पेशल डिव्हिजनची निर्मितीच मुली अशा प्रकारच्या अवघड कारवायांसाठी झाली आहे. योग्य फलनिष्पत्तीसह कृती हे या डिव्हिजनचे उद्दिष्ट आहे.

 

soldier inmarathi
dailymale.com

मेजर जनरल ए.के.धिंग्रा यांची या आर्म्ड फोर्सेस स्पेशल ऑपरेशन डिव्हिजनचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.

सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या कम्बाईन्ड कमांडर्स कॉन्फरन्स मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.

धिंग्रा यांच्याबरोबरच अतिशय कर्तबगार असे कर्नल यांची देखील नेमणूक झाली आहे आणि या सर्वांना अशा संघटना उभारणीचे कार्य दिले आहे जिच्याकडे आपली सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी स्वतःची साधने आणि स्त्रोत असतील.

लष्कर, नौसेना आणि वायुसेनेतील कर्तबगार ,बुद्धिमान अधिकारी ३००० शूर कमांडोजसह हजारो मैल दूर असलेल्या शत्रूच्या प्रदेशात त्यांचेच तळ उध्वस्त करत त्यांना निष्प्रभ करत आहेत हे विलक्षण आहे.

सध्या जरी तीनही फोर्सेस स्वतंत्ररित्या काम करत असले तरी काही खास अवघड कामगिरीकरता आय डी एस च्या नियंत्रणाखाली संघटनेचे तीनही युनिट्स एकत्र येऊन काम करतील.

 

soldier inmarathi

काही वर्षापासून संघटना मजबूत करेल अशा ‘अत्याधुनिक शस्त्रात्रे, लांब पल्ल्याच्या बंदुका’ वगैरे आवश्यक गोष्टींवर संघटना भर देत आहे ज्यामुळे रात्रीच्या ऑपरेशन्स वेळी अडचणी येणार नाहीत.

आपल्या सैन्याच्या तीनही विभागांनी स्वतंत्रपणे शत्रूसैन्याला धूळ चारत आपली कर्तबगारी अनेक वेळा सिद्ध केली आहे.

शेजारील शत्रू राष्टाने याचा बदला म्हणून कित्येकदा नियमांचे उल्लंघन करत हिंसाचार घडवून आणला. युद्धाची आचारसंहिता झुगारत वर्तन केले. देशाच्या अस्मितेवर हल्ले केले.

अनेक शूर सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. पुलवामा हल्ल्याने देशाला दिलेल्या जखमा, वेदना अजून भारतीय विसरले नाहीत.

सतत खोडी काढण्याची वृत्ती असलेल्या शत्रूमुळे ( हा शत्रूही एक नाही, त्याच्याशी हातमिळवणी केलेले देखील अनेक आहेत ) सैन्याला सर्व आघाड्यांवर २४ तास सतर्क राहण्याची गरज आहे. त्यामुळे अशा एकत्र काम करणारी मजबूत संघटना ही काळाची गरज आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?