आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
१७ व्या लोकसभा निवडणुकीचा निकल दिनांक २३ मे रोजी जाहीर झाला, यामध्ये भाजप ला पूर्ण बहुमत मिळाले असून त्यांनी फिर एक बार मोदी सरकार हे सिध्द केलं आहे.
काँग्रेस चा सुफडा साफ केला आहे. कितीतरी राज्यात काँग्रेस ला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. तर घराणेशाहीला जनतेने नाकारले आहे. असे काही घराणे ज्यांना या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली.
१) गांधी घराणे
गांधी घराण्याचे युवराज व काँगेस चे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या पारंपरिक मतदार संघातून म्हणजेच अमेठी मधुन पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या १० वर्षा पासून खासदार होते.
भाजपच्या स्मृती इराणी यांचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी इराणी याना पराभूत केले होते, यावेळी स्मृती इराणी यांनी पराभवाचा बदला घेतला.
जवळपास ५५ हजार इतक्या मोठ्या फरकाने राहुल गांधी यांचा पराभव झाला आहे. अमेठीच्या जनतेने गांधी घराण्याला नाकारून लोक भाजपच्या पाठीशी उभे राहिले. लोकशाहीमध्ये मोठमोठया नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागतो याचं हे एक उदाहरणच आहे
२) पवार घराणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू पार्थ पवार हेसुद्धा मावळ लोकसभा मतदार संघातून आपले नशीब आजमावत होते. त्यांना आव्हान होते ते शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं.
पार्थ पवारांसाठी अजित पवार व शरद पवार यांनी जातीने लक्ष घातले होते पण श्रीरंग बारणे यांनी केलेल्या विकासामुळे पार्थ पवार यांना मावळच्या जनतेने नाकारले. पार्थ पवार यांचा दोन लाखापेक्षा जास्त मताने पराभव झाला.
३) राणे घराणे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून निवडणुकेच्या रिंगणात उभे होते . त्यांना आव्हान होत ते शिवसेनच्या विद्यमान खासदार विनायक राऊत यांच.
निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवत होते. विनायक राऊत यांनी केलेल्या विकासामुळे जनतेने त्यांना साथ दिली. निलेश राणे यांचा आणखी एका पराभव झाला.
राणे घराण्याला कोकणात आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले.
४) मुफ्ती घराणे
मेहबुबा मुफ्ती या माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या आहेत. जम्मू काश्मीर च्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या अनंतनाग मतदार संघामध्ये स्वतः निवडणुक लढवत होत्या.
जम्मू – काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सच्या हस्नेन मसूदी यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मेहबुबा मुफ्ती यांचा जवळपास १० हजार मतांनी पराभव झाला.
जनतेने ठरवले तर ते कोणालाही पराभवाचा सामना करायला लावु शकतात. हे यातून दिसून येते.
५) सिंधिया घराणे
गुना मतदारसंघ हा सिंधिया परिवाराचा बाल्लेकिला म्हणून ओळखला जातो. सिंधिया कुटुंब तीन पिढ्या पासून येथे निवडून येते. ज्योतिरादित्य हे स्वतः सलग चार वेळा इथून खासदार आहेत.
यावेळी भाजपचे कृष्णपाल सिंह यांनी ज्योतिरादित्य सिंधिया याना पराभूत करून सिंधिया घराण्याच्या बालेकिल्याला सुरुंग लावला आहे व त्यांचं वर्चस्व मोडीत काढले आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जवळपास एक लाखापेक्षा जास्त मताने पराभव केला आहे
६) चोटाला घराणे
दुष्यंत चौटाला हे हिसार मतदार संघातून निवडणुक लढवत होते, ते तेथील विद्यमान खासदार होते. त्यांचे वडील अजय चौटाला हे खासदार व आमदार होते आणि त्यांची आई या हरियाणा मधून आमदार आहेत.
एवढेच नव्हे तर त्याचे आजोबा ओम प्रकाश चौटाला हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत, त्यांचे पंजोबा चौधरी देवीलाल हे तर उपपंतप्रधान राहिले आहेत.
दुष्यंत चौटाला याना या निवडणूकी मध्ये भाजपचे बृजेंद्र सिंह यांनी, चौटाला यांचा ३ लाखाच्या फरकाने दारुण पराभव केला आहे.
या लोकसभा निवडणुकीत जनतेने घराणेशाहीचा दारुण पराभव केला आहे. या पराभवामुळे एक मात्र सिद्ध होतं की जनतेला कोणीही ग्राहय धरू शकत नाही. जनता कोणाचंही पानिपत करु शकते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.