Site icon InMarathi

विरोधकांनी प्रयत्न करूनही भाजपवरील हे १० आरोप लोकांनी गांभीर्याने घेतले नाहीत!

modi rahul inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आज भारतीय जनता पक्ष एकीकडे प्रचंड बहुमताकडे  मार्गक्रमण करत पुन्हा सत्तारोहणाच्या तयारीला लागला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि मित्र पक्षांच्या गटात मात्र शांततेच वातावरण पसरलं आहे.

त्याचं कारण हि तसच आहे, मागच्या पाच वर्षात भाजपावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून देखील, आज भारतीय जनता पक्षाचा विजय नक्कीच विरोधी पक्षांना सुई सारखा बोचत असणार आहे.

तर मागच्या पाच वर्षात भाजपावर विरोधी पक्षांनी केलेले आरोप, जनतेने सपशेल झुगारून लावत भाजपाला बहुमत देऊ केलं आहे, तर चला आपण जाणून घेऊयात विरोधकांनी मागच्या पाच वर्षात भाजपावर कोणते आरोप केलेत.

१) चर्च वरील हल्ले

२०१४ मध्ये जेव्हा भाजपा सत्तेत आली  तेव्हा काहीच दिवसांनी दिल्लीतील काही चर्चेसवर काही समाज कंटकांनी हल्ला केला, साहजिकच यावर विरोधकांनी भाजपच्या राज्यात अल्पसंख्यांक सुरक्षित नाही असा आरोप केला.

 

AsiaNews

२०१४ मध्ये जेव्हा भाजपा सत्तेत आली  तेव्हा काहीच दिवसांनी दिल्लीतील काही चर्चेसवर काही समाज कंटकांनी हल्ला केला, साहजिकच यावर विरोधकांनी भाजपच्या राज्यात अल्पसंख्यांक सुरक्षित नाही असा आरोप केला.

पण कॉंग्रेसला याचा फायदा होण तर दूर तो आरोप त्यांचा अंगलट आला होता, कारण दिल्लीत तेव्हा कॉंग्रेसचं सरकार होतं !

२) अवार्ड वापसी

मोदी सरकार सत्तेत आल्याने देशभरातल्या अनेक  विचारवंत व लेखकांनी देशात  धर्मांधता वाढीस लागून धर्मनिरपेक्ष संविधानाला धोका निर्माण  झाल्याचा आरोप करत, मोदी सरकारच्या निषेधार्थ त्यांना मिळालेले प्रतिष्ठीत पुरस्कार करण्याचा सपाटा लावला होता.

 

India TV

यातून सरकार विरोधी मत निर्मिती होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती परंतु हा प्लान पण सपशेल फोल ठरल्याचे दिसून येत आहे.

३) असहिष्णुता

मोदी सरकार सत्तेत आल्यापासुन देशात हिंदुत्ववादी विचार हा इतर विचारधारांची गळचेपी करत असून, देशात मुक्त व सहिष्णू वातावरण  लयास जाऊन असहिष्णुता वाढीस लागल्याचा आरोप सर्व स्तरातून करण्यात आला होता.

 

Scroll.in

परंतु सध्या भारतीय जनतेने ह्या आरोपाची हवा काढून  टाकल्याच दिसत आहे. जेएनयुचा युवा नेता कन्हैय्या कुमार जो हा आरोप करण्यात आघाडीवर होता स्वतः पराभूत झाला आहे.

४ ) सामुहिक हिंसा

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात झुंडशाही वाढीस लागून हिंसाचार घडत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मुस्लीम आणि दलितांवर झुंडीने हिंसाचार होत आहे, असं देखील म्हटलं गेलं.

 

NDTV.com

मुस्लीम आणि दलित मतांचं धृविकरण करण्याचे प्रयत्न या माध्यामातून केले गेले, असंतोष वाढिस देखील गेला होता परंतु याचं मतपेटीत रुपांतर करण्यात मात्र कॉंग्रेसला अपयश आलं आहे.

५ ) न्याय व्यवस्था धोक्यात

न्यायालयाने काही दिलेले निकाल हे विरोधी पक्षांच्या मुळावर आल्याने त्यांनी न्याय व्यवस्थेची स्वायत्तता मोदी सरकारच्या काळात धोक्यात आली आहे, असा आरोप केले. असं करून त्यांनी देशाच्या न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 

न्यायाधीशांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित  केल होतं. परंतु ह्या मुद्द्याचा  वापर करून घेण्यात विरोधक अपयशी ठरले आहेत.

६) अघोषित आणीबाणी

मोदी सरकारने देशात अघोषित आणीबाणी लागु केल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता.  परंतु हा आरोप करणाऱ्या कॉंग्रेस पक्षानेच देशात आणीबाणी लावली होती, हे ते विसरले.

 

YouTube

जनतेने कॉंग्रेसच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करत मोदींना प्रचंड बहुमत देऊन ह्या मुद्द्याची हवा काढून टाकली आहे हे मात्र नक्की.

७) राफेल प्रकरण

मुळात भाजपावर टीका करायला म्हणून कुठलाच मुद्दा मिळत नाही म्हणून राफेल घोटाळ्याची बोंब उठवण्यात आली होती. वेळोवेळी कॉंग्रेस ने ह्यात पराभवच तोंड बघून देखील, राहुल  गांधीनी  चौकीदार चोर हैं असा आरोप  केला.

 

India Today

मोदींवर आरोप केलेत परंतु मतपेटीतून जनतेने मोदींवर विश्वास कायम ठेवत राहुल गांधींच्या आरोपाला धुळीस मिळवलं आहे.

८) बालाकोट स्ट्राईक

पुलवामा हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून भारतीय सैन्याने केलेल्या बालाकोट एयर स्ट्राईक वर देखील विरोधकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले, त्यामुळे जनतेच्या मनात विरोधी पक्षांची प्रतिमा डागळली आहे.

 

India Ahead

याचा कुठे न कुठे नक्कीच भाजपाला फायदा झाला हे मात्र नक्की आहे. भारतीय सैन्य हे देशाची प्रतिष्ठा आहे, त्याचा कार्यावर संशय घेण जनता सहन तरी का करणार ?

९ ) स्वाक्षरी मोहिम

देशभरातील ६०० कलावंत व विचारवंतानी मोदी सरकारला मत देऊ नका आणि लोकशाही वाचवा अश्या आशयावर देशभर स्वाक्षरी मोहिम राबवली होती, याला प्रतिक्रीया म्हणून ९०० कलावंतानी मोदीचे समर्थन करणारी स्वाक्षरी मोहीम राबवली होती.

 

NDTV.com

परंतु जनतेने मात्र पुन्हा एकदा मोदींवर विश्वास टाकला आहे.

१०) ईव्हीएम हॅक

जर भारतातील विरोधी पक्षाने सर्वात मोठी चूक कुठे केली असेल, तर जनतेच्या कौलावर संशय घेउन, मोदींच्या विजयानंतर जेव्हा देशभरातील निवडणुकात भाजपा विजयी झाली तेव्हा खिलाडू वृत्तीने पराभव स्वीकारण्या ऐवजी ईव्हीएम वर आरोप केले.

 

Hindustan

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे विरोधकांची  प्रतिमा डागळली, याचा परिणाम मतपेटीत दिसून आला आहे.

अश्याप्रकारे आरोप करताना कुठलही तारतम्य विरोधकांनी बाळगलं नाही, जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल दिली. आपला एकांगी प्रचार सुरु ठेवला. मोदींवर आरोप करताना तथ्य निष्ठा  बाळगली नाही आणि स्वतचंच हसं करून घेतलं.

याचाच परिणाम हा आजचा निकाल म्हटला पाहिजे. यावर अजून विश्लेषण येईलच पण विरोधक आत्मचिंतन करतील का हे बघण्यासारखं ठरेल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version