' दार-उल-उलूम देवबंदची हास्यास्पद शक्कल: हवे तसे निकाल येण्यासाठी इस्लामी प्रार्थनेचा फतवा! – InMarathi

दार-उल-उलूम देवबंदची हास्यास्पद शक्कल: हवे तसे निकाल येण्यासाठी इस्लामी प्रार्थनेचा फतवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागच्या वर्षीची भारतातील लोकसभा निवडणूक संपली आणि सर्व चॅनेल्सवर धूम सुरू झाली ती एक्झिट पोल्सची…

१९ मे २०१९ ला मतदान संपल्यावर संध्याकाळी सहा वाजल्यापासून केंद्रात नवीन सरकार कोणाचे येणार? कोणता पक्ष किती जागांवर निवडून येईल? कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाची सरशी होईल याचे आकडे जाहीर होऊ लागले.

प्रत्येक चॅनेलच्या सर्व्हे प्रमाणे युती आणि आघाडी यांचे कमी जास्त आकडे येऊ लागले. पण सर्वसाधारण कल बीजेपी सत्तेत येणार असाच दाखवला जात होता.

आता हे तर निवडणुकांच्या आधीपासूनच बोललं जात होतं की बीजेपी पुन्हा सत्तेत येणार.

 

BJP inmarathi

 

झालं!!

दारूल उलूम देवबंदच्या मुफ्ती मेहमूद हसन बुलंदशहरी यांनी लगेच एक फतवा काढला की..

“सर्व मुस्लिम जनतेने 23 मे ला निवडणुकीचा अंतिम निकाल येण्यापूर्वी 3 दिवस आधीपासूनच अतिशय जोरदारपणे देशात शांती आणि भरभराट यावी यासाठी नमाज अदा करावा”.

आता यात फार लक्ष घालावे असे काही दिसत नाही. तसेही प्रत्येक पक्षाचे लोक आपापल्या परीने निकाल आपल्या बाजूने लागावा म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेच आहेत.

पण हा झाला फतव्याचा अर्धाच भाग. देशात शांती नांदावी ,देशाची भरभराट व्हावी असे कोणालाही वाटेलच. कोणाला आवडणारे सतत भांडणे, हल्ले, मोठी आक्रमणे?

 

darul-uloom-deoband-inmarathi

 

साहजिकच देशात शांती नांदावी हीच कोणाचीही इच्छा असणार. देशात शांतता असेल तर साहजिकच देशाची भरभराट होणारच.

फतव्याचा पुढील भाग होता मुस्लिमांचे, मशिदीचे आणि दारूल उलूम देवबंदच्या शिक्षकांचे रक्षण होण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुस्लिम लोकांना अनुकूल असे निर्णय यावेत यासाठी नमाज अदा करा.

मुफ्तीनी काढलेल्या या फतव्याचे देवबंद गावाने स्वागत केले.

मौलवी इसाक गौरा म्हणाले होते की, “आपण याचे स्वागतच केले पाहिजे आणि सर्व मुस्लिमांनी याचे पालन केले पाहिजे. निवडणुकीच्या निकालांवर याचा निश्चितच परिणाम होईल. तसेच प्रत्येक मुस्लिमाने आपण केलेल्या पापांसाठी अल्लाकडे क्षमायाचना याचना करायला हवी.”

 

Maulana-Mahmood-Madani inmarathi

 

हे मात्र आक्षेपार्ह आहे. निश्चितच याचा विचार करायलाच हवा.

या शिवाय त्यांच्या म्हणण्यानुसार दुर्दैवाने भारतात अनेक पक्ष आहेत आणि त्यातील काही धार्मिक मुद्दे घेऊन लढत आहेत हे बरोबर नाही आणि त्यांनी जायलाच हवे. यासाठी मुफ्तीनी दिलेल्या आदेशाचे पालन करणेच योग्य होते.

मुळात जगभरात भारत देशाची ख्याती सहिष्णुता पाळणारा देश अशी आहे. संविधानाने सर्व धर्म समानता हे सूत्र सांगितले आहे.

इतकेच नव्हे तर भारतातील मुस्लिमांना अल्पसंख्याकचा दर्जा देऊन काही खास सवलती आणि आरक्षण दिलेले आहे. सर्व मुस्लिम याचा फायदा वर्षानुवर्षे घेत आलेले आहेत.

 

PM-Modi-muslims inmarathi

 

हा फतवा म्हणजे काय? तर फतवा म्हणजे साध्या शब्दात आदेश. म्हणजे तो पाळायलाच हवा. दारूल उलूमच्या मुफ्तीनी काढलेला फतवा म्हणजे जणू काळ्या दगडावरची रेघच.

यासाठी दारूल उलूम देवबंद म्हणजे काय हे बघूया.

ही एक इस्लामचे शिक्षण देणारी संस्था आहे आणि अलीकडेच उत्तरप्रदेशातील सरहानपूर जिल्ह्यातील देवबंद येथे दारुल उलूमचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ तयार झाले.

 

seminary-generic-file-inmarathi

 

अगदी सुरवातीला सुन्नी देवबंदी इस्लामिक मूव्हमेंटला याच देवबंद गावातून सुरवात झाली ती १८६६  मधे. त्याचवेळेस मुहम्मद कासीम नानावटी यांनी या इस्लामचे शिक्षण देणाऱ्या शाळेची स्थापना ३१  मे १८६६ ला केली.

याच्या जगभरात शाखा पसरल्या आणि मूळ शाळेचे इथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठात रूपांतर झाले.

इस्लाम मुलतत्ववादाचे इथे शिक्षण दिले जाते. जगभरात इथून मुल्ला आणि मौलवी यांना इस्लाम चे शिक्षण देण्यासाठी पाठविले जाते.

इस्लाम विषयी कोणत्याही शंका इथे विचारता येतात व मौलवी अथवा मुफ्ती या शंकांचे निराकरण करतात. त्यांनी व्यक्त केलेले मत हे ग्राह्य धरले जाते आणि तोच फतवा समजून त्याचे पालन केले जाते. थोडक्यात मुफ्तीचा शब्द अंतिम मानला जातो.

तुम्ही दार उल उलूमच्या वेबसाईटवर जाऊन फतवे कोणकोणते काढण्यात आलेत हे बघितले तर काही मनोरंजक फतवे दृष्टीस पडतील.

आता बऱ्याचदा तरुण वर्ग काही शंका विचारतो आणि त्याचे उत्तर दिले जाते.

एकदा एका इंजिनिअर तरुणाने प्रश्न विचारला की “मी फेसबुकवर फोटो टाकू शकतो का?”

 

profile pic inmarathi

 

तेव्हा त्याला उत्तर मिळाले की त्याने सोशल  मीडियावर फोटो टाकणे हे इस्लाम विरोधात आहे पण जिथे ओळ्खपत्रावर किंवा पासपोर्ट बनवताना तो फोटो वापरू शकतो अन्यथा इतर ठिकाणी फोटो शेअर करणे इस्लाम विरोधी मानले जाईल.

मुफ्तीनी दिलेला हा सल्ला म्हणजेच फतवा समजून प्रत्येक मुस्लिमाने याचे पालन करणे सक्तीचे आहे. मुलींनी नेलपॉलिश लावणे देखील इस्लामला मंजूर नाही. तसा फतवा काढण्यात आला.

एकाने आपली शंका विचारली की, एका दारूच्या व्यापाऱ्याने चालवलेल्या विमानकंपनीच्या विमानातून प्रवास करावा की नको?

मुफ्तींचा सल्ला होता की ती विमान कंपनी बिगर मुस्लिम व्यक्ती चालवते आणि त्यांच्यासाठी दारू विक्रीतून आलेला पैसे कायदेशीर असल्याने व त्याच कायदेशीर पैशातून चालवलेल्या विमानकंपनीच्या विमानाने प्रवास करण्यास चालेल.

एका मुलाने विचारले की “मी एका अशा शाळेत शिकतो जिथे मुले व मुली एकत्र शिक्षण घेतात आणि काही वेळेस हस्तांदोलन करण्याची वेळ येते. मी असे केले तर चालेल का?”

मुफ्तीचे उत्तर मजेशीर होते की, मुळातच मुस्लिम व्यक्तीने बिगर मुस्लिम व्यक्तीचे अभिनंदन मुस्लिम कायद्यास मान्य नाही, त्यामुळे हस्तांदोलन करण्याचा प्रश्नच येत नाही.

सिनेमात काम करणे योग्य की अयोग्य या प्रश्नावर उत्तर मिळाले की, सिनेमातून चुकीच्या व इस्लामविरोधी गोष्टी दाखवल्या जातात तसेच पाखंडाचा प्रचार केला जातो. हे शरियतला मान्य नाही म्हणून चित्रपट बघू नयेत आणि काम करण्याचा तर विचारसुद्धा करू नये.

 

darul inmarathi

 

देवबंदच्या वेबसाईटवर असे अनेक मजेशीर फतवे वाचायला मिळतील. अर्थात सगळेच फतवे इतके मजेशीर नाहीत.

मुळात जेव्हा शरियत लिहिले गेले तेव्हा आजच्या काळातील शोध, वस्तू, सोशल मीडिया असे काही अस्तित्वात नसल्याने मुफ्ती आपले ज्ञान वापरून त्यांना हवा असलेला अथवा त्यांच्या सोयीचा अर्थ काढतात त्यामुळेच असे काही मजेशीर फतवे निघाले आहेत.

पण बरेचसे फतवे समाजविघातक सुद्धा असतात अशा वेळेस ते भारतात रहात असल्याने सुप्रीम कोर्टापुढे तक्रारी पोचतात आणि काही वेळेस फतवे माघारी घेतले जातात.

भारतात असे फतवे काढणाऱ्या दुसऱ्या संघटना देखील आहेत पण दार उल उलूम संस्था या सर्वांची शिखर संस्था मानली जाते. आता बघूया या खास नमाजने किती फरक पडतोय ते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?