' पंखा चालू असताना तो “उलट” दिशेने फिरत असल्याचा भास का होतो? – InMarathi

पंखा चालू असताना तो “उलट” दिशेने फिरत असल्याचा भास का होतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ अशी एक म्हण आहे. या म्हणीचा संबंध आपल्या डोळ्याशी म्हणजेच दृष्टीशी येतो. आपण एखाद्या गोष्टीकडे एका दृष्टीने पाहात असतो, पण खरंच ती तशी असते का? ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

आज आपण विचार करणार आहोत तो पंख्याचा. पंखा हा विषय सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. पंख्याशिवाय आपण क्षणभरही राहू शकत नाही ही सध्याची वस्तुस्थिती आहे.

 

ceiling fan inmarathi
Wbfj

भर उन्हाळ्यात थंड हवा देणारा पंखा हवाच, पण उन्हाळा नसतानासुद्धा आपल्याला पंख्याची सवय होऊन गेली आहे. पावसाळ्यात, थंडीत डासांपासून संरक्षण म्हणून पंखा लावला जातो किंवा हवा खेळती राहावी म्हणून पंखा लावला जातो.

एकूण काय पंखा हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. जरी आता सगळीकडे एसी आणि कुलरचा सुळसुळाट झाला असला तरी घरात पंखा नाही असं होत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पूर्वीच्या टेबलफॅनची जागा आता छतावर गेली आहे. मोठ्या मोठ्या शोरूममध्ये स्टँडिंग पंखे असतात. गरीबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या घरात या पंख्यासाठी जागा निश्चित केलेली असते.

पंखा नाही असं एकही घर सापडणे कठीण आहे. या पंख्यासंबंधीची एक गंमत आहे जेव्हा तो फिरत असतो तेव्हा घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरत असतो पण आपल्याला मात्र तो उलटा फिरतोय असा भास होतो. असं का होत असावं बरं? याला काही सायंटिफिक रिझन आहेत.

 

stroboscopic effect inmarathi
YouTube

खरंतर पंख्याला तीन किंवा चार पाती असतात, पण आपण सतत पाहिलं की, वाटतं एकच पातं फिरत आहे आणि ते उलट दिशेने फिरत आहे. याला ‘स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट’ असे म्हणतात.

याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गाडीचं चाक. त्याला ‘व्हेगन व्हिल इफेक्ट’ असं म्हणतात. आपण चित्रपटांच्या काही दृश्यांमध्ये पाहिलं असेल की गाडी सरळ जात असते, पण त्याची चाकं मात्र उलट दिशेने फिरत असल्याचा भास आपल्याला होत असतो.

त्याला एक वेग प्राप्त झालेला असतो त्यामुळे आपल्याला तशी हालचाल दिसत असते. प्रत्यक्षात मात्र गाडी सरळच जात असते आणि चाकंही सरळ दिशेतच फिरत असतात.

जेव्हा आपण एखादी वस्तू हलवत असतो किंवा ती वस्तू हलत असते तेव्हा आपल्याला प्रत्यक्षात मोशनमधील प्रत्येक बिूंद दिसत नाही.

आपण दर सेकंदाला १०- १२  इमेजीस कॅप्चर करतो आणि आपण त्या डेटाचा वापर करतो आणि सामान्य तर्क वापरून रिक्त स्थान भरतो. तर ही एक वेगवान अशी गती असते.

 

stroboscopic effect 1 inmarathi
YouTube

पंख्याची पाती किंवा गाडीची चाकं जेव्हा वेगात फिरत असतात किंवा वेगाचे सातत्य एक सलग असते तेव्हा ते उलट दिशेने फिरत आहेत असा भास होतो.

ही एक नमुना त्रुटी आहे, एकतर रेकॉर्डिंग डिव्हाइसमध्ये किंवा थेट आपल्या डोळ्यांमुळे ‘निरंतर हालचाली’मुळे होणारा हा एक भ्रम आहे असं म्हणता येईल. असे भास आपल्याला नेहमीच होत असतात.

जेव्हा आपण गाडीतून किंवा बसमधून जात असतो तेव्हा खरंतर आपण पुढे पुढे जात असतो पण आपल्याला एका क्षणी असं वाटतं की, आपण आहोत तिथेच आहोत आणि झाडं, डोंगर पळत आहेत. जसं की आपण लहानपणापासून एक गाणं म्हणतो,

‘झुकूझुकू झुकूझुकू अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी,
पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाऊया.’

म्हणजे काय तर आपण झुकझुक गाडीत म्हणजे रेल्वेत बसलोय पण आपल्याला असाच भास होत आहे की, झाडेच पळत आहेत. वेगाला एक गती प्राप्त झाली की असा भास आपल्याला होऊ शकतो.

 

train inmarathi
dontgetserious

पंख्याच्या बाबतीत पण आपल्याला तसाच भास होतो, यालाच म्हणतात ’निरंतर हालचाल’.

सततच्या गतीमुळे आपला मेंदू त्या दृश्यात अडकतो आणि आपण जे पाहत आहोत ते दृश्य एकत्रितपणे दिसू लागते. यालाच म्हणतात ‘स्टोबोस्कोपिक प्रभाव’ जेव्हा एखादे ऑब्जेक्टचे मोशन नमुना दराने जुळते.

आपण असा विचार करुया की आपल्या रेकॉर्डिंग डिव्हाइसवर प्रति सेकंद २०  फ्रेम प्रति नमुना दर आहे.

२० फेऱ्या एका सेकंदात फिरत असताना आपण एक फॅन ब्लेड पाहत असतो. म्हणजेच आपण काय पाहतो तर प्रत्येक एकल ‘प्रतिमा’ ज्याची डिव्हाइस रेकॉर्ड अगदी एक रोटेशन वेगळी असते.

 

shuttersstock inmarathi
Shutterstock

म्हणून जेव्हा आपण हा व्हिडिओ स्वरूपात पाहतो म्हणजे जेव्हा एकसलग पाहतो तेव्हा आपला मेंदू प्रत्येक वेळी त्याच ठिकाणी पंखा असल्याचे रेकॉर्ड करते आणि आपल्याला ते एका स्थिर प्रतिमेमध्ये एकत्रित होते. आपण फॅन ब्लेड हलवित पाहू शकत नाही.

म्हणजे असं पाहा, पंख्याचं पातं प्रति सेकंद १९  रोटेशनमध्ये फिरत असल्यास आणि रेकॉर्डिंग डिव्हाईसची गती २०  फ्रेम प्रती सेकंद असल्यास पहिल्यांदा १९/२०  ची नोंद होईल.

पुढच्या रोटेशनमध्ये ती असेल १८/२०  आणि अशा पद्धतीचा क्रम सातत्याने राहील आणि म्हणूनच पंखा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असला तरी आपल्याला दिसताना मात्र तो विरुद्ध दिशेने फिरत असल्याचा भास होईल. याचे कारण अर्थातच ‘नमुना त्रुटी’ आहे.

आपली दृष्टी आणि मेंदू यांच्या एकत्रित परिणामामुळे आपल्याला असा भास होत असतो.

कधीतरी आपल्याला अशाही काही प्रतिमा दिसतात की, ज्याच्याकडे आपण एकटक एक मिनिटभर पाहत बसलो आणि जर दृष्टी हलवली तर जिथे दृष्टी हलवू तिकडेच ती प्रतिमा आपल्याला दिसते. त्यामागेही शास्त्रीय कारण आहे.

 

fan rotation inmarathi
New Braunfels Electric

तसेच एकाच चित्रात अनेक चित्रं लपलेली असतात आपण जितका खोल विचार करत जाऊ त्याप्रमाणे त्यातील बारकावे आपल्याला दिसत जातात. थोडक्यात काय तर ‘सिर्फ नजर काफी नहीं, नजरीयाभी बहुत मायने रखता है।’

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?