आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
स्वप्न मग ते कोणतेही असो, आवाक्यातील असेल तर आणि तरच ते सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरते. ते पूर्ण करण्याचे प्रयत्न होतात. अशाच एका High Class स्वप्नाची कहाणी म्हणजे स्वतःच्या मालकीची एखादी कार असविशी वाटणे.
त्यात ती कार जर परदेशी बनावटीची असेल तर सोनेपे सुहागा! फोक्सवॅगन, कार्स च्या दुनियेतील एक सोनेरी पान.
अतिशय उच्च प्रतीच्या बनावटीच्या या कंपनीच्या कार्स खरेदीदाराला भुरळ पाडण्यात यशस्वी ठरल्या आहेत. फोक्सवॅगनची बिटल ही कार तर जगप्रसिद्ध आहे.
नक्की काय आहे यामागचे गुपित? कोण आहे ही फोक्सवॅगन कंपनी? जाणून घेऊया Making Of Volkswagen.
विल्हेम मेबँक यांनी १९०९ साली मेबँक कंपनी ची स्थापना केली होती. जी लक्झुरीयस कार बनवण्यात आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते होती.
कालांतराने या कंपनीत सक्रिय सहभाग असलेल्यानी वेगळे होत नवीन कार कंपन्या सुरू केल्या ज्या अनुक्रमे पोर्शे, ऑडी, बीएमडब्ल्यू या आहेत. ज्या आज फोक्सवॅगन च्या सहयोगी कंपन्या आहेत.
फोक्सवॅगन च्या मेकिंग बाबत एक समज असाही आहे की तिची स्थापना नाझींमार्फत करण्यात आली. हा समज खरा की खोटा याबद्दल अजूनही समज गैरसमजाचे धुके असले तरी फोक्सवॅगच्या निर्मितीची कथा मात्र मोठी रंजक आहे.
हे नक्कीच नाकारले जाऊ शकत नाही की फोक्सवॅगच्या निर्मितीत जर्मन हुकूमशहा हिटलर याचा हात आहे. पण फोक्सवॅगन तर्फे ही गोष्ट काही अंशी टाळली जातेय कारण त्यांच्या क्लासीक डिपार्टमेंट मधे १९५० पूर्वीचे एकही कार मॉडेल उपलब्ध नाही.
कंपनीलाही या संदर्भात बोलण्यात काही स्वारस्य नाही. खरेतर यातली सत्यता फारच गुंतागुंतीची आहे. कंपनीची दुसऱ्या महायुद्धापूर्वीची स्ट्रँटिजी व दुसऱ्या महायुद्धानंतरची स्ट्रँटिजी यात प्रचंड मोठी तफावत आहे.
ज्याची नंतर हिटलर किंवा नाझीझम यांच्याशी लिंक लागत नाही.
फोक्सवॅगन मागची मूळ संकल्पना जी सर्वसामान्यांची कार म्हणून अस्तित्वात आली ती मूळची हिटलरची नव्हतीच. १९०८ मध्ये हेन्री फोर्ड यांच्या कंपनीचे आलेले T मॉडेल हे पहिले सर्वसामान्य लोकांचे कार मॉडेल म्हणून ओळखले जाते.
इव्हन जर्मनीमध्येही सर्वसामान्यांची कार ही संकल्पना देखील नाझीझमपूर्वीच अस्तित्वात होती. जी ‘हँनोमाग’ च्या पर्यायात (१९२५) उपलब्ध होती. हिटलरच्या उदयानंतर मात्र सर्वसामान्यांची कार या संकल्पनेला चालना मिळाली.
हिटलर मेबँक बनावटीच्या गाड्यांचा मोठा चाहता होता. पण त्यांसारख्या अल्ट्रालक्झरी कार्स सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाहीत याची त्याला रुखरुख होती. त्यातूनच फोक्सवॅगन( सर्वसामान्यांची कार ) ची निर्मिती झाली.
त्यामुळे ही कल्पना हिटलरची नसून त्याच्या आधीपासूनच सर्वत्र रुजली होती हे दिसून येते. मग फोक्सवॅगन आणि हिटलर यांच्यात काय संबंध होते हा कळीचा मुद्दा उरतोच.
फोक्सवॅगनच्या बिटल या प्रसिद्ध मॉडेलशी साधर्म्य दाखवणारी दोन/तीन रेखाटने जरी हिटलरने रेखाटली असली तरी या प्रोजेक्ट चा लीड होता फर्डीनंड पोर्शे, ज्याने बिटलचे डिझाईन केले असे मानले जाते.
बिटल ही खरोखरच सर्वसामान्यांची कार ठरली कारण तिची किंमत होती फक्त ८५ पौंड आणि अशा २.५ कोटी बिटल्स जगभर विकल्या गेल्या. १९३०च्या दशकापर्यंत कार किंवा तत्सम वाहने आरामदायी प्रकारातील असून सामान्यांच्या आवाक्याबाहेरील होती.
१९३७ साली नाझी कामगार संघटनेने ही मक्तेदारी मोडून काढत ‘सर्वसामान्यांची कार’ हा प्रकल्प राबविला आणि कार्स चे यशस्वी उत्पादन सुरू झाले.
बिटलचे फायनल डिझाईन पोर्शे याचे असले तरी बिटल हे एकुणातच त्या काळात युरोपातील वाहनक्षेत्रात होणाऱ्या बदलावांचे एकत्रीकरण आहे.
जोसेफ गँन्झ सारख्या कार डिझायनर ने बॅकबोन चासीस, रेअर इंजिन, एअरकुलिंग आणि कारबॉडीच्या मटेरीयल मध्ये केलेले संशोधन बिटलसाठी फारच उपयुक्त ठरले. पण गँन्झ हा ज्यू असल्याने त्याचे योगदान बरीच वर्षे नाझी जर्मनांमार्फत लपवून ठेवण्यात आले.
याउलट Tatra सारख्या Small Scale कार च्या निर्मितीसाठी पोर्शे ला हिटलर कडून प्रोत्साहान मिळले व बिटल चा जन्म झाला.
असेही म्हणता येईल की पोर्शे ने बिटल चे फायनल डिझाईन तयार करताना बिटलच्या आधी तयार होणाऱ्या कार्सच्या डिझाईनचा अभ्यास केला व नंतरच बिटल चे डिझाईन तयार केले.
खरी गोष्ट ही आहे की फोक्सवॅगन कंपनीचा जन्म जरी घरगुती वापराच्या कार्स बनवण्यासाठी केला गेला असला तरी मूळ उद्देश युद्धासाठी पूरक वाहने, बराक्स ,युद्ध सामग्री बनवणे हा होता.
त्यानुसार दुसऱ्या महायुद्धाची पूर्वतयारीच हिटलरने ‘फोक्सवॅगन’ कंपनीची निर्मिती करून सुरू केली असे म्हणायला काहीच हरकत नाही.
याचदरम्यान जग दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते आणि युद्धसामग्री ,सैनिक, शस्त्रे तसेच निर्वासित, युद्धकैदी यांची वाहतूक करण्यासाठी मोठ्या संख्येने वाहनांची आवश्यकता होती.
ज्यांची निर्मिती बिटलची निर्मिती थांबवून केली गेली. त्यासाठी एक मोठा प्लांट उभारण्यात आला होता व युद्धकैदी किंवा गुलाम यांना तिथे कामगार म्हणून राबवून घेण्यात आले.
यासाठी एक संस्था उभारण्यात आली होती जी KdF या नावाने ओळखली जात होती. जर्मन नागरिकांचे जीवनमान सुधारावे व त्यांना कार खरेदी करता यावी यासाठी एक सेविंग स्टॅम्प स्कीम ही सुरू करण्यात आली.
यासाठी एक आख्खे शहर नव्याने वसवण्यात आले. ज्यात एक कारखाना उभारण्यात आला ज्यात कार्स बरोबरच सैनिकी वाहने देखील बनवण्यात येऊ लागली. ( Kubelwagan, Schwimmwagens And Command Cars)
पण दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीची हार झाल्यावर ही KdF फॅक्टरी मित्रासैन्याकडून उध्वस्त करण्यात आली पण त्याहीपेक्षा KdF सिटी वाईट प्रकारे उध्वस्त झाली होती व तिथले रहिवासी नागरिक अन्न, वस्त्र ,निवाऱ्यापासून वंचित झाले होते.
त्यावेळी VW फॅक्टरी ब्रिटिश आधिपत्याखाली होती. तेव्हा या लोकांना रोजगार मिळावा यासाठी मेजर इव्हान हसर्ट याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा कंपनीचे नवनिर्माण करण्यात आले. ज्यात केवळ घरगुती उपयोगाच्या वाहनांची व कार्सची निर्मिती होऊ लागली.
पण हे तेव्हाच घडले जेव्हा कंपनीच्या चित्रातून नाझींचे अस्तित्व पूर्णपणे पुसले गेले. पोर्शे व हिटलर एकमेकांचे चाहते होते ही गोष्ट ही काळाच्या पडद्याआड झाकली गेली.
त्या नंतर १९४९ पर्यंत ब्रिटिश सैन्यातील इलेक्ट्रिकल व मेकॅनीकल इंजिनिअर्सकडून ही फॅक्टरी चालवली गेली आणि त्यांनतर नाझी नसलेल्या अशा नव्याने स्थापन झालेल्या जर्मन सरकारकडे तिचा मालकी हक्क सोपवण्यात आला.
आज फोक्सवॅगन ही ती कंपनी नक्कीच नाही जी हिटलरच्या संकल्पनेतून सुरू झाली होती.
प्रत्येक यशस्वी कथेला अनेक कंगोरे असतात. जे कधी समोर येतात तर कधी काळाच्या उदरात लपून राहतात. प्रत्येक यशस्वी कथा अशा मिथकांवर बेतलेली असते.
आज फोक्सवॅगन कितीही नाकारत असली तरी तिच्या इतिहासात नाझीझम आणि हिटलरच्या कथेचे पान लपलेले आहेच. ज्यात हिटलर बरोबर फर्डीनंड पोर्शे हे ही महत्वाचे नाव होते.
ही होती सर्वसामान्यांची कार म्हणून मिरवणाऱ्या फोक्सवॅगन,या कार्सच्या महाराणीची नाझी इतिहासाची कहाणी..
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.