' उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे हे आहेत १० उत्तम फायदे! – InMarathi

उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे हे आहेत १० उत्तम फायदे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आता फेब्रुवारी संपत आला, काहीच दिवसात आता सगळीकडेच उन्हामुळे वातावरणात बदल व्हायला लागेल!

हळू हळू सगळीकडेच उन्हाच्या झळा बसायला लागल्या कि प्रत्येकाला अगदी जावं नकोसा होईल, याचबरोबर उन्हाचे त्रास सुद्धा वाढीस लागतील, त्यामुळे आता प्रत्येकाने आपल्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायला हवं!

 

summer inmarathi
aajkikhabar

या उन्हाळ्यात लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकाला काहीतरी थंड खावं किंवा पेय प्यावसं वाटतं! मग त्यात सरबत, कोल्ड्रिंक्स, बर्फाचा गोळा, आईस्क्रीम असे तत्सम प्रकार सगळ्यांनाच खावेसे वाटतात!

gola inmarathi
outlookindia

त्याहूनही अधिक आवडणारी गोष्ट म्हणजे फ्रिजमधले थंड गार पाणी, उन्हाळयात जेंव्हा तुम्ही बाहेरून थकून भागून येता तेंव्हा तुम्हाला मस्त थंडगार पाणी प्यायची इच्छा होते!

पण हे थंड पाणी तुमच्या शरीराला किती घातक असते याची बहुदा तुम्हाला कल्पना नसावी!

 

cold water inmarathi
medical news today

अशा वेळी फ्रिज मधलं थंड पाणी न पिता दुसरे कोणते उपाय करता येतील ज्याने तहान पण भागेल आणि समाधान पण होईल?

कितीही जग पुढे गेले तरी काही काही गोष्टी या ‘जुनं ते सोनं’ असं म्हणून आपण वापरतच असतो त्यातीलच एक गोष्ट म्हणजे ‘माठ’. माठातलं पाणी प्यायल्यावर जी क्षुधा शांती होते ती फ्रीजमधल्या पाण्याने होत नाही.

 

maath 2 inmarathi
oneworldnews

 

आपल्या पूर्वजांनी मातीचं महत्त्व जाणलं होतं म्हणूनच त्यांनी माठाची निर्मिती केली होती. अजूनही खूपशा कुटुंबात माठाचा वापर केला जातो.

खरंतर लोकं आधुनिकतेकडे वळतात तसेच ते जुन्या गोष्टीही वापरतात. हल्ली प्लास्टिक बॉटलऐवजी मातीच्या बाटल्या, मातीचे तांब्या-भांडं अशा गोष्टीही प्रचलित आहेत.

त्यातील पाणी आरोग्यास चांगलं असतं कारण ते नैसर्गिक आहे हे आपल्या मनावर बिंबवले गेले आहे.

जेव्हा आपण फ्रीजमधील पाणी पितो तेव्हा तहान भागते, पण ती तात्पुरती असते, पण तेच जर आपण माठातील पाणी प्यायलो तर मातीचा हलकासा वास आणि थंड पाणी याने आपली तहान नक्कीच भागते.

फ्रीजमधील पाण्याने दंतदुखीचा त्रासही वर येऊ शकतो. दातातून कळा येणे किंवा फ्रीजमधील पाण्याने घसा बसणे हे अगदी नेहमी होणारे त्रास आहेत आणि सर्वश्रुत आहेत.

तर मित्रांनो चला आपण जाणून घेऊयात मातीच्या भांड्यातून पाणी पिण्याचे दहा फायदे :- 

1. मातीच्या भांड्यात हवामानानुसार पाणी असते ही एक गुणवत्ता इतर कोणत्याही भांड्यात नसते.

 

math 1 inmarathi
Majhapaper

 

2. माती नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असल्याने शरीरात पीएच शिल्लक ठेवण्यास मदत करते आणि अम्लता आणि गॅस्ट्रोनॉमिक वेदना कमी होतात.

 

math 4 inmarathi
prahaar.in

 

3. मातीच्या भांड्यातील खनिजांमुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते.

 

maath inmarathi
notretired.in

 

4. खोकला किंवा सर्दी असलेल्या लोकांनीही मातीच्या भांड्यातील पाणी पिल्यास त्यांना अपाय होत नाही.

 

coughing inmarathi
pinterest

 

5. मातीच्या भांड्यात शरीरातील ग्लुकोज राखण्यासाठी आवश्यक असलेले पोषक जीवनसत्तवे असतात हे शरीर सिद्ध करते त्यामुळे उष्ण स्ट्रोकपासून प्रतिबंधित करते.

 

math 5 inmarathi
alpineorganics.co

 

6. माठातील पाणी हे तुम्ही एकदा माठ विकत घेतला की, एक पैसाही खर्च न करता गार करू शकता. लाईट बिलापेक्षा माठाची किंमत नगण्य असते.

 

math 6 inmarathi
eSakal

 

7. गर्भवती महिला किंवा लहान मुले यांनी माठातील पाणी प्यायले तर त्यांना काही त्रास होत नाही.

 

women drinks water inmarathi
pureit

 

8. सतत पाणी प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवल्याने प्लास्टिकमधील एक थर जमा होतो जो आपल्या तब्येतीला हानीकारक असतो. माठ हा नैसर्गिक असल्याने त्यातील पाणी हानिकारक होत नाही.

 

plastic water bottle inmarathi
Business Insider

 

9. मुळातच मातीमध्ये औषधी गुण असतातच त्यामुळे त्यातील पाण्याला एक निराळा स्वाद, गोडसर चव येते आणि हे शुद्ध पाणी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

10. माठाला छोटी छोटी छिद्र असतात ती आपल्याला डोळ्यांनी दिसतही नाहीत. पाणी थंड होणे हे बाष्पीकरण क्रियेवर अवलंबून असते. जितके बाष्पीकरण जास्त होते तेवढे पाणी जास्त थंड होते. म्हणूनच माठाच्या खाली पाणी झिरपते.

बाष्पीकरण होण्यासाठी माठ सगळी उष्णता आपल्याकडे खेचून घेते व पाणी थंड करते म्हणजेच अगदी नैसर्गिकरित्या हे पाणी थंड होते.

 

math 7 inmarathi
Dailyhunt

 

माठ हा खूप पूर्वीच बनविला गेला असावा कारण कावळा आणि माठ याची गोष्ट फारच प्रसिद्ध आहे. खूप तहानलेला एक कावळा असतो त्याला एक माठ दिसतो, पण पाणी अगदी माठाच्या तळाशी गेलेले असते.

मग कावळा खूप विचार करतो आणि सभोवतालचे खडे माठात टाकतो त्यामुळे पाणी वर वर येते. तो पाणी माठाच्या तोंडाशी आणतो आणि ते पाणी पिऊन आपली तहान भागवतो म्हणूनच कावळ्याला चतूर म्हणतात.

 

math 8 inmarathi
youtube.com

तर असे हे माठातील गुण आहेत. परदेशातील लोकांनाही आपल्या या कलेचं फार आकर्षण वाटतं. आता माठामध्ये खूपच निरनिराळे प्रकार आहेत पण सगळ्यात फेमस म्हणजे काळा माठ आणि लाल माठ.

कधीकधी आपण या माठ घेण्यात फसू पण शकतो.

आपण माठ विकत आणतो आणि त्यात काही केल्या पाणी गार होत नाही. मग तू किती ‘माठ’ (म्हणजे ढ) आहेस ? असंही ऐकून घ्यावं लागतं.

तेव्हा चांगला नीट पारखून माठ घ्यावा आणि थंडगार पाणी पिण्यास सुरुवात करावी. माठातील जल पिताच तहान क्षमेल, हे मात्र नक्कीच !

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:
InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?