Site icon InMarathi

हा मुस्लिम विचारवंत रमजानमधील रोजा वर जे लिहितोय ते विचारात टाकणारं आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान मास सुरु आहे. ह्या संपूर्ण रमजान पर्वात मुस्लीम बांधव ‘रोजा’चे पालन करतात. ‘रोजा’ हा निर्जलीकरण उपवासाचा एक प्रकार आहे.

ज्यात पहाटेच्या नमाज पठणानंतर उपवासाला सुरुवात होते, ज्याला ‘सहर’ म्हटले जाते आणि संध्याकाळच्या नमाज पठणानंतर सांगता होते, ज्याला इफ्तार म्हटले जाते. रोजा हा रमजानचा एक महत्वपूर्ण भाग आहे.

जगभरातील मुस्लीम लोक रोजाचे काटेकोर पालन करतात. ‘रमजान ईद’च्या दिवशी ह्या पर्वाची सांगता होते.

रोजा ह्या उपवासाचे नियम हे खूप कडक आणि क्लिष्ट असतात, त्याचे आरोग्यावर देखील खूप सारे परिणाम होत असतात.

 

en.protothema.gr

रोज्याच्या याच अनिष्ट आरोग्य विषयक परिणामांवर भाष्य करणारी एक फेसबुक पोस्ट ताबिश सिद्दिकी या मुस्लीम सुधारणावादी चळवळीत कार्य करणाऱ्या व्यक्तीने लिहली, रोजामुळे होणारे गंभीर परिणाम दाखवून दिले आहेत. ते असे..

===

आपल्याला माहिती आहे का “रोजा” ठेवणे हे एखाद्या अन्य धर्माशी संबंधित कर्मकांड असतं तर बहुदा आतापर्यंत त्याला अमानवी हिंसक अथवा न जाणो काय घोषित केलं गेलं असतं.

WHO देखिल यात हस्तक्षेप करत ह्यासंदर्भात आर्टिकल लिहीत ह्या प्रथेच्या समूळ उच्चाटनासाठी आग्रही राहिली असती.

लोक रोजा सुरु होण्या आधीच जंतर मंतरवर बॅनर घेऊन लहान मुलांना यापासून वाचवा आणि या अमानवी प्रथेला हटवा असा आग्रह करताना दिसली असती.

मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या, अथवा दुर्लक्ष करा. जेव्हा पन्नासाहून अधिक राष्ट्रे हि एका विशिष्ट धार्मिकांची असतात तेव्हा संपूर्ण जगावर त्या धर्मातील चांगल्या वाईट प्रथांना आणि कर्मकांडाला स्वीकारण्यासाठी दबाव निर्माण होतो.

 

islam.org

आपण कधी ऐकलं आहे कि जगातल्या कुठल्या वृत्तपत्रात अथवा टीव्ही न्यूजच्या बातमीपत्रात ‘रोजा’ ठेवल्याने इतके लोक दगावल्याचे सांगितले आहे? नाही ना! तुम्हाला कधी सांगणार देखील नाहीत, परंतु प्रत्यक्षात ह्जारो लोक जीव गमावतात.

‘रोजा’ हे त्याचं प्रमुख कारण नसलं तरी निर्जलीकरणाने किडनी फेल, ब्रेन स्ट्रोकपासून तमाम अंग फेल होतात.

२०१५ साली एकट्या पाकिस्तानात आठशे जणांचा हीटव्हेवने जीव घेतला, त्याचं कारण देखील ‘तहान आणि भूक’ हेच होतं. परंतु त्या बातमीला दाबण्यात आलं आणि कुठल्याही अंतरराष्ट्रीय मीडियात यावर चर्चा देखील झाली नाही. आफ्रिकी देशात मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती.

ज्या ठिकाणी दारिद्र्य आहे, त्या ठिकाणी लोक अश्या निर्जलीकरणाने मरणारच, परंतु दिवसभर एयर कंडिशनर आणि कुलरसमोर बसलेले लोक या सत्याला नाकारताना आढळून येतील.

त्यांच्या मतानुसार रोजामुळे होणाऱ्या निर्जलीकरणाने कोणाचाही मृत्यू होत नाही.

कधी आपल्या विभागातल्या डॉक्टरला विचारून बघा की रमजान काळात त्यांच्याकडील रुग्णांच्या संख्येत किती वाढ होते? कितीतरी लोक मरतात. परंतु कधी ‘रोजामुळे झालं निधन’ असं कधीच म्हटलं जात नाही.

तसे ही लोकांच्या मनात एक पक्की धारणा असते की रोजामुळे मृत्यू देखील आला तरी जन्नत अर्थात स्वर्ग मिळतो. त्यामुळे कोणी असं म्हणणार नाही कि ‘अमका रोजा ठेवल्याने मृत्यू ओढवला’.

जोपर्यंत कोणी याबाबत चर्चा करत नाही , तोपर्यंत याबाबतची आकडेवारी कधीच सरकारी होऊ शकणार नाही. ब्रेन स्ट्रोक्स आणि किडनी फेल होण्यानेच मृत्यू ओढवला, असंच म्हटलं जाईल.

आपण कधी बघितलं आहे का टाईम मेगझीनने ‘कुर्बानी’ला अमानवीय घोषित केलं आहे? मग रोज्याने मृत्यू झाल्याची आकडेवारी WHO प्रसारित करेल, अशी अपेक्षाच बाळगू नये.

-ताबिश सिद्दीकी

===

अश्या प्रकारे , ताबिश यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून रोजासंदर्भातले वास्तव जगासमोर ठेवले आहे. अर्थातच त्यांच्या ह्या पोस्टला अनेक लोकांनी वाचले असून, अनेकांनी त्यांचं समर्थन केलं आहे, तर अनेकांनी त्याला विरोध देखील केला आहे.

त्यांच्या पोस्टवरील निवडक  प्रतिक्रिया आपण बघुयात ….

द्रोणा ठाकूर ह्यांनी संपूर्ण उपवास पद्धती मग ती  नवरात्रीची असो वा रोज्याची, आरोग्याला घातक असल्याचे म्हटले आहे.

समीर ढोने यांनी आपला वैयक्तिक अनुभव मांडत, नवरात्री दरम्यान देखील हे घडत असल्याचे म्हटले आहे

 

देवेंद्र सिंह धाकड जे पेशाने युरोसर्जन आहेत त्यांनी देखील ताबील यांच्या मुद्द्याला समर्थन दिलं आहे, त्यांनी स्वतच्या क्लिनिक मध्ये वाढत्या पेशंटच्या संख्येसंदर्भात टिपण्णी केली आहे.

 

अर्शद जमाल नावाच्या वाचकाने देखील ताबील यांच्या मुद्द्याचं एका वेगळ्या प्रकारे समर्थन केलं आहे.

 

ताबील यांना त्यांच्या मुद्द्यावर जसं समर्थन मिळालं तसच त्यांना विरोधाचा देखील सामना करावा लागला, अनेकांनी त्यांना ट्रोल केले तर अनेकांनी सभ्य भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला, त्यातल्या काहि निवडक कमेंट्स ..

 

 

 

 

अश्या प्रकारे ताबील यांनी उपस्थित केलेल्या एका महत्वाच्या मुद्द्यावर मत मतांतर असली, तरी मुद्दा मह्त्वाचा रोजा व्रत, उपवास यांनी जर आपल्याच शरीराला अपाय होत असेल, तर मग केवळ  भक्तिभावातून त्याचे पालन करणे योग्य आहे का ? हो तर कितपत योग्य आहे ? तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा …

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version