आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
प्रत्येकजण आपल्या जगण्यासाठी पुरेसे पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असतो. काहीजण ह्यात यशस्वी होतात तर काहीजण नाही.
तसेच ऐनवेळी येणारी संकटे, वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, घर- गाडी घेणे अशा अनेक कारणांसाठी प्रत्येकालाच कधी ना कधी पैसे कमी पडतात.
अशावेळी आपल्यासमोर कर्ज घेण्याचा उपाय असतो. मात्र बऱ्याच जणांना कर्ज घेताना बँकेत सारखे खेटे मारावे लागतात. ह्याच कारण म्हणजे कर्ज घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची नीट माहिती नसणे.
तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्रांची माहिती घेऊया.
१ – मालमत्ता गहाण ठेऊन मिळणारे कर्ज :
आपल्या मालकीची एखादी मौल्यवान वस्तू , सोनं , मालमत्ता असेल तर ते गहाण ठेऊन आपण त्याच्यावर कर्ज मिळवू शकतो. हा कर्ज मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
कर्ज फिटेपर्यंत ती मालमत्ता बँकेच्या ताब्यात रहाते आणि व्याजासकट कर्ज फेडल्यानंतर आपली मालमत्ता परत आपल्या मालकीची होते. ह्यामध्ये सुद्धा नोकरदार आणि व्यावसायिक ह्यांच्यासाठी वेगवेगळी कागदपत्र लागतात
नोकरदार वर्गासाठी :-
a – अधिवासाचा पुरावा – रेशन कार्ड / टेलिफोन बिल / विजेचे बिल / मतदार ओळखपत्र ह्यापैकी कोणताही एक
b – ओळखीचा पुरावा – मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / वाहन चालवण्याचा परवाना ह्यापैकी कोणताही एक
c – मागच्या सहा महिन्याच्या पगाराच्या पावत्या आणि मागच्या दोन वर्षांचे आयकर प्रमाणपत्र
d – आपल्या सर्व संपत्तीचे कागदपत्र
व्यावसायिकांसाठी :-
a – अधिवासाचा पुरावा – रेशन कार्ड / टेलिफोन बिल / विजेचे बिल / मतदार ओळखपत्र ह्यापैकी कोणताही एक
b – ओळखीचा पुरावा – मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / वाहन चालवण्याचा परवाना ह्यापैकी कोणताही एक
c – आपल्या सर्व संपत्तीचे कागदपत्र
d – मागच्या दोन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणित स्टेटमेंट
e – बँकेचे नजीकच्या काळातील पासबुक / स्टेटमेंट
२ – वैयक्तिक कर्ज
वैयक्तिक कर्ज हे कोणत्याही कारणासाठी घेतल जाऊ शकत. अगदी लग्न , इतर कुठलाही आनंदाचा सोहळा, कोणतीही वस्तू विकत घेणे ह्यापैकी कोणत्याही करणासाठी आपण वैयक्तिक कर्ज घेऊ शकतो.
ह्या कर्जाचे व्याजदर बाकी सगळ्या कर्जांपेक्षा जरा जास्त असतात. ह्या कर्जासाठी लागणारे कागदपत्र खालीलप्रमाणे –
a – अधिवासाचा पुरावा – रेशन कार्ड / टेलिफोन बिल / विजेचे बिल / मतदार ओळखपत्र ह्यापैकी कोणताही एक
b – ओळखीचा पुरावा – मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / वाहन चालवण्याचा परवाना ह्यापैकी कोणताही एक
c – नजीकच्या काळातील पगाराच्या पावत्या / आयकर भरल्याचे प्रमाणपत्र
३ – व्यावसायिक कर्ज
आपला सुरु असलेला व्यवसाय मोठा करण्यासाठी किंवा कोणताही नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी आपण व्यावसायिक कर्ज घेऊ शकतो. ह्या कर्जासाठी लागणारे कागदपत्र खालीलप्रमाणे –
a – अधिवासाचा पुरावा – रेशन कार्ड / टेलिफोन बिल / विजेचे बिल / मतदार ओळखपत्र ह्यापैकी कोणताही एक
b – ओळखीचा पुरावा – मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / वाहन चालवण्याचा परवाना ह्यापैकी कोणताही एक
c – पॅनकार्ड
d – बँकेचे मागच्या सहा महिन्यांचे स्टेटमेंट
e – आयकर भरल्याचे प्रमाणपत्र ज्यात उत्पन्न , खर्च, नफा ह्याचा उल्लेख असेल आणि ते सिएने प्रमाणित केलेले असेल.
f – व्यवसाय करण्याचे परवानगीपत्र
f – इतर कागदपत्र ( व्यवसायाची मालकी असल्याचे कागदपत्र , भागीदारी असल्याचे भागीदारीचे प्रमाणपत्र , बोर्ड रोसोल्युशन )
४ – व्यावसायिक वाहन कर्ज
व्यावसायिक वाहन म्हणजे जे वाहन वापरून व्यवसाय केला जातो. ट्रक ,रिक्षा , प्रवासी टॅक्सी अशाप्रकारची वाहन ही व्यावसायिक वाहन ह्या प्रकारात येतात. अशाप्रकारची वाहने घेण्यासाठी सुद्धा आपण कर्ज घेऊ शकतो.
कर्ज पूर्ण फेडून होईपर्यंत ह्या वाहनावर बँकेची मालकी असते. आपण कर्ज पूर्णपणे फेडल्यावर त्या वाहनाची मालकी आपल्याकडे येते. अशा कर्जासाठी लागणारे कागदपत्र खालीलप्रमाणे –
a – अधिवासाचा पुरावा – रेशन कार्ड / टेलिफोन बिल / विजेचे बिल / मतदार ओळखपत्र ह्यापैकी कोणताही एक
b – ओळखीचा पुरावा – मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / वाहन चालवण्याचा परवाना ह्यापैकी कोणताही एक
c – वयाचा पुरावा
d – उत्पन्नाचा पुरावा
e – हातात असलेल्या कामाचा पुरावा
f – सध्या असलेल्या वाहनाच्या मालकीचे कागद
कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्ज मिळण्यासाठी लागणारे कागदपत्रे :
कर्ज मिळवण्यासाठी वरीलप्रमाणे सगळे कागदपत्र दिल्यावर आपले कागदपत्र बघून बँका आपल कर्ज मंजूर किंवा नामंजूर करतात. जर आपल कर्ज मंजूर झाल तरी ते पैसे लगेच आपल्या हातात येत नाहीत.
मंजूर झालेलं कर्ज आपल्या हातात येण्यासाठी सुद्धा काही कागदपत्रांची गरज असते. ती दिल्यावरच आपले पैसे आपल्या हातात येतात. मंजूर झालेल्या कर्जाचे पैसे हातात येण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्र लागतात –
१ – कर्ज घेण्याबद्दलचे अॅग्रीमेंट
२ – पोष्ट डेटेड चेक्स
३ – विमा प्रमाणपत्र
वर दिलेली कागदपत्रे ही साधारणपणे लागणारी कागदपत्रे आहेत. तरीही प्रत्येक कर्जानुसार ही कागदपत्र बदलत असतात.
त्यामुळे आपण कर्ज घेताना लागणाऱ्या कागदपत्रांची नीट माहिती मिळवून ती जमा करूनच बँकेत गेलो तर आपल्याला पुन्हा पुन्हा खेटे मारावे लागणार नाहीत.
अशाप्रकारे आपण वेगवेगळ्या कारणासाठी बँकेकडून कर्ज मिळवू शकतो. मात्र कर्ज घेताना त्याचे व्याजदर, त्याच्या अटी ह्याची नीट माहिती करून घेणे फार आवश्यक असते.
तसेच कर्ज घेणे हा एक नाईलाज आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कर्ज हे चैनीसाठी न घेता अत्यावश्यक गरज म्हणूनच घेतले पाहिजे कारण घेतलेल्या कर्जावर आपल्यालाच व्याजसुद्धा भरावे लागते.
वर नमूद केलेल्या गोष्टी पाळून आपण आपल्याला हवे ते कर्ज सहजपणे मिळवू शकतो आणि चांगले आयुष्य जगू शकतो.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.