Site icon InMarathi

त्या पोलिंग ऑफिसर महिलेच्या व्हायरल फोटोमागील सत्य हे आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

समाजमाध्यमांवर काय आणि कोण केव्हा व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने राजकारणावर सर्वत्र चर्चा झडतांना दिसता आहेत.

आपल्या देशात राजकारण, चित्रपट आणि क्रिकेट हे जिव्हाळ्याचे विषय आहेत आणि या चर्चांमध्ये कुणीही मागे नसते.

तर सध्या ज्या एका व्यक्तीचे फोटो व्हायरल झाले आहेत ती एक सरकारी कर्मचारी आहे. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात या फोटोची चर्चा सुरु आहे.

६ मे ला देशात पाचव्या टप्प्यात मतदान होतं त्या वेळी पिवळी साडी नेसलेल्या आणि हाती इव्हीएम घेऊन निघालेल्या एका महिला निवडणूक अधिकाऱ्याचा फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

 

sabkuchgyan

मग काय चर्चांना ऊत आला. कुठे जास्त प्रमाणात मतदान करा म्हणून या छायाचित्राचा आधार घेतला गेला तर कुठे त्या नियुक्त असलेल्या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झाल्याचे सांगितले गेले.

पुढे हा फोटो जितका व्हायरल होत गेला तसे या फोटोविषयी अनेक दावे केले गेले.

सर्वात पहिली बाब म्हणजे हा फोटो नक्की कुठला आहे, कुणाचा आहे तर हा फोटो हरियाणा, जयपूर, गाझियाबाद आणि २९ एप्रिलला मुंबईतील मतदान संपले होते तरी ही महिला अधिकारी मुंबईची असल्याचा दावा केला गेला.

मात्र अखेरीस हा फोटो लखनऊ येथील असल्याचे स्पष्ट झाले.

तसेच या महिला अधिकाऱ्याची अनेक नावे समोर आली. त्यात जयपूर च्या मिस जयपूर नलिनी सिंह यांचा हा फोटो असल्याच्या अनेक पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत होत्या.

 

tv9marathi.com

अखेरीस या फोटोमागील रहस्य संपले असून या फोटोमागची सर्व कहाणी उलगडली आहे. पिवळी साडी नेसलेली आणि हातात इव्हीएम घेऊन जाणाऱ्या या महिला अधिकारी आहेत रीना व्दिवेदी!

त्या लखनऊ येथील रहिवासी असून उत्तर प्रदेश सरकारच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत.

निवडणुकीसाठी मोहनलालगंज येथील एका मतदानकेंद्रावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

६ मे रोजी त्याठिकाणी मतदान झाले त्याच्या आदल्या दिवशी इव्हीएम  घेऊन जातांना त्यांचे छायाचित्र नवभारत टाइम्सचे शुभम बन्सल यांनी घेतले.

त्यानंतर वर्तमानपत्रात आणि समाजमाध्यमांत ते छायाचित्र आले आणि मग पुढे देशभर व्हायरल झाले.

तसेच रीना व्दिवेदी ज्या मतदान केंद्रावर नियुक्त होत्या तिथे जो दावा केला गेला होता की, ९८ टक्के – १०० टक्के मतदान झाले तो चुकीचा असून जवळपास ७० टक्के मतदान झाले आहे.

 

vote.com

आता रीना व्दिवेदी प्रकाशझोतात आल्या असून त्यांचे टिकटॉक वर असलेले व्हिडीओज देखील व्हायरल झाले आहे.

त्यांनी आपण असेच राहत असून पारंपारिक साडीला पसंती असल्याचे सांगितले. तसेच त्यांचे फोटो व्हायरल झाले त्याकडे त्या स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय सकारत्मक दृष्टीनेच पाहत असल्याचे सांगितले.

सध्या रीना व्दिवेदी उत्सवमूर्ती असून अनेकजण त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अजून गमतीची एक बाब म्हणजे त्यांचे फोटो काही पहिल्यांदा व्हायरल झाले नाहीत. २०१७ ला झालेल्या निवडणुकीच्या वेळीदेखील त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. यंदा मात्र त्यांनी देशभर प्रसिद्धी मिळवली आहे.

अजून एक चेहरा 

असाच एक फोटो मध्यप्रदेश मधील भोपाळ इथून व्हायरल झाला आहे. निळा ड्रेस आणि गॉगल अशा आकर्षक वेशात असलेल्या योगेश्वरी गोहिते ओंकार या महिला अधिकारी भोपाळमधील गोविंदपुरा विधानसभा क्षेत्रातील एका मतदान केंद्रात नियुक्त होत्या.

 

newsnation.com

सहाव्या टप्प्यात १२ मे ला त्यांचा देखील असाच फोटो व्हायरल झाला आहे. योगेश्वरी या सरकारी बँकेत कार्यरत असून त्या पहिल्यांदाच निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. मतदान सुरु असतांनाच त्यांना मुलाखत देण्याची विनंती करण्यात आली.

मात्र त्यांनी निवडणुकीच्या कामाचा हवाला देत मुलाखत दिली नाही. पण त्यांची क्रेझ इतकी होती कि मतदान संपल्यानंतर अनेक सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतला.

एकीकडे निवडणुकीचा ज्वर पेटलेला असतांना आयपीएल चा थरार देखील शिगेला पोहोचला होता.

तेव्हा नेटकऱ्यांनी या दोघींची तुलना करतांना मुंबई आणि चेन्नई यांच्या जर्सी याच रंगाच्या असल्याने या दोन संघात चुरस असल्याचे सांगितले.

 

Firstpost

निवडणुकीत समाजमाध्यमांचा मोठा प्रभाव राहिला आहे. त्यात अशा हलक्याफुलक्या गोष्टींनी देखील रंग भरले जातात.

लोकसभेच्या निवडणुकीत लखनऊ आणि भोपाळ या दोन्ही जागा आतापर्यंत मातब्बर उमेदवारांच्या नावाने चर्चेत होत्या आता या दोन चेहऱ्यांची त्यात अजून भर पडली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version