तुमच्याकडे भारतातील पासपोर्ट आहे का? मग ही माहिती खास तुमच्यासाठी…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पुर्वी केवळ अशक्य वाटणारा विमानप्रवास आता सहज शक्य बनला आहे.
हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटांमध्ये विमान पाहिलं की प्रत्येकाला विमान प्रवासाची ओढ लागायची, आता मात्र केवळ परदेशातच नव्हे तर देशांतर्गत प्रवासासाठीही विमानाचं तिकीट काढत अवघ्या काही मिनिटींमध्ये हे अंतर पार करण्याला अधिक पसंती दिली जाते.
कामाचा दौरा असो वा सहल, विमान प्रवास प्रत्येकाच्या आवडीचा असतो. मात्र परदेशी विमान प्रवास करण्यासाठी पासपोर्ट असणं गरजेचं आहे.
भारतीय पासपोर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सरकार कडून नागरिकाला प्रदान केले गेलेले अधिकृत प्रमाणपत्रचं!
पासपोर्टमध्ये तुमच्या विषयी सर्व माहिती नोंदवलेली असते आणि ती हे दर्शवते, की तुम्ही भारताचे नागरिक आहात. जर तुमच्याकडे पासपोर्ट नसेल तर तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास करू शकत नाही. असा हा पासपोर्ट ज्यांच्याकडे आहे किंवा ज्यांना नवीन पासपोर्टसाठी अर्ज करायचा आहे त्यांना पासपोर्ट बद्दलच्या काही गोष्टी माहित असायलाच हव्यात ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतील आणि पासपोर्टचा नेमका वापर तुम्हाला कळेल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे २५ नोव्हेंबर २०१५ पासून इंटरनॅशनल सिव्हील एव्हीएशन ऑर्गनायझेशनने हस्तलिखित पासपोर्ट संपूर्ण जगामधून रद्द केला आहे.
जर तुमच्याकडे हस्तलिखित पासपोर्ट असेल तर तो आता पूर्णपणे निरुपयोगी आहे. त्यामुळे तुम्हाला आता नवीन पासपोर्टसाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला संगणीकृत पासपोर्ट प्रदान करण्यात येईल.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
भारतामध्ये तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. पर्सनल पासपोर्ट, डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि ऑफिशियल पासपोर्ट!
पर्सनल पासपोर्ट
–
- पासपोर्ट आहे? अहो मग “या” २४ देशांमध्ये फिरून या, येथे भारतीयांना व्हिसा लागत नाही!
- ६ पासपोर्ट, ६५ देश! ६५ वर्षांच्या तरुणीच्या भटकंतीची कथा चार भिंतीतून बाहेर पडण्याची प्रेरणा देते
–
देशात सर्वाधिक पासपोर्ट धारक हे पर्नसल अर्थात वैयक्तिक कारणांसाठी पासपोर्ट वापरतात.
परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न अथवा तेथे नोकरी करण्याची संधी, या बाबी पुर्वीइतक्या अशक्य राहिलेल्या नाहीत. पदवी तसेच पदव्युत्तर शिकण घेण्यासाठीही विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर परदेशाकडे वळताना दिसतात.
त्यासह वर्षातून किमान एक तरी परदेशी टुर करण्याचा अनेकांचा प्रयत्न असल्याने सहलीच्या निमित्तानेही भारतीय पर्यटक परदेशात भटकताना दिसतात. अशा सगळ्या कारणांसाठी वैयक्तिक पासपोर्ट गरजेचा असतो,
डिप्लोमॅटिक पासपोर्ट
ऑफिशियल पासपोर्ट
पासपोर्ट जारी केल्यापासून १० वर्षापर्यंत पासपोर्ट वैध असतो.
एका वेळेस एका पेक्षा जास्त पासपोर्ट बाळगणे भारतीय कायद्यानुसार बेकायदेशीर आहे.
पासपोर्टशी निगडित कोणताही गैरव्यवहार उघडकीस आला, तर संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंदविला जातो.
अशा गुन्ह्यांमध्ये अनेकदा पासपोर्ट रद्द होण्याचीही भिती असते, गुन्ह्यामुळे एकदा पासपोर्ट रद्द झाला, तर त्या व्यक्तीची पुन्हा परदेशवारी होणे अशक्य आहे.
पासपोर्ट हा तुमचा अधिकार असला तरी त्याचा वापर करताना सावधान…
कारण पासपोर्टसाठी आवश्यक असलेली माहिती नोंदविताना लहानशी चुकही तुम्हाला चांगलीच महागात पडु शकते.
–
- पासपोर्ट साठी अर्ज करताय? इकडे लक्ष द्या- परराष्ट्र मंत्रालयाने नवीन नियम जारी केलेत!
- जगात केवळ “तीनच” लोकांकडे असलेला exclusive पासपोर्ट!
–
पासपोर्ट कायदा १९६७ नुसार पासपोर्टसाठी अर्ज करताना खोटी माहिती दिल्यास शिक्षा होऊ शकते.
त्यामुळे तुमचे नाव, संपर्क, पत्ता यांसह अन्य कोणतीही वैयक्तिक माहिती देताना ती खरी असणे गरजेचं असून फॉर्म भरण्यापुर्वी वारंवार तपासणं गरजेचे आहे.
सामान्यत: कोणत्याही प्रकारच्या पासपोर्टमध्ये ३० पाने असतात. पण तुम्ही ६० पानांच्या पासपोर्टसाठी देखील अर्ज करू शकता.
जगातील सर्वात पावरफुल पासपोर्टमध्ये भारताचा पासपोर्ट हा ४९ गुणांसह ७८ व्या क्रमांकावर आहे.
२००७ पासून भारताने पासपोर्टसाठी अर्ज करण्याची नवीन प्रणाली अंमलात आणली आहे.
या प्रणाली अंतर्गत भारतात सध्या ७७ पासपोर्ट सेवा केंद्र आहेत.
भारतातील ज्या नागरिकाकडे पासपोर्ट आहे, तो नागरिक व्हिजा शिवाय ५८ देशांमध्ये फिरू शकतो.
काही देशांमध्ये तेथे पोहोचल्यावर व्हिजा देण्यात येतो. त्याला व्हिजा ऑन अर्व्हल असं म्हटलंं जातं.
पासपोर्टमध्ये भारताच्या राष्ट्रपतींची एक अधिकृत नोट असते. ज्यामध्ये राष्ट्रपती आश्वासन देतात की, ज्या व्यक्तीला पासपोर्ट देण्यात आला आहे, ती व्यक्ती भारतीय प्रजासत्ताकचा नागरिक आहे.
ही नोट इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये असते.
ती नोट खालीलप्रमाणे:
These are to request and require in the Name of the President of the Republic of India all those whom it may concern to allow the bearer to pass freely without let or hindrance, and to afford him or her, every assistance and protection of which he or she may stand in need.
–
By order of the President of the Republic of India
आणि हिंदीत –
इसके द्वारा, भारत गणराज्य के राष्ट्रपति के नाम पर, उन सब से जिनका इस बात से सरोकार हो, यह प्रार्थना एवं अपेक्षा की जाती है की वे वाहक को बिना रोक-टोक, आज़ादी से आने-जाने दें, और उसे हर तरह की ऐसी सहायता और सुरक्षा प्रदान करें जिसकी उसे आवश्यकता हो.
-भारत गणराज्य के राष्ट्रपति के आदेश से दिया गया
या गोष्टी जाणून घेतल्याने पासपोर्ट बद्दलच्या तुमच्या सर्व शंकांचे निरसन नक्कीच झाले असेल !
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.