आर्टस् शाखेतून १२वी केलंय? हे १५ करिअर ऑप्शन्स तुमचं भवितव्य सुरक्षित करतील..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बरं तर मित्रांनो 12वी झाली. आणि लवकरच निकाल पण जाहीर होईल. आपल्या आयुष्यात करियरच्या दृष्टीने हा टप्पा सर्वात महत्वाचा असतो. कारण 12वी नंतरच आपण कोणत्या क्षेत्रात आपलं करियर करणार हे ठरणार असतं.
बरं हे काही फक्त विज्ञान किंवा वाणिज्य शाखेशी निगडीत आहे असंही नाही बरं का! तर कला शाखेबद्दल सुद्धा…
कारण जागतिकीकरण आणि प्रत्येक क्षेत्राची विस्तारणारी व्याप्ती पाहता छंद जोपासत असताना किंवा उपजत असलेल्या कलेला प्रोफेशन बनवू शकतो.
त्यामुळे कला शाखेत ठराविक क्षेत्रात करियर करण्याच्या सीमारेषा पुसल्या गेल्या असून, करियरचे क्षितीज विस्तारले आहे.
चला तर मग जाणून घेऊ 12वी नंतर करता येणारे हे १५ करिअर ऑप्शन्स जे तुमचं भवितव्य सुरक्षित करतील..
१. B.F.A (Bachelor of Fine arts) :-
जर तुम्ही काही विशेष कालगुण किंवा कौशल्य जसे की चित्रलेखन, शिल्प, नृत्य, अभिनय, गायन इत्यादि मध्ये पारंगत असाल तर हा चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम तुमच्या करियर साठी अगदी योग्य पर्याय ठरू शकतो.
यास प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये अनेक उपविभाग असून, पदवी आणि पदविका शिक्षणक्रमही उपलब्ध आहेत. या नंतर तुम्हाला नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय देखील करू शकता.
फक्त भारतातच नाही तर परदेशी देखील आपल्या क्लागुणांना वाव मिळू शकतो.
२. B.J.M (Bachelor of Journalism and Mass Communications):-
तुम्हाला पत्रकारितेची आवड असेल तर हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे तुम्हाला नक्की यशस्वी करू शकतो.
यामध्ये मुद्रित माध्यम, वृत्त वाहिनी, आकाशवाणी हे उपविभाग आहेत.
यामध्ये ही पदवी आणि पदविका शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. यामध्येही नोकरी किंवा व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध आहेत.
3. B.SW (Bachelor of Social Work) :-
तुम्ही जर करियर व समाजसेवा यांचा एकत्र विचार करत असाल तर हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम तुम्हाला तुमच्या भविष्यात खूप उपयोगी ठरू शकतो.
B.SW केल्या नंतर अनेक मोठमोठ्या सहकारी संस्थामध्ये करियर करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.
४.B.A (Bachelor of Arts) :-
कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी सर्वात उपयुक्त असा हा 3वर्ष पूर्णवेळ कालावधीचा अभ्यासक्रम. या कोर्सची खासियत ही आहे की यामधे तुम्हाला करियर साठी अनेक पर्याय मिळतात.
तुम्हाला साहित्य क्षेत्रात करियर करायचे असल्यास तुम्ही भाषा विषयात स्पेशलाइजेशन निवडू शकता. याशिवाय मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, इत्यादि अनेक विभागात करियर करू शकता.
५ .B.El.Ed (Bachelor of Elementary Education):-
शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची ईच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम तुमच्या करियर साठी अगदी उपयुक्त पर्याय आहे. यामध्ये पदवी आणि पदविका शिक्षणक्रमही उपलब्ध आहेत.
या कोर्स नंतर तुम्हाला सरकारी किंवा खाजगी शिक्षणसंस्था मध्ये नोकरी मिळू शकते.
६ .B. P. ED (Bachelor of Physical Education):-
बीपीईडी किंवा शारीरिक शिक्षण हे क्रीडा आणि शारीरिक फिटनेसशी निगडित आहे. ज्याला क्रीडा आणि फिटनेसमध्ये रस आहे आणि तो त्याच्या करियरच्या रूपात निवडण्यासाठी तयार आहे तो या कोर्सची निवड करू शकतो.
अर्थात मूलभूतपणे सर्व प्रकारच्या क्रीडा आणि त्याच्या संबंधित ज्ञानाच्या कार्यक्षेत्रावर दिला जाणारा हा एक विस्तृत अभ्यासक्रम आहे. साधारण ३-४ वर्षांचा कालावधी चा हा कोर्स आहे.
७ .Integrated Law course :-
कायदा क्षेत्रात करियरसाठी पाच वर्षं पूर्णवेळ कालावधीचा हा अभ्यासक्रम आहे यामध्ये प्रामुख्याने आयपीसी-फौजदारी कायदा, दिवाणी कायदा, व्यापारी कायदे, प्रशासकीय कायदा, कंपनी कायदा, पुराव्याचा कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, प्रदूषण नियंत्रण कायदा, वनविषयक कायदे, सहकार कायदा यांचा अभ्यास करतो.
निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट अॅक्ट, राज्यघटनेचा कायदा, पेटंट कायदा, पर्सनल लॉ, कामगार कायदा, नुकसान भरपाईचा कायदा, करार कायदा, मिळकतीचा कायदा, इन्कमटॅक्स, सेल्सटॅक्स, एक्साईज इत्यादीचा अभ्यासक्रम असतो.
शिवाय सर्वच क्षेत्रात कायद्याची गरज पडत असल्याने अनेक चांगल्या संधीही आहेत.
८.B.H.M.(Bachelor of Hotel Management) :-
हॉटेल मॅनेजमेंटमधलं करिअर कॉलेजिअन्समध्ये आवडते करियर आहे. यामध्ये हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री, टूरिझम इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री अश्या वेगवेगळ्या विभागात करियर करू शकतो.
3 वर्षं पूर्णवेळ असा पदवी आणि 1 ते 2 वर्षांचा पदविका अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहे. या कोर्स नंतर तुम्ही नोकरी किंवा स्वतःचा हॉटेल व्यवसाय करू शकता.
९. B.E.M (Bachelor of Event Management) :-
आजकाल आपण पाहतो की वेगवेगळे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, व्यवसायिक, घरगुती कार्यक्रम, सोहळे होत असतात. आणि या मोठमोठ्या सोहळ्यांना आयोजनाची मोठ्या प्रमाणात गरज पडत असते.
तर तुमच्यामध्ये व्यवस्थापन नियोजनाची कला अवगत असेलतर हा करियर ऑप्शन तुमच्यासाठी अगदी योग्य आहे.
यामध्ये नोकरीच्या संधी तर आहेतच शिवाय स्वतःचा व्यवसाय देखील करू शकता. यामध्ये सुद्धा पदवी, पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
१०. B.B.A.(Bachelor of Business Administration) :-
B.B.A. म्हणताच तुम्हाला जर वाटत असेल की हे तर कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. तर असं नाहीये.
B.B.A. हा कोर्स तुम्ही 12वी आर्ट्स नंतर देखील करू शकता. या कोर्स केल्यावर तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये करियरच्या अनेक संधी आहेत.
११. FASHION DESIGN :-
फैशन जगतात आपली ओळख निर्माण करण्याची जर आपली ईच्छा असेल तर फैशन डिजाईनचा कोर्स आपल्यासाठी योग्य आहे. हा देखील फाइन आर्ट्स सारखाच विषय आहे जिथे आपल्या सर्जनशीलतेला पूर्ण वाव मिळतो.
फैशन डिजाईन चार वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे.यामध्ये देखील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
१२. GRAPHIC DESIGN :-
हा विषय खूप मोठा आणि विस्तृत आहे. यामध्ये जाहिरात, फोटोग्राफी, प्रिंटिंग, वेब डिझाइन, अॅनिमेशन अश्या वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो.
या पैकी कुठल्याही विषयात तुम्ही स्पेशलाइजेशन करून करियरची सुरुवात करू शकता.
१३. INTERIOR DESIGN:-
फैशन डिजाइनिंग प्रमाणे इंटिरियर डिजाइनिंग हा देखील ग्लैमरस करियर आहे. 12 वी झाल्यावर इंटिरियर डिझायनरचा डिप्लोमा किंवा पदवी अभ्यास करता येतो.
यामध्ये फक्त घर किंवा ऑफिस एवढंच मर्यादित पर्याय नसून मॉल, हॉस्पिटल्स, मल्टीप्लेक्स, अश्या विविध ठिकाणी देखील इंटिरियर डिझायनरची आवश्यकता असते.
त्यामुळे एकूणच करियरच्या दृष्टीने हे क्षेत्र चांगला पर्याय ठरू शकतो.
14. AVIATION COURSES :- हा एअरपोर्ट मॅनेजमेंट शी निगडित कोर्स आहे. या मध्ये विमानतळ व्यवस्थापनपासून ते सुरक्षा व्यवस्थापन अश्या अनेक गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत.
हे 3 वर्षांचे ग्रॅज्युएट मॅनेजमेंट प्रोग्राम आहे.
१५ .HOME SCIENCE:-
होम सायन्स हा 3 वर्षांचा ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे. होम सायन्स मध्ये प्रत्येक उत्पन्न गटासाठी घरगुती आर्थिक योजना तयार करणे आणि अन्न विज्ञान, अन्न आणि पोषणविषयक पाया, फॅब्रिक आणि परिधान विज्ञान, बाल विकास इत्यादी विषय अभ्यासक्रमात असतात.
हा कोर्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संसाधन विकास, मानव संसाधन व्यवस्थापन, कापड आणि कपडे, शिक्षण, आतिथ्य इ. सारख्या विविध क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळू शकते.
तर ही काही करियर ऑप्शन्स आहेत जे तुम्ही 12वी आर्ट्स नंतर करू शकता. या शिवाय अनेक करियर ऑप्शन्स आहेत.
जे तुम्ही 12वी आर्ट्स नंतर करू शकता. तुमच्यात कलागुण असेल आणि ते नावीन्यपूर्ण पद्धतीने सादर करण्याची हातोटी तुमच्यात असले तर, त्याचा प्रत्यक्ष जीवनात करिअर म्हणून वापर करता येऊ शकतो.
मात्र, त्यासाठी तुम्हाला त्यातील सखोल ज्ञान मिळवावे लागते. त्याला काष्टाची आणि संयमाची जोड द्यावी लागते.
त्यानंतर चांगली नौकरी किंवा स्वतः चा व्यवसाय देखील करू शकता. शेवटी आपल्याला काय व्हायचंय या पेक्षा आपल्याला काय करायचं आहे हे ध्येय स्पष्ट असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात नक्की यशस्वी होऊ शकता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.