' केरळ मध्ये उभं असलेलं हे भव्य “अॅडव्हेंचर पार्क” चक्क त्रेता युगाची सफर घडवून आणतं! – InMarathi

केरळ मध्ये उभं असलेलं हे भव्य “अॅडव्हेंचर पार्क” चक्क त्रेता युगाची सफर घडवून आणतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रामायण महाभारत ह्या दोहोंचा आपल्या आयुष्यावर खूप जास्त प्रभाव आहे हे आपण खूप आधीपासून अनुभवत आलो आहोतच!

देशातील प्रत्येक व्यक्ति आपल्या परीने ह्या दोन्ही ग्रंथांना समजून घेत असते, आणि याबाबतीत प्रत्येकाची मतं देखील वेगवेगळी असतात!

तसंच या दोन्ही ग्रंथांबद्दल बऱ्याच आख्यायिका आणि बऱ्याच दंतकथा सुद्धा प्रसिद्ध आहेत ज्या आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकत असतोच! 

रामायणामधल्या जटायूची कथा आपण सगळे जाणतोचं! जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले होते तेव्हा जटायू पक्षाने सीतेला सोडवण्यासाठी रावणाशी संघर्ष केला होता.

पण या संघर्षात असत्याचा विजय झाला आणि रावणाने जटायूचे पंख छाटून त्याला गंभीर जखमी केले. पंख छाटल्यामुळे जखमी झालेला जटायू विव्हळत जमिनीवर पडून होता.

 

Jatayu-rawan-sita-ramayan-inmarathi
TemplePurohit.com

 

काही वेळाने सीतेच्या शोधार्थ निघालेल्या राम आणि लक्ष्मणाने जखमी जटायूला पहिले आणि त्याच्याकडून राम आणि लक्ष्मण यांना सीतेच्या अपहरणाचा वृत्तान्त कळला.

त्याच्या धाडसाबद्दल रामाने जटायुचे आभार मानले. रामाच्या तोंडून आपली स्तुती ऐकताच जटायू धान्य झाला आणि त्याने आपले प्राण सोडले. अशी ही जटायूची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.

जटायूच्या याच बलिदानाच्या स्मरणार्थ देव राज्य अशी ख्याती असणाऱ्या केरळ मध्ये एका प्रचंड मोठ्या जटायू पार्कची उभारणी केली गेली जात आहे.

 

jatayu-park-marathipizza
thebetterindia.com

 

केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यात असणाऱ्या चदायमंगलम गावामध्ये हे जटायू पार्क स्थित आहे. असे म्हटले जाते की रावणाने जटायूचे पंख छाटल्यावर जटायूचा गावातील एका ठिकाणी पडला होता.

या भव्यदिव्य पार्कमधील कोपरा न कोपरा अगदी पाहण्यासारखा आहे. या पार्कची रचना इतकी सुंदर आहे की तुम्हाला जणू तुम्ही त्रेतायुगामध्ये आहात की काय असा भास होतो.

या पार्कमध्ये एका डोंगराच्या माथ्यावर जटायूची भलीमोठी दगडी प्रतिकृती देखील उभारण्यात आली आहे. एखाद्या पक्षाची ही जगातील सर्वात मोठी प्रतिकृती आहे.

२०० फुट रुंद, १५० अरुंद आणि उंची ७० फुट उंच असलेल्या या प्रतिकृतीने १५०० स्केअर फुट एवढी जागा व्यापली आहे.

या प्रतिकृतीमध्ये पर्यटकांना प्रवेश देखील करता येतो…! या प्रतिकृतीमध्ये म्युझियम, 6डी थियेटर आणि अनेक गोष्टींचा समावेश आहे.

पार्क उभारणारे विकासक सांगतात की जटायूची ही प्रतिकृती तेथेच उभारण्यात आलेली आहे जेथे जटायू जखमी होऊन पडला होता.

 

jatayu-park-marathipizza01
chadayamangalam.com

 

तब्बल ६५ एकर मध्ये पसरलेल्या जटायू पार्कच्या उभारणीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी सरकारतर्फे मान्य करण्यात आला आहे.

या पार्कच्या पहिल्या टप्प्यामध्ये एक अॅडव्हेंचर क्षेत्र आहे जे २०१७ वर्षाच्या मार्च पर्यंत पर्यटकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

या अॅडव्हेंचर क्षेत्रामध्ये २० प्रकारचे खेळ असतील, ज्यामध्ये पेंट बॉल, लेजर टॅग, शुटींग, रॉक क्लायबिंग, बोल्डरिंग अश्या अनेक आकर्षक खेळांचा समावेश आहे.

या पार्कची उभारणी जटायूपारा टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन आणि चित्रपट निर्माते राजीव अंचल यांच्या देखरेखीखाली होत आहे. त्यांनी याबबत आपले मत देताना सांगितले की,

केरळ राज्यातील हे सर्वोत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस आहे. पर्यटनासोबत मनोरंजन आणि आपल्या संस्कृतीचा प्रसार करणे हे आमच्या या पार्कचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 

jatayu-park-marathipizza02
india.com

 

पार्क सुरु होण्यापूर्वीच लाखो पर्यटक जटायू पार्कच्या प्रेमात पडले आणि एप्रिल २०१८ मध्ये हे पार्क लोकांसाठी खुलं केलं गेलं, आणि त्याला भरभरून प्रतिसाद लोकांनी दिला आहे!

आता तर हे ठिकाण पर्यटकांमध्ये सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले आहे! शिवाय केरळ आणि दक्षिण भारतातील पहिली केबल कार असलेले एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून सुद्धा आता हे लोकप्रिय होत आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?