आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सचिन तेंडूलकरच्या दाढी करण्याने देखील झालाय विश्वविक्रम!
आत्ता हे काय नवीनच! असा कोणता विक्रमी प्रकार आहे दाढी करण्याचा ज्याने विश्वविक्रम घडेल? सेलिब्रिटी असले म्हणून काय यांच्या दाढी केल्याच्या बातम्या वाचायच्या?
अहो असे गोंधळून जाऊ नका. आधी बातमी नीट वाचा.
तसाही बरच काही पहिल्यांदा करण्याचे विक्रम सचिनच्या नावावर आहेतच! तसाच एक हा देखील दाढी करण्याचा विक्रम!
क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडूलकरने नुकतीच दाढी केली होती, तीही स्वतः नाही. तर एका मुलीने सचिनची दाढी केली.
का केलं असं सचिनने? अर्थातच महिला केशकर्तन करणाऱ्याना पाठींबा दर्शवण्यासाठी! दुसऱ्या कुणाकडून तरी दाढी करून घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे असेही तो म्हणाला.
क्रिकेट हा भारतीयांसाठी धर्म आहे आणि महान क्रिकेटर सचिन तेंडूलकर आहे त्यांचा देव! या महान खेळाडू बद्दल आपण जितकी माहिती मिळवू तितकेच आपण अजून त्याच्या प्रेमात पडत जातो.
काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अकाऊन्ट वरून सचिन तेंडूलकरने आपल्या चाहत्यांना अशी माहिती दिली होती ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.
क्रिकेटमध्ये अनेकानेक विक्रम रचणाऱ्या या महान खेळाडूने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्याच्या खाली त्याने लिहिलंय…
“माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे! तुम्हाला हे माहित नसेल पण, यापूर्वी मी कधीही कोणा दुसऱ्यांकडून दाढी करवून घेतलेली नाही. हा विक्रम देखील मोडीत निघाला.
केशकर्तनालयातील मुलींना भेटणे हा माझ्यासाठी एक सन्मानाचा क्षण होता.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
या फोटोमध्ये सचिन एका केशकर्तनालयामध्ये बसून एका मुलीकडून दाढी करवून घेताना दिसत होता. या इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सचिन तेंडूलकर समाजातील जुनाट रूढी गाडू पाहत होता!
जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी मुली करू शकत नाहीत हेच त्याने यातून सिद्ध करून दाखवलं!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने उत्तर प्रदेश मधील मुलीकडून दाढी करवून घेतली. या दोन्ही मुली आपल्या आजारी वडिलांच्या मागेही यांचा हा व्यवसाय सांभाळतात.
वडील आजारी पडल्यानंतर घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी आपल्या वडिलांचा हाच व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. मुलीकडून दाढी करवून घेण्यास गिऱ्हाईक तयार नसत. त्यामुळे त्यांना आपला वेश बदलून मुलगा असल्याचं नाटक करावं लागलं. काय वाटते न फिल्मी स्टोरी?
–
- दृष्टिहीन असूनही ‘अखियों के झरोखों से’ सौंदर्य अनुभवायला लावणारा शब्दांचा जादूगार…
- अशा उड्या मारुन पठ्ठ्याने गिनीज बुकमध्ये मिळवले स्थान, जरूर वाचा!
–
पण ही सत्य कथा आहे ज्योती कुमारी आणि नेहा कुमारी या उत्तरप्रदेशातील गोरखपूर मधील सख्या बहिणींची. किमान चार वर्षे तरी त्यांना मुलं बनूनच हा व्यवसाय करावा लागला.
चार वर्षानंतर त्यांनी आपली खरी ओळख उघड केली.
जिलेटने आपल्या रेझरच्या जाहिरातीच्या माध्यमातून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या संघर्षावर प्रकाश झोत टाकला होता. खरं तर महिलांनी महिलांचे केस कापण्याची प्रथा देखील खूप अलीकडची असली तरी ती आत्ता सर्वमान्य झाले.
काही पुरुषांनी देखील ब्युटीपार्लर आणि मेकअपच्या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. परंतु, महिलांनी पुरुषाची दाढी करायची? कल्पनाच करवत नाही.
या आगळ्यावेगळ्या कथेला समाजासमोर आणणाऱ्या जीलेटच्या काल्पक सर्जनशिलतेला दाद द्यावी तितकी थोडीच आहे.
वस्तुतः या व्यवसायामध्ये पुरुषांची मक्तेदारी असते, अशी परंपरा आहे. पण, ज्योती आणि नेहा यांनी या मक्तेदारीलाच आव्हान दिले आहे.
जिलेटची ही जाहिरात सोशिअल मेडियावर प्रचंड व्हायरल झाली असून संपूर्ण जगभरातून या दोन मुलींवर कौतुकाचा वर्षाव झाला!
सध्या युट्युबवर या जाहिरातीला मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत.
याबद्दल जिलेटचे देखील आभार मानायला हवेत. तेंडूलकर या दोन मुलींकडून दाढी करवून घेत असल्याच्या त्यांच्या या जाहिरातीमुळे या संघर्षाची माहिती अनेकांना झाली.
नाहीतर अशा गोष्टी कधीच्या विस्मृतीत जातात ते देखील कळत नाही. ही जाहिरात केल्यानंतर सचिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट देखील शेअर केली आहे.
कुठल्याच उद्योगात फक्त पुरुषांची मक्तेदारी असू शकत नाही.
फक्त पुरुषांसाठी किंवा मुलांसाठी असणारी कामे मुली किंवा महिला देखील करू शकतात, असे सचिन या पोस्टमध्ये लिहिले होते. कुणाच्याही स्वप्नांना कमी लेखू नका, असा संदेशही त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट वरून दिला होता!
विशेष बाब म्हणजे दुसऱ्या कुणाकडून तरी दाढी करवून घेण्याची त्याची ही पहिलीच वेळ असल्यानं, त्याच्यासाठी हा देखील एक नवा विक्रमच होता!
सामाजाच्या चालीरीती विरोधात किंवा परंपरांविरोधात शड्डू ठोकून उभं राहणं हे वाटतय तितक सोप काम नाहीच मुळी! लिंगाधारित जुनाट परंपरेला आव्हान देणाऱ्या नेहा आणि ज्योती यांना या जाहिरातीनंतर बरीच प्रसिद्धी मिळाली होती!
विशेषतः हे क्षेत्र पुरुषांसाठीच आहे असा समाज कित्येक वर्षे समाजात घट्ट रुजलेला आहे. त्यामुळे या समाजाला धक्का देण तसं सहज शक्य नाहीच. पण नेहा आणि ज्योती यांनी मात्र ते जिद्दीन करून दाखवलं खरं!
त्यांच्या या अतुलनीय धैर्याला सलाम! त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक गरज भागवण्यासाठी त्यांना जिलेट स्कॉलरशिप देखील प्रदान केली गेली!
सचिनने आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेतच. परंतु, त्याच्या या विक्रमाबद्दल मात्र त्याचा विशेष अभिमान वाटतो. आपल्या एका छोट्याशा कृतीतून त्याने जुनाट परंपरांना छेद दिला!
समाजात आदराच स्थान आणि विशेषतः सचिन सारख्या स्टाईल आयकॉन असणाऱ्या व्यक्ती जेंव्हा समाजातील अशा प्रथांवर बोट ठेवतात, त्याविरुद्ध प्रश्न विचारतात किंवा काही कृती करतात तेंव्हा निश्चितच समाजात एक बदलाची लाट उभी राहते.
जी संपूर्ण समाजाच्या भवितव्याला एक विधायक वळण देऊ शकते.
अर्थात यात त्यांना व्यक्तीशा खी जोखीम देखील उचलावी लागतेच. परंतु, सचिनने ही जबाबदारी लीलया पार पडली आणि सामाजाबाद्द्ल्चे उत्तरदायीत्व देखील निभावले.
नेहा आणि ज्योतीच्या या धाडसी प्रवासाला सलाम आणि शुभेच्छा! सचिन बद्दल आदर तर आहेच पण, त्याच्या या एका कृतीने तो अनंत पटीने दुणावला.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.