अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असूनही, आयकर भारतात भरण्यामागचं खरं कारण
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कधीकाळी एक्शन हिरो आणि हिरोइन्स सोबतची प्रेमप्रकरणं यामुळे कायमच चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार, मध्यन्तरी देशभक्तीपर आणि सामाजिक संदेश देणारे सिनेमे काढून त्यांनी आपली पूर्णपणे इमेजच बदलून टाकली, सध्या तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे
झालं असं की काही वर्षांपूर्वी त्याने तंबाखूची जाहिरात करणार नाही असं एका मुलाखतीत सांगितले होते, आणि आज तोच विमलच्या जाहिरातीत दिसून येतोय. यावरून त्याला बराच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. कालच त्याने सोशल मीडियावर माफी देखील मागतील आहे. पण या पहिलीच वेळ नाही याआधी सुद्धा नागरिकत्वाच्या मुद्यावरून बराच ट्रोल झाला होता…
खिलाडी अक्षय कुमार मागे त्याच्या कॅनडीयन नागरिकत्वाच्या वादामुळे अनेकदा चर्चेत आला होता. अर्थात, अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली ‘अराजकीय मुलाखत’ हा विषय निमित्त जरी असलं तरी हा विषय दर काही दिवसांनी चर्चेत येतच असतो.
एरव्ही राष्ट्रहिताची गोष्ट करणारा हा अभिनेता, स्वत: जवळ राष्ट्राच नागरिकत्व बाळगत नाही आणि परकिय नागरिक म्हणून इथे वास्तव्य करतो. तसेच इथलं सर्वोच्च राष्ट्रीय कर्तव्य मानल्या जाणऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत नाही. ह्या कारणामुळे सर्व समाजमाध्यामातून अक्षयवर टीकेची झोड उठत आहे.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
—
हे ही वाचा –
===
त्याच्या नैतीकतेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर सावध भूमिका घेत अक्षयने एका पोस्टच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली होती.
— Akshay Kumar (@akshaykumar) 3 मई 2019
या पोस्टमध्ये अक्षयने लिहिले होते की, भले हि त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व असलं तरी तो भारतात गेल्या सात वर्षांपासून वास्तव्यास आहे आणि तो नियमित आयकर भरतो.
त्याच्या ह्या स्पष्टीकरणानंतर मात्र त्याच्यावर होणाऱ्या टीकेची तीव्रता अजून वाढली आहे.
फोर्ब्ज या जगप्रसिद्ध नियतकालिकेच्या सर्वेक्षणानुसार अक्षय कुमार हा २०१७ साली भारतातील सर्वाधिक आयकर भरणारा अभिनेता होता.
त्याने तब्बल २९ कोटी रुपये आयकर अदा केला आहे.
या बाबतीत त्याने अनेक दिग्गज अभिनेत्यांना पिछाडीवर टाकलं होतं.
मग ह्यातून एक प्रश्न निर्माण होतो कि मूळतः कॅनडाचं नागरिकत्व असलेला अक्षय कुमार इतकी वर्ष भारतात वास्तव्य कसा करतो आणि आयकर तरी कसा अदा करतो? या बद्दल आपण आता जाणून घेणार आहोत.
भारतीय अर्थव्यवस्थेतील कररचना प्रणाली ‘निवासी’ तत्वावर निर्मीत असून ती ‘नागरिकत्व’ ह्या तत्वावर निर्माण केलेली नाही. परकीय नागरिकांचे तीन प्रकार आहेत.
परदेशात वास्तव्यास असणारे भारतीय नागरिक, परदेशी नागरिकत्व असलेले अनिवासी भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिक असे हे तीन प्रकार असून ह्यांच्यापैकी परदेशी नागरिकांनी भारतात १८२ दिवसांपेक्षा व्यवसाय केला अथवा वास्तव्यास केलं तर त्या व्यक्तीला भारतात आयकर भरावा लागतो आणि आयकर रिटर्न फाईल करावी लागते.
ह्यासाठी त्या व्यक्तीच्या जागतिक उत्पन्नाचा आधार घेतला जातो व त्याआधारे डबल टॅक्स आव्होयडन्स अग्रिमेंट च्या अंतगर्त रिटर्न फाईल केली जाते. ज्या लोकांचे वास्तव्य एका आर्थिक वर्षात १८२ दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी भारतात असते, अश्या व्यक्तींकडून केवळ भारतातील उत्पन्नावर आधारित आयकर प्राप्त केला जातो.
भारतात व्यवसाय व निवास करणाऱ्या आणि परकीय नागरिकत्व बाळगणाऱ्या लोकांना निवासी परकीय नागरिक म्हटले जाते, त्या व्यक्तीचे सबंध आर्थिक व्यवहार हे भारतात असतात पण नागरिकत्व हे परदेशाचे असते. परदेशी नागरिकत्व असून देखील त्या व्यक्तीचे वास्तव्य आणि आर्थिक व्यवहार भारतात असल्याने त्या व्यक्तीला भारतात आयकर अदा करावा लागतो.
हेच अक्षय कुमारच्या बाबतीत आहे. जरी त्याचं नागरिकत्व कॅनडाचं अस,लं तरी त्याचे सबंध आर्थिक व्यवहार भारतात असल्यामुळे त्याला भारत सरकारला कर अदा करावा लागतो.
इतकंच नव्हे तर अशा त्या व्यक्तीचं उत्पन्नावर टीडीएस हि लावला जातो…!
जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न हे कर मर्यादेपेक्षा (२.५ लाख) कमी असेल तर त्या व्यक्तीला करातून सुट देखील मिळते आणि त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न देखील फाईल करून टीडीएसची रक्कम देखील परतावा म्हणून मिळवता येते. भारतातील कर आकारणी हि रहिवास आधारित आहे.
जर भारतात रहिवास असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने जगभरात कुठेहि उत्पन्न कमावलं तरी त्य व्यक्तीला भारतात कर भरावा लागेल. जो त्याच्या जागतिक उत्पन्नाच्या आधारावर असेल.
अनिवासी भारतीय लोक अथवा भारतात अनियमितपणे निवास करणाऱ्या नागरिकांना त्यांनी भारतात कमावलेल्या उत्पन्नाच्या आधारावर कर भरावा लागतो. याला RNOR कर म्हटले जाते.
व्यक्तीचा रहिवास तपासणे हे त्यासाठी गरजेचे असते. भारतीय आयकर कायद्याच्या रहिवासी नियमांच्या आधारे, भारतात स्थायिक होणाऱ्या अनिवासी भारतीय नागरिकाला २ वर्षांपर्यंत RNOR कर भरण्याचा लाभ मिळत असतो. त्याव्यक्तीला फक्त भारतातील उत्पन्नाच्या आधारावर कर भरावा लागतो.
हे ही वाचा –
===
अनिवासी भारतीयाना CBDT च्या निर्देशानुस्रार टीडीएस रेट हा सामन्य रहिवाशांपेक्षा जास्त असतो. जर एखाद्या अनिवासी भारतीयाला घर विकायचं असेल तर त्याला २०% कर + सेवाकर + सेज अदा करावा लागतो, जो सामन्य नागरिकासाठी फक्त १% इतका असतो.
भारतात अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्याना अनिवासी भारतीयांना सामान्य नागरिकाप्रमाणे करात सवलत मिळते. तसेच टीडीएसची रक्कम देखील परतावा म्हणून परत मिळवता येते.
डबल टॅक्स आव्होयडन्स अग्रिमेंट (DTAA) च्या आधारावर व्यक्तीला नागरिकत्व असलेल्या व रहिवास असलेल्या देशापैकी एका देशाच्या करातून सुटका मिळते आणि एकाच ठिकणी कर अदा करावा लागतो.
भारतात काम करायला आलेल्या परदेशी नागरिकाला १८२ दिवस भारतातील उत्पन्नाच्या आधारे कर द्यावा लागतो आणि त्यानंतर त्याच्या जागतिक उत्पन्नाच्या आधारे द्यावा लागतो, अनिवासी भारतीय नागरिक जो भारतात्त रहिवास व व्यवसाय करायला येतो त्याला RNOR मुळे हि मुदत २ वर्ष असते.
हे ही वाचा :
===
अश्याप्रकारे भारतात नागरिकतेपेक्षा रहिवासाच्या आधारावर कररचना आणि आकारणी केली जाते. त्यामुळेच अक्षय कुमार व इतर अनेक सेलीब्रिटी जे मुळात भारताचे नागरिक नसले तरी त्यांना भारतात कर अदा करावा लागतो.
अक्षय कुमार भारताचा नागरिक नसला तरी तो नियमित कर भरतो. कारण त्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत भारतात आहेत.
कर भरणे हे त्याचे कर्तव्य आहेच शिवाय त्याचा मुख्य व्यवसाय ज्या देशात आहे त्या देशाचे नियमच असे आहेत की त्याला कर भरावाच लागतो.
तेव्हा त्याचा संबंध राष्ट्रभक्तीशी जोडणे योग्य ठरेल का?
तसेच, अक्षय कुमार जो त्याच्या राष्ट्रभक्तीने भरलेल्या चित्रपटांसाठी आणि समाजकार्यासाठी ओळखला जातो. त्याच्या कागदोपत्री नागरीकत्वावरून त्याच्या राष्ट्रानिष्ठेची तपासणी करणे आवश्यक आहे काय?
या दोन्ही प्रश्नांची उत्तरं वाचकांनी ठरवावीत…!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.