' गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर एका भारतीयाने लावला होता! – InMarathi

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने नाही तर एका भारतीयाने लावला होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गुरुत्वाकर्षणाचा शोध हा जगातील सर्वात महान शोधांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोधामुळे विज्ञान एक वेगळ्या उंचीवर गेलं आणि विज्ञानाचं सुवर्णयुग सुरु झालं असं म्हटलं तर वावग ठरू नये.

शाळेत पाचवीच्या इयत्तेतचं आपल्याला गुरुत्वाकर्षण अर्थात लॉ ऑफ ग्रॅविटी शिकवला जातो.

बरं तर हा शोध कोणी लावला? हा प्रश्न विचारल्यावर सगळे एका सुरात उत्तर देतील की, ‘गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला होता.

कारण हेच आपल्याला शिकवलं गेलं आहे. यापुर्वीच्या सगळ्या कादंब-यातून आपल्याला हेच आपण वाचल आहे.

पण तुम्हाला ही गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल की गुरुत्वाकर्षणा’चा शोध न्यूटनच्या आधी १२०० वर्षांपूर्वी एका भारतीयाने लावला होता.

तो भारतीय होता भारतीय गणिततज्ञ भास्कराचार्य!


law-of-gravity-discovered-by-indian-inmarathi
स्रोत

 

जरा इतिहासात डोकावुयात,

न्युटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला त्यावेळचा प्रसंग आठवा.

झालं असं, की जेव्हा सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या न्यूटनच्या डोक्यावर एक सफरचंद पडले तेव्हा कुतूहलापोटी न्यूटनने संशोधन केलं. हे सफऱचंद कशामुळे पडलं? नेमकी कोणती क्रिया घडली? या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळविण्यासाठी त्याने खटपट केली.

आणि त्यानंतर त्याने गुरुत्वाकर्षणाची संकल्पना मांडली ही गोष्ट संपूर्ण जगाला ठावूक आहे.

हीच कथ पुढे प्रसिद्ध झाली आणि गुरुत्वाकर्षण शोधाचा जनक ही उपाधी न्युटन यांना दिली गेली.

ही कथा खरी असली, तरी न्युटनच्या आधी एका भारतीय व्यक्तीला या माहितीचा उलगडला झाला होता.

विश्वास बसत नाही?

मग ही माहिती तुम्ही वाचायलाच हवी.

भास्कराचार्यांनी मात्र १२ व्या शतकातच गुरुत्वाकर्षणाशी निगडीत गोष्टींचा उलगडा केला होता हे त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधून दिसून येते.

कोण होते भास्कराचार्य?

भास्कराचार्य हे १२ व्या शतकातील अतिशय विद्वान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितीतज्ञ होते.

त्यांनी ११५० या शतकामध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी ‘सिद्धांत शिरोमणी’ नावाचा एक ग्रंथ लिहिला होता.

या ग्रंथामधील काही श्लोकांमध्ये गुरुत्वाकर्षणाशी निगडीत बाबींचा स्पष्ट उल्लेख आढळतो.

आकृष्टिशक्तिश्‍च मही तया यत् खस्थं गुरु स्वभिमुखं स्वशक्त्या ।
आकृष्यते तत् पततीव भाति समे समन्तात् क्व पतत्यंय खे ॥

याचा अर्थ आहे,

पृथ्वी आपल्या आकाशातील पदार्थ स्वशक्तीने आपल्याकडे खेचून घेते त्यामुळे आकाशातील पदार्थ पृथ्वीवर पडतो. परंतु ग्रहमंडलामध्ये सर्वच जण एकमेकांना खेचत असल्याने कोणीही खाली पडत नाही.

 

law-of-gravity-discovered-by-indian-inmarathi

स्रोत

 

यावरून सिद्ध होते की, पृथ्वीमध्ये वरून पडणारा पदार्थ स्वत:कडे खेचण्याची कोणतीतरी अदृश्य शक्ती आहे याबद्दल भास्कराचार्यांना खात्री होती.

सदर उल्लेख हा सिद्धांतशिरोमणी भूवनकोश ६ मध्ये आढळतो.

सन ११६३ मध्ये त्यांनी “करण कुतूहल” नावाचा ग्रंथ लिहिला.

या ग्रंथात लिहिले आहे की, जेव्हा चंद्र सूर्याला झाकतो तेव्हा सूर्यग्रहण होते आणि जेव्हा पृथ्वीची छाया चंद्राला झाकते तेव्हा चंद्रग्रहण होते.

हा पहिला लिखित स्वरूपातील पुरावा हे दर्शविण्यास पुरेसा आहे की त्या काळाच्या भारतीयांना गुरुत्वाकर्षण, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांची नीट माहिती होती.

 

law-of-gravity-discovered-by-indian-inmarathi

स्रोत

 

केवळ हाच नाही तर असे अनके शोध प्राचीन भारतामध्ये लावले गेले होते आणि वेदामध्ये आणि इतर प्राचीन ग्रंथांमध्ये हे सर्व संदर्भ सापडतात.

यांव्यतिरिक्त इतरही अनेक शोधांचे जनत हे भारतीय आहेत, मात्र काहींना त्यांच श्रेय मिळालं तर काहींना त्यांपासून वंचित रहावं लागलं.

कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता, आपलं काम करण्याचा हा गुण भारतीयांकडेच सापडतो.

यांमुळेच आजही असे अनेक भारतीय आहेत, जे अत्यंत उल्लेखनीय काम करतात, देशहितासाठी झगडतात, मात्र तरिही ते प्रसिद्धीपासून लांब राहतात.

अशं असलं, तरी त्यांचं काम निश्चितच कौतुकास्पद आहे.

काहीही असो, मात्र भारतीय संशोधकांबाबत आपण सगळ्यांनीच सार्थ अभिमान व्यक्त केला पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?