भारताची “पहिली महिला कमांडो ट्रेनर”, जिने तब्ब्ल २०,००० सैनिकांना प्रशिक्षण दिलंय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारताची पहिली महिला कमांडो ट्रेनर कोण? असा प्रश्न विचारल्यावर बरेच जण बुचकळ्यात पडतील, कारण भारताच्या पहिल्या महिला कमांडो ट्रेनरबद्दल अगदी फारच कमी लोकांना ठावूक आहे.
ती फार प्रसिद्ध नाही कारण तिला प्रसिद्धीच्या झोतात राहणं आवडतं नाही. पण एक भारतीय म्हणून भारताच्या पहिल्या महिला कमांडो ट्रेनरबद्दल आपल्याला माहित असलंच पाहिजे.
चला तर जाणून घेऊया भारताच्या पहिल्या महिला कमांडो ट्रेनर डॉ. सीमा राव यांच्याबद्दल !
डॉ. सीमा राव यांची ओळख केवळ भारताची पहिली महिला कमांडो ट्रेनर एवढीच नसून त्यांच्या यशाचा आलेख हा त्या पलीकडला आहे. महिला कमांडो ट्रेनर सोबतच त्या एक कॉम्बॅक्ट शुटींग इंस्ट्रक्टर आहेत.
त्या एक फायर फायटर आणि स्कुबा ड्रायव्हर आहेत, रॉक क्लायंबिंगमध्ये त्यांना HIM पदक देखील मिळालं आहे आणि शेवटची पण विशेष गोष्ट म्हणजे त्या मिस इंसिया स्पर्धेच्या फिनलिस्ट देखील आहेत.
डॉ. सीमा राव गेल्या २० वर्षांपासून आर्म्ड फोर्सेसना कमांडो ट्रेनिंग देतायत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या या कामासाठी एक रुपया देखील मानधन घेत नाही, कारण त्यांच्या मते,
कमांडोना प्रशिक्षण देणे ही देखील एक देशसेवा आहे आणि त्यासाठी पैसे घेऊन मला त्याचा अपमान करायचा नाही आहे.
लहानपणापासूनच भारतीय सैन्यामध्ये भरती होण्याची इच्छा त्यांनी मनी बाळगली होती. १६ वर्षाच्या वयातच त्यांचे एका मुलावर प्रेम जडले. दोघांना संपूर्ण आयुष्य पती-पत्नी म्हणून एकत्र जगायचे होते.
परंतु सीमा यांच्या घरच्यांनी या गोष्टीला विरोध केल्याने दोघांनी स्वत:च निर्णय घेऊन आपला रस्ता निवडला आणि लग्न केले.
सीमा यांचे पती मेजर दिपक राव वयाच्या १२ वर्षापासूनच मार्शल आर्ट्स शिकत होते आणि पुढे त्यांनी सीमा यांना देखील मार्शल आर्ट्स शिकवले.
लग्नानंतर सीमा आणि त्यांचे पती दिवसभर मार्शल आर्ट्सचा सराव करायचे, कारण सीमा यांना भारतीय सैन्यामध्ये कमांडो म्हणून रुजू व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांना मार्शल आर्ट्समध्ये पारंगत होणे अनिवार्य होते.
याच दरम्यान त्यांची भारतीय सैन्यामधील काही सैनिकांशी ओळख झाली. हे सैनिक देखील त्याच जागी सराव करण्यास आले होते जेथे सीमा या सराव करत होत्या. मार्शल आर्ट्समधील सीमाचे कौशल्य पाहून सारेच सैनिक आश्चर्यचकित झाले.
त्यांचे कौशल्य पाहून भारतीय सैन्यामधील अधिकाऱ्यांनी तेथे सराव करायला येणाऱ्या सैनिकांना प्रशिक्षण देण्याची परवानगी सीमा यांना दिली. तेव्हापासून आज सुमारे २० वर्षानंतरही सीमा आपले पती दिपक यांच्यासमवेत सैनिकांना प्रशिक्षण देत आहेत.
सीमा यांनी आजवर NSG ब्लॅक कॅट्स, IAF गार्ड्स, इंडियन नेव्ही मार्कोस आणि BSF च्या सैनिकांना स्पेशल ट्रेनिंग दिली आहे.
सीमा ही देशातील पहिली अशी व्यक्ती आहे ज्यांनी अधिकृतरीत्या भारतीय सैन्यात नसताना देखील भारतीय सैन्याच्या सर्व डिफेन्स फोर्सेसच्या कमांडोना प्रशिक्षण दिलेले आहे.
२० वर्षांपासून कमांडो ट्रेनिंग देणाऱ्या सीमा यांचं दैनंदिन जीवन, अर्थातच, साधं-सोपं नाहीये. त्यांना दरोरोज नवनव्या अडचणींचा सामना करावा लागतो. रोज अंगावर नवीन जखमा घेऊन वावरावं लागतं.
परंतु एक स्त्री असून देखील शारीरिक क्षमता कमावत त्यांनी चालवलेलं हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांनी जेवढ्या कमांडोना प्रशिक्षण दिलं आहे त्यापैकी प्रत्येक जण आजही त्यांच्या मेहनतीचा आवर्जून उल्लेख करतो.
एक स्त्री असून देखील पुरुषी वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात स्वत:च्या यशाचा झेंडा रोवणाऱ्या सीमा राव यांचा आदर्श प्रत्येक स्त्री साठी लाखमोलाचा आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.