आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतीय इतिहास आणि भारतीय परंपरा यावरती अनेक व्याख्याने भारतामध्ये आपण ऐकली असतील.
अनेक व्याख्याते त्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ऑक्सफर्ड युनियनमध्ये जे भाषण भारतीय इतिहासावरती केले त्या भाषणांमधून भारतीय इतिहास आणि ब्रिटनचा इतिहास यामधील संबंध शशी थरूर यांनी दाखवून दिला.
थरूर यांनी इंग्लंडमध्ये भाषण करत असताना अत्यंत वास्तववादी इतिहास मांडून इंग्रजांना त्यांच्या भारतातील वागणुकीबद्दल शरम वाटावी अशा गोष्टी सांगितल्या. त्यांचा भाषणातील काही महत्वाचे मुद्दे खाली मांडलेले आहेत.
इंग्रजांनी भारताला अनेक वर्षांसाठी गुलाम ठेवले. या दमन कालामध्ये अनेकांच्या अगदी सामान्य अधिकाऱ्यांवरही ब्रिटिशांनी बंधनं घातली होती. अनेक भारतीयांना राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्य मागण्यासाठी जेरबंदही करण्यात आले होते.
या काळामध्ये प्रत्येक भारतीयाच्या लोकशाही अधिकारांना धोका पोहोचला गेला होता. जालियनवाला बाग हत्याकांड यासारख्या अनेक घटना ब्रिटिशांनी भारतामध्ये जाणीवपूर्वक घडवून आणल्या अशा आशयाचे भाषण निडरपणे शशी थरूर यांनी ऑक्सफर्ड युनियनमध्ये दिले.
या ठिकाणी त्यांचे भाषण ऐकण्यासाठी ब्रिटिश नागरिकांची संख्या लक्षणीय होती.
त्यांच्यामते भारतावरती ब्रिटिशांनी राज्य करण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या देशाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी भारताचा त्यांनी वापर करून घेतला.
इंग्रजांनी भारतातील प्रत्येक राज्यातील खजिनाच लुटला नव्हे तर प्रत्येक राज्यातील किमती साधन संपत्ती ही ब्रिटिशांनी अनिर्बंधपणे वापरली.
भारताला त्यांनी आर्थिक दृष्ट्या नव्हे तर नैसर्गिक दृष्ट्या ही कंगाल करून सोडले होते. औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली भारतातील अनेक पारंपरिक उद्योग धंदे इंग्रजांनी बंद पाडले.
भारतातील कापड उद्योगाचे इंग्रजांनी तीन तेरा वाजवले. भारतातील खादी भारतातच नव्हे तर संपुर्ण विश्वात प्रसिद्ध अशी कला होती. इंग्रजांनी इंग्लंडमध्ये निर्माण केलेल्या कपड्यांची मागणी भारतामध्ये वाढावी यासाठी स्वदेशी कापड निर्मिती वरती इंग्रजांनी अधिक कर लादला.
यामुळे भारतातील कामगार भिकेला लागला. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल संपूर्ण जगामध्ये पडसाद उमटले. कार्ल मार्क्स यांनी १८५३ मध्ये
भारतातील कामगारांवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध एक पत्रक काढले होते. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले की,
“ब्रिटिश उद्योजकांनी षड्यंत्र करून भारतातील स्वदेशी कापड उद्योग बंद पाडला. त्यांच्या या कृत्यामुळे भारतातील लाखो कामगार देशोधडीला लागले. त्यासाठी इतिहास त्यांना कधीच माफ करणार नाही.”
खूप जणांना माहिती नाही ब्रिटिशांनी त्यांच्या कापडाचा खप वाढवण्यासाठी भारतातील स्वदेशी कापड बनावट करणाऱ्या कामगारांना खूप छळ केला. त्यामुळे कामगारांनी हताश होऊन इतर उद्योगांकडे वळण्याचा निर्णय घेतला.
भारताने जागतिक महायुद्ध मध्ये सर्वात जास्त सैनिक पाठवले होते. ज्या ठिकाणी ब्रिटिश शासन होते त्या सर्व ठिकाणाहून ही जास्त सैनिक भारतामधून जागतिक महायुद्धामध्ये इंग्लंडकडून लढण्यासाठी गेले होते. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया, कॅनडा न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका.
असे म्हटले जाते की दुसऱ्या जागतिक महायुद्ध मध्ये ब्रिटिशांकडून सर्वात जास्त संख्येने लढणारे हे भारतीय सैनिक होते. जवळपास आठ लाख भारतीय सैनिकांनी या महायुद्धामध्ये भाग घेतला.
त्यातील ५३ हजार दुर्दैवी सैनिकांना त्यांचा जीव गमवावा लागला. ६४ हजार सैनिकांना गंभीर दुखापत झाली आणि जवळपास चार हजार सैनिक या महायुद्धाच्या रणधुमाळी मध्ये हरवले गेले किंवा बंदी केले गेले.
हा आकडा फक्त दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या आहे पहिल्या जागतिक महायुद्धाच्या आकडा अजूनही माहीती नाही. भारतीय इतिहासामध्ये भारतीय द्वीप खंडातील सैनिक जवळपास प्रत्येक आघाडीवर ती लढलेला आहे.
भारतीय सैनिकाला एवढा पराक्रम करूनही इंग्रजांनी पूर्ण पगार कधीच दिला नाही. आजही करोडो रूपयांचा पगार भारतीय सैनीकांचा थकीत होता.
ब्रिटिशांनी भारतातील प्रत्येक स्वायत्त संस्थेला संपवण्यासाठी काम केलेले आहे. ब्रिटिशांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवरही जोरदार प्रहार केला होता.
ज्यावेळी ब्रिटिश भारतामध्ये आले त्यावेळी भारत जागतिक दृष्ट्या अनेक देशांशी व्यवहार करण्यास मुक्त होता. पण ब्रिटिशांनी फक्त त्यांच्या मित्र राष्ट्रांशी व्यवहार ठेवल्यामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसला.
त्यांनी भारतामधील शेती व्यवस्थेतही लक्ष घालत भारतातील शेतकऱ्यांना तसेच निळ, तंबाखूसारख्या नगदी पीक घेण्यासाठी दबाव आणला कारण जागतिक बाजारांमध्ये या उत्पादनांना प्रचंड मागणी होती.
या नगदी पिकांना नेहमी घेतल्यामुळे भारतातील कसदार जमीन निरुपयोगी होत होती. त्यामुळे, भारतातील मुख्य व्यवसाय शेती असणाऱ्या वर्गावर ती कर्जाचा बोजा वाढत चालला होता.
आज भारतातील ब्रिटिश राज्य संपून साठ वर्ष होत आले आहेत. पुढे बोलताना शशी थरूर यांनी भारतातील इंग्रजांनी उभ्या केलेल्या व्यवस्थे बद्दल बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्या त्यांच्याच शब्दात इथे मांडलेल्या आहेत,
“भारतातील काही व्यक्ती आजही बोलताना बोलून जातात की इंग्रजांनी भारतासाठी रेल्वे आणली, तारसेवा आणली, टेलिफोन सेवा आली पण त्यांना हे माहित नाही की इंग्रजांनी त्यांच्या पूर्वजांवर उपासमारीची वेळ आणली होती, त्यांचं रक्त शोषण करण्याचं काम या इंग्रजांनी केलं होते.
-अनेक देशांनी मदत म्हणून इतर देशांमध्ये रेल्वे तसेच इतरही सुविधा पुरवण्याचे काम केलेले आहे त्यांनी इंग्रजांसारख्या त्या गोष्टीचा बडेजाव मिरवला नाही.”
शशी थरुर यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित समुदायातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
जागतिक महायुद्धादरम्यान एकदा अशी परिस्थिती आली होती की अन्नाचा तुटवडा भासू लागला अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन गव्हर्नर चर्चिल यांनी अन्न हे नागरिकांना न पोचवता ते कसलीही कमी भासत नसलेल्या ब्रिटिश सैन्याकडे पोचवले होते.
यावरून ब्रिटिशांचे क्रौर्य लक्षात येऊ शकते. शशी थरुर यांनी दिलेल्या या भाषणानंतर अनेक पडसाद इंग्लंडमध्ये उमटताना दिसत आहेत.
पण इंग्लंडची ही पोल खोल होणे गरजेचे होते. त्यांनी भारतीयांवरती केलेली अन्याय असेच जगासमोर येत राहोत एवढीच अपेक्षा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.