“सैन्य नसलेल्या” आंतरराष्ट्रीय सीमा: जागतिक शांततेची धूसर आशा?!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
दोन देशांमधील सीमा म्हणजे बॉर्डर्स या त्या देशाचा प्रदेश निर्धारित करीत असतात. त्यामुळे या बॉर्डर्सचं संरक्षण करणं देखील प्रत्येक देशाची जबाबदारी असते. म्हणून या इंटरनॅशनल बॉर्डर्सवर प्रत्येक देश आपआपले सैन्य तैनात करून ठेवतो.
कारण बॉर्डर्सवरची परिस्थिती नेहमी तणावपूर्ण मानली जाते. येथे कधी काय होईल काही सांगता येत नाही. पण अश्या प्रकरणात दोन देशांमधील असलेले संबंध देखील महत्वाची भूमिका बजावतात. आता भारत पाकिस्तानचं उदाहरण घ्या.
आपल्या दोन्ही देशातील संबंध तसे नाजूकच आहेत, त्यामुळे आपली प्रत्येक सीमा संरक्षण खात्याने सुरक्षित करून ठेवली आहे.
अगदी आज ताजं उदाहरण घ्यायचं झालं, तर भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेला सीमावाद लपून राहिलेला नाही. चीनच्या सैन्याने भारतीय प्रदेशात केलेली घुसखोरी त्यासंदर्भात सुरु असणाऱ्या वाटाघाटी हा सध्याचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे.
मग तुम्ही म्हणाल की, सीमांची सुरक्षा करण्यासाठी सीमेवर सैन्य तैनात करावं लागतंच असणार. पण प्रत्येक देशांच्या सीमांवर अशी स्थिती नाही. देशांमध्ये हा सीमावाद उद्भवलेला नाही.
पण जगात असे देश आहेत ज्यांच्या सीमा अगदीच स्वैर आहेत. तिथे ना कोणा देशाचे सैन्य आहे आणि ना ही तेथे कोणता हिंसाचार होतो.
चला तर पाहू जगातील या मुक्त आंतरराष्ट्रीय सीमा !
अलास्का आणि सैबेरिया
स्वीडन आणि फिनलँड
स्वीडन आणि फिनलँड या देशांमधील बराचसा सीमाभाग हा नदीच्या पात्रातून जातो. टॉर्नीओ नदी, तिच्या उपनद्या आणि बोथनियाचे आखात हा भाग मुख्यत्वे करून या दोन देशांमधील सीमा दर्शवतो.
सीमेवरील अवघा काही किलोमीटरचा पट्टा हा भूभागाने व्यापलेला आहे. मात्र शेन्जेन करारानुसार, सीमा ओलांडण्यासाठी कुठलीही परवानगी घेण्याची आवश्यकता नसते.
अर्जेंटिना, पॅराग्वे आणि ब्राझील
या तीन देशांमधील सीमेला ‘ट्रिपल फ्रंटियर’ असं म्हटलं जातं. Iguazú आणि Paraná या नद्यांचा संगम या सीमेवर झालेला आहे. नदीपात्रांवर तिन्ही देशांमध्ये त्यांची शहरं वसलेली आहेत. अशा या निसर्गरम्य ठिकाणी कुठेही सैन्य उभं असलेलं पाहायला मिळणार नाही.
नेदरलँड आणि बेल्जियम
नेदरलँड आणि बेल्जियम या देशांमधील सीमेची लांबी ४५० किमी आहे. Meuse नदी आणि काही भूभाग यांचा या सीमेत समावेश आहे. युरोपातील अनेक देशांप्रमाणे या दोन्ही देशांमध्ये सुद्धा शेन्जेन करार करण्यात आलेला आहे.
या दोन्ही देशांच्या सीमेवर सुद्धा कधीही सैन्य पाहायला मिळत नाही.
नॉर्वे आणि स्वीडन
नॉर्वे आणि स्वीडन या देशांमधील सीमा १६३० किमी लांबीची आहे. या दोन्ही देशांसाठी ही सर्वाधिक लांबीची सीमा ठरते.
या दोन देशांच्या सीमेवरही लष्करी तणाव नाही.
हैती आणि डोमेनिक प्रजासत्ताक
स्पेन आणि पोर्तुगाल
या दोन देशांमधील सीमा सर्वाधिक जुन्या सीमांपैकी एक मानली जाते. १२१४ किमी लांबीची ही सीमा, कुठलेही निर्बंध नसलेली युरोपमधील सर्वाधिक लांबीची सीमा आहे. या लांबलचक सीमेवर दोन्ही पैकी कुठल्याही देशाने सैन्य तैनात केलेलं नाही.
पोलंड आणि युक्रेन
स्पेन आणि मोरक्को
स्पेन आणि मोरोक्को या देशांमधील सीमेची लांबी अवघी १८.५ किमी आहे. या सीमेवर दोन्ही देशांमध्ये कुठल्याही प्रकारचा लष्करी हस्तक्षेप मात्र आढळून येत नाही.
भारत आणि भूतान
६९९ किमी अंतराची ही भारत-भूतान सीमा मोठी मजेशीर आहे. त्याचीच ही एक झलक..
‘एका देशातील मंडळी क्रिकेट खेळात असताना जर दुसऱ्या देशात बॉल गेला, तर तो घेऊन येण्यासाठी विजाची गरज पडेल का?’
अशाप्रकारचे विनोद सुद्धा पाहायला मिळतात. खरोखरच एखाद्या रस्त्याचा दुभाजक असावा किंवा कॉम्प्लेक्सची हद्द असावी अशीच जणू काही ही बॉर्डर दिसते.
स्वीडन आणि डेन्मार्क
सैन्य तैनात नसलं तरी याचा अर्थ हा नाही की तुम्हाला अनधिकृतपणे दुसऱ्या देशात प्रवेश करण्याची मुभा आहे!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.