' अवघ्या १७ व्या वर्षी इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या मराठमोळ्या महिलेची यशोगाथा – InMarathi

अवघ्या १७ व्या वर्षी इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या मराठमोळ्या महिलेची यशोगाथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

म्हणतात ना, ईच्छा असेल तर मार्ग सापडतोच. फक्त प्रयत्न करणे थांबवायला नको. आज पाहूया एका मराठमोळ्या तरुणीच्या जिद्दीची कहाणी.

वयाच्या १२ व्या वर्षी ती लंडन टाईम्सच्या पहिल्या पानावर झळकली. १३ व्या वर्षी तिला भारताच्या राष्ट्रपतींकडून “ युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १६ व्या वर्षी तिला न्यूझीलंड सरकारने’डॉल्फिन क्वीन’ ही उपाधी देऊन सन्मानित केले. ह्या डॉल्फिन क्वीन चे नाव आहे रुपाली रेपाळे, भारताची ओपन स्विमर जिने वयाच्या १२ व्या वर्षी ऑगस्ट १९९४ साली इंग्लिश खाडी पोहून पार केली.

रुपालीने एकूण सात स्ट्रेट्स जिंकून आपल्या यशस्वी कारकिर्दीत अनेकदा रेकॉर्ड तोड कामगिरी केलेली आहे.

तिच्या वडिलांना वाटायचं की रूपालीला एखाद्या व्यायामाची गरज आहे त्यामुळे त्यांनी रूपालीला पोहण्याच्या प्रशिक्षणात तिचे नाव नोंदवले. तेव्हा ती केवळ तीन वर्षांची होती त्यामुळे तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता. सुरुवातीचे काही महिने ती घाबरून लेडीज लॉकर रूम मध्ये लपून बसायची.

 

www.inmarathi.com

नंतर तिला तिची क्लासमधली मित्रमंडळी प्रेरित करू लागली आणि हळूहळू तिची स्विमिंग पूलशी गट्टी जमली. आता स्विमिंग पूल तिला तिच्या शाळे इतकाच आवडायला लागला होता. पोहणं आता तिच्यासाठी नित्याचंच झालं होतं.

आपल्या प्रचंड उर्जेसाठी ओळखली जाणारी ह्या एका चांगल्या स्विमरने वयाच्या सहाव्या वर्षी, स्पर्धात्मक बॅचमध्ये पदवी मिळविली आणि नोव्हेंबर 1993 मध्ये अलीबागपासून मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापर्यंत सर्वात कमी वयात पोहण्याचा विक्रम केला.

तिच्या प्रशिक्षकाला तिला ह्यासाठी पाठवावे की आही ह्याबद्दल शंका होती प्रांती रुपालीच्या वडिलांनी पुढे येऊन संमती दिली आणि अशा प्रकारे रूपालीचा समुद्राच्या अथांग निळाई सोबतचा प्रवास सुरु झाला.

त्यांच्या एका स्नेहींनी तिच्या वडिलांना सांगितले की इंग्लिश चॅनल बद्दल माहिती सांगितली आणि सुचवले की रुपाली पोहण्यात चांगली असेल तर तिने ह्या स्पर्धेत भाग घ्यावा, कारण ते लांब पोहत जाण्यासाठी चांगले होते, त्यानन्तर रुपालीने इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा निर्णय घेतला.

रेपाळे कुटुंबाची पार्श्वभूमी अगदी सामान्य होती आणि त्यांच्यापैकी कोणालाही इंग्रजी चॅनेल किंवा त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या आवश्यक प्रशिक्षण किंवा तत्सम बाबींविषयी  काहीही माहिती नव्हती. परंतु तिचे वडील म्हणाले की प्रयत्न करायला  काय हरकत आहे ?

रुपालीने अर्ज केला परंतु तो चुकीच्या पत्त्यावर गेल्याने जून १९४४ च्या अखेरीस पर्यंत तिला समितीकडून काहीही उत्तर आले नाही. त्यामुळे रेपाळे कुटुंबियांना वाटले की आपल्या मुलीची कदाचित निवडच झालेली नाही. परंतु काही दिवसांनी उत्तर आले की रुपाली ऑगस्ट मध्ये पोहू शकते.

रूपालीच्या वडिलांनी अनावधानाने तिचे वजन ३८ किलो आहे असे कळवले होते परंतु जुलै  महिन्यातले रूपालीचे वजन होते केवळ २८ किलो. इंग्लिश खाडी पार करण्यासाठी पोह्नार्याचे वय १२ वर्षे असणे आणि वजन ३८ किलो असणे ह्या दोन मुख्य अटी होत्या.

 

rupali rewale-inmarathi
www.inmarathi

आता आपले वजन १० किलोंनी वाढवण्यासाठी रुपलीकडे केवळ एकच महिना उरला होता. डॉक्टरांनी रूपालीला अंडी, दूध आणि मांस असला आहार घ्यायला सांगितले आणि आठवड्यातू केवळ एकदा पोहण्याची परवानगी दिली.

इकडे रुपाली आपले वजन वाढवण्यावर लक्ष देत होती आणि तिकडे तिचे कुटुंब आणि स्नेही तियाच्या ह्या मोहिमेसाठी निधी गोळा करण्यात गुंतले होते, इतकेच नव्हे तर तिच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी सुद्धा आपल्या पॉकेट मनी मधून तिला मदत केली.

जुलै १९९४ मध्ये रुपाली लंडनला दखल झाली. तिचे वजन भरले, ३८ किलो आणि पुढे काय झाले ते सर्वश्रुत आहेच. १५ ऑगस्ट १९९४ रोजी इंग्लंड ते फ्रान्स हे ३४ किलोमीटर अंतर तिने १६ तास आणि ७ मिनिटांत पूर्ण केले. त्यावर्षीची सर्वात लहान स्विमर होती.

आणि दुसरी सर्वात लहान स्विमर ठरली जिने इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून पार केली हती. अंतरावर तैराकी केल्यानंतर ती त्यावर्षी सर्वात लहान तरलते बनली आणि दुसर्यांदा सर्वात तरुण इंग्लिश चॅनल यशस्वीपणे पार पाडणारी. रुपाली रेपाळे रातोरात चर्चेचा विषय बनली होती.

लंडन वरून पत्र येण्याच्या प्रवासात तिला विमानाच्या कर्मचार्यांकडून भर आकाशात असताना सन्मानित करण्यात आले.

तिचा भारतीय सरकारतर्फे अनेक पुरस्कार देऊन रूपालीचा गौरव करण्यात आला. ह्या सगळ्या लखलखाटात तिचा आपल्या पित्याशी महत्वपूर्ण संवाद घडला. तिच्या बाबांनी तिला विचारले, “तुला खरंच पोहाण्यातून आनंद मिळतो का ? ह्यात तुला पुढे काही करायचे आहे का? त्यांनी तिला नीट समजावले की, तू हेच पुढे करत राहिलं पाहिजे अशी काही सक्ती नाही. वेगळं मार्ग निवडू शकतेस.

तेव्हा तिला तिचं लहानपण आठवलं तेव्हा, शाळा आणि स्विमिंग पूल हेच तिचं भावविश्व होते.

तिला तिचे मित्र मैत्रिणी आणि स्विमिंग ह्याव्यतिरिक्त कशाचीही माहिती नव्हती त्यामुळे स्विमिंगमध्येच करीयर करायचे असा तिचा निर्णय पक्का झाला. रूपालीला कल्पनाही नव्हती की, ती यशाचं उंचच उंच शिखर गाठेल आणि तिला इतकी प्रसिद्धी मिळेल. रुपाली आणि तिच्या कुटुंबाला तिने नेमके काय साध्य केले आहे ह्याची संपूर्ण कल्पना नासाने त्यांच्या कसल्याही अपेक्षा नव्हत्या.

ते केवळ तिला पुढे जाण्यात मदत करत राहिले. खरंच कधी कधी अज्ञानातच खरा आनंद असतो म्हणतात ते असं.

 

rewale inmarathi
facebook.com

ह्याव्यतिरिक्त रुपालीने आजवर, जिब्राल्टर स्ट्रेट, बास स्ट्रेट, कुक स्ट्रेट, पाल्क स्ट्रेट इत्यादी यशस्वीरित्या पोहून पार केले आहेत. आणि अशा प्रकारचे यश मिळविणारी ती पहिली महिला आहे. तिच्यासाठी प्रत्येक जलतरण एक नवीन आव्हान आणि साहस आहे. एकदा रात्रीच्या वेळी पाल्क स्ट्रेट ओलांडताना ती तिच्या मार्गावरून भरकटली आणि अशा ठिकाणी पोचली जिथे होते एक लाईट हाउस आणि अवतीभवती भरपूर मासे.

रुपाली एल टी टी ई लुप्तप्राय भागात अडकली होती. तिथून अर्ध्या तासाने ती नौदलाच्या च्या जहाजाला सापडली. गेटवे ऑफ इंडियापासून अलीबागपर्यंत पोहण्याच्या दरम्यान तिच्या पोटाला असंख्य विषारी मासे चावले होते.

रुपाली यशस्वीरित्या शार्कने भरलेले बास स्ट्रेटच्या पोहण्याच्या दरम्यान तिने तिच्या अंगठ्याचे नख गमावाले.

कित्येकदा शरीर दुखत असायचे, परंतु घेतलेली मोहीम पूर्ण केल्याशिवाय मन थांबायला तयार नसायचे. सध्या रुपाली स्वतःची स्विमिंग अकादमी चालवते जिथे स्विमिंग चे सर्वांगीण प्रशिक्षणाचे वर्ग चालवले जातात.

अशी आहे रुपालीची कारकीर्द

·         1 99 4: इंग्लिश चॅनेल , इंग्लंड ते फ्रान्स , 16 तास आणि 7 मिनिटे 34 किलोमीटर. 1 99 4 सालची सर्वात तरुण स्विमर.

·         1 99 4: जिब्राल्टर स्ट्रेट , स्पेन ते मोरोक्को , 5 तास व 5 मिनिटे 28 किलोमीटर अंतर.

·         1 99 5: मुंबई ते धरमतर, दोन मार्ग गेटवे ऑफ इंडिया पोहणे, 21तास 72 किलोमीटर आणि 30 मिनिटे.

·         1 99 5: श्रीलंका ते भारत , 11 तास आणि 5 मिनिटे 40 किलोमीटर.

·         1 99 6: बास स्ट्रेट , फिलीप बे ते मेलबॉर्न , 17 तासांत 65 किलोमीटर अंतर.

·         1 99 8: कुक स्ट्रेट , पेग्नो हेड ते वाइपिरो बे ( न्यूझीलंड ), 1 9 तास 44 मिनिटांत 80 किलोमीटर, पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणे पोहण्याचा रेकॉर्ड

·         2000: तीन अँकर बे ते रोबेन बेट ( दक्षिण आफ्रिका ) दोन मार्गांनी. 7 तास 30 किलोमीटर

 

रूपालीला मिळालेले पुरस्कार.

 

google.inmarathi

·         भारताचे तत्कालीन राष्ट्रपतीमाननीय शंकर दयाल शर्मा ह्यांच्या हस्ते,  राष्ट्रीय युवा पुरस्कार .  भोपाळ1995.

·         तत्कालीन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री उमा भारती ह्यांच्या हस्ते, राष्ट्रीय साहस प्रस्काराने सन्मानित. नवी दिल्ली 1999

·         महाराष्ट्राचे  तत्कालीन राज्यपाल डॉ. पीसी अलेक्झांडर ह्यांच्या हस्तेहिमा फाऊंडेशन अवॉर्डने सन्मानित. मुंबई 1995.

·         महाराष्ट्र शासनाकडून सागर कन्या पदवी प्रदान करण्यात आली.

·         न्यूझीलंड सरकारकडून “ डॉल्फिन क्वीन” पदवी बहल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?