अनेक विकारांवर गुणकारी अशा तुळशीच्या बियांचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
फालुदा अहाहा, सर्वांचा आवडता पदार्थ. पण हा फालुदा खाताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीये का ?
फालुदा बनवताना तो माणूस कसल्याशा काळ्या रंगाच्या बिया त्यात घालतो, फालुदा खाताना त्या बिया मध्येच दाताखाली येतात, त्यांची चव किंचित गोडसर असते.
त्यामुळे फालुद्याच्या टेक्श्चरला चार चांद लागतात. पण कसल्या असतात ह्या बिया, त्याने नेमकं होतं तरी काय ?

तर मित्रहो, आज हाच विषय तुमच्या साठी घेऊन आलो आहोत जो थेट तुमच्या आमच्या आरोग्याशी संबंधित आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी तुळस असेलच, ती किती गुणकारी असते हे काही वेगळे सांगायची गरज नाही. तर ह्या बिया आहेत ह्याच बहुगुणी तुळशीच्या.
तुळशिप्रमानेच बहुगुणी. उन्हाळा आला तुळशीच्या बियांचा खाण्यात वापर करणे हे हल्ली ट्रेंड मध्ये आले आहे. परंतु तुम्हाला कदाचित ठाउक नसेल की, ह्या आपल्या तुळशीच्या बियांचा वापर हजारो वर्षांपासून संपूर्ण जगभरात केला जातो आहे.
ह्या बियांना “सब्जा” असेही नाव आहे. हा सब्जा प्रकृतीने थंड असल्याने ह्याचा वापर उन्हाळ्यात करणे अत्यंत लाभदायक असते.
तुळशीच्या बियांचे अनेक फायदे आहेत परंतु सामान्य माणसाला त्याचे नीट ज्ञान नसल्याने तुळशीच्या बियांचा म्हणावा तसा वापर आपल्या आहारात केला जात नाही.
आज असेच काही फायदे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे तुळशीचे बी केवळ तुमच्या त्वचेसाठी किंवा केसांसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी गुणकारी आहे. बघूया काय आहेत हे फायदे.
–
- अनेक व्याधींवर उपयुक्त असणाऱ्या तुळशीचे हे फायदे तुम्हाला बहुतेक माहीत नसतील!
- घरातलं तुळशीचं रोप सारखं मरतंय? काय आहेत यामागची कारणं आणि टिप्स!
–

१) तुळशीच्या बिया अँटिऑक्सिडेंट्स आणि फ्लेव्होनोइड्सने समृद्ध असतात जे फ्री रेडिकलच्या दुष्परिणामांना रोखण्यात प्रभाविपणे मदत करतात.
२) तुळशीच्या बियांचे नियमित सेवन केल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, वाढत्या वयानुसार येणारे डाग आणि कायमस्वरूपी डाग ह्यापासून सुटका होऊ शकते. मुरुमांचा त्रास बराच कमी होतो. चेहरा चमकायला लागतो.
३) तुळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे आपले केस वाढण्यास मदत होते आणि प्रदूषण किंवा रसायनामुळे केसांचे झालेले नुकसान कमी होण्यास मदत होते.
केसांची मुळे मजबूत होऊन, केस गाळणे थांबते, केसांचा रंग काळा होतो. केसांमध्ये चमक येते.
–
- ‘या’ कारणामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला ‘तुळस’ वर्ज्य आहे!
- तुरट चवीच्या आवळ्याचे हे ८ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या…
–

४) तुळशीच्या बियांमध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर आढळतो त्यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत चालण्यास मदत होते ह्याशिवाय तुळशीच्या बिया खाल्लाने पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे जेवणाच्या मध्ये अरबट चरबट खायची इच्छा होत नाही आणि जास्त खाणे टाळते जाते. त्याचा फायदा आपल्याला वजन कमी करण्यासाठी होतो.
५) गोड तुळशीचे बीज वाईट कोल्स्त्रोल चा स्तर कमीकरण्यात महत्वाची भूमिका बजावते. शिवाय अथेरोस्क्लेरोसिस चा धोका कमी करते. धमनी आणि रक्तवाहीन्यां मधील प्लाक कमी करण्यास मदत करते
६) तुळशीच्या बियांचा आपल्या आहारात नियमित वापर केल्याने हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकच्या शक्यता कमी होतात.
७) तुळशीच्या बियांमध्ये पोटॅशियम आढळते ज्यामुळे ते धमन्या आणि रक्तवाहीन्यांमधील ताण कमी होऊन, ह्यामुळे हृदयाची कार्यप्रणाली सुरळीत चालते आणि हृदयरोगाला अटकाव होतो.
८) तुळशीच्या बियांमध्ये विटामिन ए मुबलक प्रमाणात असते जे रेटिनासाठी एक शक्तिशाली अँटिऑक्सीडंट म्हणून काम करते ज्यामुळे मोतीबिंदूंची वाढ थांबवण्यासाठी मदत होते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–

हे होते तुळशीचे बी म्हणजेच सब्जाचे काही फायदे. ह्याव्यतिरिक्त ह्या बियांमध्ये प्रोटीन, विटामिन के,कार्बोहायड्रेट, क्युरेटीव्ह ओमेगा -३ फॅटी ऍसिड आणि अनेक खनिजे अगदी मुबलक प्रमाणात आढळतात.
सब्जाची प्रकृती थंड असल्याने, जर तुम्हाला असिडीटीचा त्रास होत असेल तर तुम्ही भिजलेला सब्जा, दूध आणि गुलकंद ह्यांचे एकत्र सेवन केल्यास पोटातले असिड कमी होते.
शिवाय फायबर मुबलक प्रमाणात असल्याने मूळव्याध आणि ब्लड शुगर प्रमाणात ठेवायलाही सब्जा मोलाची मदत करतो.जळजळ थांबते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, फायदे वगैरे ठीक आहे परंतु आहारात समावेश करायचा म्हणजे नेमके काय करायचे ? फालुदा रोज तर नाही ना खाता यायचा आपल्याला, म्हणजे खायला हरकत नाही हो, पण मग वजनाचा काटा मोडलाच म्हणून समजा.

तर बघूया सब्जाच्या आपल्याला आपल्या रोजच्या खाण्यात कसा समावेश करता येईल. पहिलं तर हे बी कायम भिजवलेल्या फोरम मध्ये वापरले जाते त्यामुळे कोरडे खाऊ नका.
भिजल्यावर हे बी फुलते म्हणजे एक चाम्जा घेतले असेल तर त्याच्या दीडपट हा सब्जा फुलतो, हा फुललेला सब्जा तुम्ही लिंबाच्या सरबतात किंवा इतर चवींच्या सरबतात थोडं थोडं घालून पिऊ शकता किंवा ज्युसमध्ये सुद्धा घालू शकता.
ह्या बिया तुम्हाला कुठल्याही वाणसामानाच्या दुकानात सहज उपलब्ध आहेत.
तर मग या सब्जाला आपल्या आहारात जरूर समाविष्ट करा आपल्या जवळच्यांनाही ह्याचे लाभ सांगा. हेल्दी रहा आणि जीवनाचा भरपूर आनंद घ्या.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.