Site icon InMarathi

गरिबीने त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं मात्र आज अनेकांचा तो गुरु बनला आहे

team-InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतामध्ये व्यसनाधीन तरुणांचे प्रमाण पहिल्यापेक्षा अनेक पटीने वाढताना दिसते आहे. व्यसनाच्या आहारी गेलेली तरुण पिढी परत त्यांच्या आयुष्यामध्ये उभारी घेऊ शकते का? असा प्रश्न प्रत्येक भारतीय मनाला पडलेला आहे.

खरंतर जो युवक व्यसनाच्या तीव्र आहारी गेलेला असतो तो परत आयुष्यात उभारी घेणे तशी अशक्यच गोष्ट मानली गेली पाहिजे, पण जर योग्य व्यक्तीची साथ आणि कुटुंबाची सोबत असेल तर व्यसनातूनही बाहेर पडता येऊ शकते.

ही कथा अशाच युवकाबद्दल आहे जो पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला होता पण त्याला त्याच्या आयुष्यातली चूक उमगली आणि आज समाजसेवेकडे वळला आहे.

जाणून घेऊयात या युवकाबद्दल…..

या तरुणाला भेटण्यासाठी द बेटर इंडिया ची टीम नोएडातील गर्दीतील रस्त्यांतून वाट शोधत सेक्टर ४४ जवळ आली. तिथे काही वेळ शोधल्यानंतर त्यांना “मास्टर जी की हवेली” अशी एक वर्ग शाळा दिसली.

 

 

या वर्गामध्ये बसलेले विद्यार्थी अत्यंत उत्साही होते. हा वर्ग त्या सामाजिक संस्थेचा भाग म्हणून चालवला जातो ज्या सामाजिक संस्थेचे नाव आहे “व्हॉइस ऑफ स्लम्स” म्हणजेच झोपडपट्टीतील आवाज, ही संस्था चालवतात देव प्रताप सिंह आणि चांदणी खान.

 

 

दहा वर्षांपूर्वी देव मध्य प्रदेशातील एक व्यसनाधीन तरुण म्हणून प्रसिद्ध होता आणि चांदणी याच काळामध्ये दिल्लीच्या रस्त्यावर ती डान्स आणि इतर कर्तब दाखवून तिचे पोट भरत असे.

आज ही दोघही शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम उभं करताना दिसत आहेत. ही कथा आहे त्यांच्या प्रेरक प्रवासाची आणि त्यांनी कशा प्रकारे गरीब मुलांची मदत करण्यास सुरुवात केली त्याची.

देव प्रताप सिंग यांनी वयाच्या अकराव्या वर्षी त्यांचं गावातील घर आणि त्यांचे वडील यांना सोडून पळ काढला. त्याबद्दल बोलताना ते म्हणतात की,

“माझ्या आजूबाजूच्या मुलांना तीनच पर्याय उपलब्ध असत त्यातील एक म्हणजे ती मुलं वाळू किंवा दगडाच्या फॅक्टरी वरती काम करतील ती मुलं विविध प्रकारच्या वस्तू ट्रॅफिक सिग्नलवर ती विकून पैसे कमावतील किंवा ती मुलं चोऱ्या करतील.

मी तिसरा पर्याय निवडला. मी पहिल्यांदा कोणाचंतरी पाकीट मारलं आणि त्या पाकिटामध्ये १३० रुपये होते. जे माझ्या ट्रेन तिकिटासाठी भरपूर होते. मी ग्वाल्हेरला निघून आलो. एवढ्या मोठ्या शहरामध्ये ती माझी पहिलीच भेट होती. मी खूप मजा केली तेव्हा. मी कोल्ड्रिंकही घेतलं होतं.”

या प्रवासादरम्यान त्यांना ट्रेनमध्ये काही तरुण मुलांचा गट दिसला. जो प्लास्टिक बॉटल उचलत होता. देव यांनी त्यापैकी एका गटाशी हातमिळवणी केली आणि ते ग्वाँल्हेर स्टेशन वरती पाण्याच्या बाटल्या विकू लागले.

 

 

पण तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जास्त पैशांची गरज पडू शकते आणि आपण अजूनही पैसे कमावले पाहिजेत. मला काही कळायच्या आतच मी त्यांना लोखंड आणि इतर धातू चोरून विकण्यास मदत करू लागलो.

त्यांच्यासोबत राहून मला काही काळामध्येच व्हाइटनरच्या सहाय्याने नशा करण्याचे व्यसन लागले.

अशीच काही वर्षे गेली आणि काही दिवसांनी त्याच्यावरती चोरीचा आळ घेऊन पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले. या तुरुंगामध्ये त्यांनी अनेक कष्ट भोगले.

खराब अन्न, दूषित वातावरण आणि त्यांना तिथे एक मित्रही भेटला जो या सर्वांपासून दूर असत त्याचे नाव राजा परमार, पुढे याच चांगल्या व्यक्तीने त्यांचा जामीनही केला.

ही संधी मिळाल्याबद्दल देव ने राजाचे आभार मानले. त्याला वचन दिले की तो त्याचे आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करेल. त्याने एका छोट्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम स्वीकारले.

चांगले काम केल्यामुळे देवला लवकरच गोवा येथील एका हॉटेलचा मॅनेजर म्हणून काम मिळाले.

मग देवने आयुष्य स्थिर करण्यासंबंधी विचार चालू केला. त्याची इच्छा होते की त्याचे आग्र्यात स्वतःचे असे घर असावे आणि जेव्हा देवचे हे स्वप्न पूर्णत्वास येणार होते तेव्हाच त्याच्या आईचा दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला.

 

 

या धक्क्यातून सावरत असताना देवच्या असं लक्षात आलं की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. आपण समाजासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे. आणि याच काळात त्याची आणि चांदणीची भेट झाली.

चांदनी सहा वर्षाची होती जेव्हा तिने रस्त्यावरती नृत्य आणि करामती करण्यास सुरुवात केली. जेव्हा तिचे वडील वारले तेव्हा तिच्या आईने तिला कचरा गोळा करण्यासाठी सोबत जोडले.

याच काळात चांदनीला चुकीच्या आरोपांबद्दल अटकही झाली होती. द बेटर इंडिया शी बोलताना चांदणी म्हणाली की,

“झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणारे अनेक मुलं आणि त्यांची पालक कचरा गोळा करण्याचे काम करतात आणि जर मी कदम यांच्या एनजीओ ( लहान मुलांच्या हक्कासाठी काम करते )च्या संपर्कात आले नसते तर मीही तेच करत असते.”

जेव्हा चांदनी दहा वर्षाची झाली तेव्हा ती शाळेतही जाऊ लागली होती. काही वर्षांनी त्या संस्थेच्या साह्याने चांदणी ‘बालकनामा’ या वृत्तसंस्थेसाठीही काम करू लागली होती.

चांदनी आणि देव यांची भेट एका कार्यक्रमामध्ये झाली होती. यावेळी त्यांना साधी कल्पनाही नव्हती की पुढे जाऊन आपण एकत्र एखादं मोठं काम उभं करू शकतो.

“व्हॉइस ऑफ सलम्स” या कामाची सुरुवात नोएडा मध्ये २०१५ रोजी करण्यात आली. तुम्ही असा विचार करत असाल, एक मुलगा ज्याचे शिक्षणजेमतेम पाचवीपर्यंत झाले आहे आणि एक मुलगी जीच शिक्षणच वयाच्या दहाव्या वर्षी चालू झाले, असे दोघे मिळून मुलांना कसे शिकवू शकतात? पण त्यांचे ध्येय मात्र मोठं होतं.

 

voice of slums.in

 

या संस्थेच्या सुरुवाती बद्दल सांगताना देव अस सांगतो की,

“सुरुवातीला मी मुलांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी सांगत असे. माझा प्रवास मुलांना सांगत असे, की मी एक व्यसनाधीन मुलगा होतो आणि आज मी एका हॉटेलचा मॅनेजर म्हणून काम बघतो. मला महिन्याचे ४५ हजार रुपये मिळतात. हे शक्य आहे फक्त अभ्यासच नव्हे तर तुमच्या स्वयंप्रेरणेने मधून तुम्ही या गोष्टी नक्कीच करू शकता.

आज आमची टीम तीसच्या वर गेलेली आहे आणि सोशल मीडिया वरही चांगलेच ऍक्टिव्ह आहोत. त्यामुळेच आम्हाला पूर्ण देशभरातून पाठिंबा मिळत आहे.”

चांदनी या प्रवासा बद्दल सांगताना म्हणते की,

“या संस्थेने झोपडपट्टीतील अनेक मुलांचे आयुष्य बदलल आहे. आम्ही या संस्थेमार्फत अनेक मुलींची या दुष्टचक्र मधून सोडवणूक केली आहे. आम्ही आमच्या मार्फत सरकारी संस्थांनाही मदत करतो.

 

voiceofslum.org

 

जेव्हा आम्ही त्या मुलांना या संस्थेमध्ये दाखल करतो तेव्हा त्यांना आमच्या मार्फत मोफत शिक्षण आणि इतर सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतो. या संस्थेमुळे या भागातील मुलं शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत झाली आहे.

जर विद्यार्थी शिक्षणात कच्चा असेल किंवा त्याच्या शाळेची वेळ वेगळी असेल तर त्याच्यासाठी जास्तीचा अभ्यासाचा वर्ग घेतला जातो, जेणेकरून त्याच्या शैक्षणिक विकासामध्ये कुठलीही बाधा येणार नाही.”

या संस्थेबद्दल जाणून घेतल्यानंतर आम्हालाही असं वाटू लागलं की अशा संस्थांची भारतामध्ये खरच खूप गरज आहे आणि त्यांचे काम अशाच पद्धतीने दिवसेंदिवस वाढत राहो एवढीच अपेक्षा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version