आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजपर्यंत आपण सर्वांनी अनेक सिरीयल किलरबद्दल ऐकलं असेल, पण आज आपण अशा एका सिरीयल किलरबद्दल जाणून घेणार आहोत जी पंधराव्या शतकातील सर्वात घातक सिरीयल किलर म्हणून प्रसिद्ध आहे.
ती म्हणजे एलिझाबेथ, पंधराव्या शतकातील एक स्त्री जिला संपूर्ण शहर घाबरत असे काय कारण होते?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेखामध्ये तुम्हाला सापडतील…..
एलिझाबेथ जगातील सर्वात भयानक स्त्री सिरीयल किलर म्हणून ओळखली जाते. एलिझाबेथ बद्दल असं म्हटलं जातं की ती “स्टोकर ड्रॅक्युला” जो एक दानव म्हणून प्रसिद्ध होता, त्याच्याकडून प्रेरणा घेत असे.
असं म्हटलं जातं की एलिझाबेथने ६५० मुलींच्या रक्ताने आंघोळ केलेली होती. ज्या तिच्याकडे काम करत असत.
तिच्या गावातील सर्व नागरिक तिला खूपच घाबरत असत, शहरातील पालक त्यांच्या मुलींना एलिझाबेथ समोर येऊ देत नसत कारण त्यांना भीती होती की एलिझाबेथ त्यांच्या मुलींना त्यांच्यापासून दूर करेल.
तिच्याबद्दल शहरांमध्ये भयभीत करणाऱ्या अफवा पसरवल्या जात असत. या अफवांमुळे तिला अनेक नावे पडली होती. तिला “रक्त पिणारी” असेही म्हणत असत.
पश्चिमात्य इतिहासामध्ये तिला एलिझाबेथ म्हणून जरी ओळखले जात असेल तरी तिचं खरं नाव एलिझाबेथ बोथरी असे होते.
तिचा जन्म पंधराशे साठ रोजी हंगेरीतील एका कुटुंबामध्ये झाला होता. तिच्या वडिलांचे नाव बॅरोन जॉर्ज बोथरी होते.
असं म्हणतात की, एलिझाबेथ लहानपणापासूनच रागीट स्वभावाची होती तिला लहानपणापासूनच कधी राग सहन होत नसे. ती कधीकधी स्वतःवरील मानसिक ताबा गमावत असे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
बाल अवस्थेतच तिने तिच्या कुटुंबातर्फे देण्यात आलेल्या शिक्षा अत्यंत निर्दयीपणे अंमलबजावणी करताना बघितलं होतं.
एलिझाबेथचा साखरपुडा लहानपणीच झालेला होता. ती वयाच्या 12 व्या वर्षापासूनच तिच्या सासरी राहायला गेलेली होती. वयाच्या पंधराव्या वर्षी तिचं लग्न करण्यात आलं, ज्यावेळी तिचं लग्न झालं त्यावेळी तिचा नवरा 20 वर्षांचा होता.
तिचा नवरा एक सैन्यातील सैनिक होता. त्यावेळी हंगेरी ऑटोमन फोर्सेस सोबत युद्ध करण्यात मश्गुल होते. त्याकाळी ऑटोमन सैन्य पूर्ण युरोपला भयभीत करून सोडत असे.
लग्नानंतर ती तेथील एक प्रतिष्ठित स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांच्या जोडीला “हँर्ष मास्टर” असे म्हटले जाऊ लागले. तिच्या नवऱ्याने तिला भरपूर अधिकार देऊन ठेवले होते. तिच्या नवऱ्याने गुलामांना शिक्षा देण्याच्या अनेक पद्धती तिला शिकवल्या होत्या.
पुढील दहा वर्षाच्या कालावधी मध्ये तिला ४ अपत्य झाली. ज्यात तीन मुली आणि एक मुलगा होता.
जेव्हा ती एखाद्या गुलामाला शिक्षा द्यायची त्या वेळी नवरा तिला प्रोत्साहन देत असे.
त्यानंतर काही काळाने तिचा नवरा तिला तेथील सर्व अधिकार प्रदान करून युद्धावर निघून गेला. तिथे तिच्या अधिकाराखाली एक किल्ला होता. युद्धाच्या काळात तिनं काही वर्ष समाजसेवाही चालू केली होती.
ती युद्धकैद्यांच्या पत्नींना भेटून युद्ध कैद्यांसाठी काही होत आहे का याचा मागोवा घेत असे.
ती तेथील स्त्रियांना त्यांच्या हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी लढण्यास शिकवत असे. त्यांच्या अधिकारांसाठी लढण्यात एलिझाबेथ पुढे असे, पण सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला तिचा नवरा युद्धावरून परत आला.
–
- भारतातले ७ खतरनाक सिरीयल कि*र्स.! भीतीने बोबडी वळेल…
- गुन्हेगारांनाच ‘यमसदनी’ पाठवणाऱ्या या क्रूर खुन्याची कथा अंगावर काटा आणते
–
त्याचे दोन्ही पाय निकामी झालेले होते. त्याला एका असाध्य रोगाने पछाडलं होतं. म्हणून काही काळामध्येच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू होईपर्यंत सर्व काही ठीक होतं.
पण त्याच्या मृत्यूनंतर मात्र एलिझाबेथ स्वतःवरील ताबा ढळला आणि असं म्हटलं जातं की त्यानंतरच तिच्यातील खरी राक्षसी शक्ती बाहेर आली.
तिने त्यानंतर इतरांना त्रास द्यायला सुरुवात केली. तिच्या काही दास्या तिला गुलामांना अशा प्रकारे त्रास देण्यात मदत करत असत.
असं म्हटलं जातं, की एकदा तिची दासी तिचे केस नीट करून देत होती; त्यावेळी चुकून तिच्या दासीने तिचे केस जास्त जोरात ओढले. या गोष्टीचा एलिझाबेथला खूप त्रास झाला आणि तिने त्या मुलीला खूप जोरात मारलं.
तिने त्या मुलीला एवढ्या जोरात मारलं की तिच्या मुखातून रक्त निघू लागलं. ते रक्त तिच्या हातावर राहिलं आणि रात्री तिला असं जाणवलं की ज्या भागावर त्या मुलीचं रक्त राहिलं होतं तो भाग जास्त उजळ झालेला आहे.
यामुळे एलिझाबेथला एक कल्पना सुचली की तरुण मुलींच्या रक्तामुळे ती अजून तरुण राहू शकते. येथूनच तिच्यातील वेडसरपणाची झलक प्रत्येकाला दिसू लागली.
ती अनेक तरुण मुलींच्या रक्ताने स्नान करायला लागली. त्यानंतर मात्र त्या गावातून सुंदर आणि तरुण मुली गायब होण्याचे जणू सत्रच चालू झालं.
काही मुलं तिच्याकडे काम करण्यासाठी म्हणून येत असत. पण ज्या मुली तिच्या वाड्यावर काम करण्यासाठी गेल्या त्या परत कधी वाड्याच्या बाहेर आल्याच नाहीत असं म्हटलं जातं.
जेव्हा त्या मुली किल्ल्यावरती येत असत त्यावेळी त्यांना एका खोलीमध्ये बंद करून त्रास दिला जात असे. एलिझाबेथ स्वतः त्यांना त्रास देत असे.
ती त्यांना मरेपर्यंत मारत राही, बऱ्याच वेळेस ती त्या मुलीचं तोंड दोऱ्याने शिवत असे. मग तिचे मांस खात असे.
–
- सौंदर्याची भुरळ घालून नाझी सैनिकांच्या शिताफीने कत्तली करणाऱ्या डच क्रांतिकारक महिलेची कथा नक्की वाचा!
- आपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर! ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं
–
जेव्हा ती आजारी असेल तेव्हा ती तिच्या नोकरांना सांगत असे की कुठल्या मुलीला मारायचं आहे. अशा प्रकारे ती त्या तरुण मुलींना मारत असे. मात्र काही दिवसांनी तिला तरुण मुलींचा तुटवडा जाणवू लागला.
कारण, एक तर गावातील काही मुलींना तिने आधीच मारून टाकलं होतं आणि ज्या राहिल्या होत्या त्यांना त्यांचे पालक कधीही तिच्यासमोर येऊ देत नसत, लपवून ठेवत असत.
अशा वेळेस एलिझाबेथने काही शाही खानदानातील मुलींना पळवून आणण्यास सुरुवात केली. त्यांना मारण्यास सुरुवात केली १६०९ मध्ये तिने असेच एका शाही खानदानातील मुलीला मारून टाकलं. त्यानंतर मात्र त्या भागातील सरकारने या सगळ्या प्रकारावरती लक्ष देण्याचं ठरवलं.
एका रात्री तेथील सर्व अधिकाऱ्यांनी तिच्या किल्ल्यावरती झडती घेतली. मग तिथे या किल्ल्यावर ती त्या अधिकार्यांना अनेक युवतींचे मृतदेह सापडले.
शेवटी तिचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तिच्या काही नोकरांना तेथील सरकारने तुरुंगात डांबलं आणि तिला नजर कैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढे तिच्या नोकरांना मृत्युदंडाची शिक्षा झाली पण एलिझाबेथला मात्र आयुष्यभर नजर कैदेतच ठेवण्याचा निर्णय झाला.
ती त्यानंतर तीन साडेतीन वर्षांनी मृत्यू पावली. पण मृत्यू नंतरही अनेक वर्षे तिच्याबद्दल जनमानसामध्ये भीतीचं वातावरण होतं.
आज ती इतिहासातील सर्वात क्रूर महिला सिरीयल किलर म्हणून ओळखली जाते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.