आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
फुटबॉल विश्वचषक चोरीला गेल्याच्या अनेक बातम्या १९६६ मध्ये बाहेर आल्या होत्या. १९६६ फुटबॉल मध्ये वर्ल्ड कप होण्याच्या काही दिवस आधी या विश्वचषकाची महत्त्वाची मानली जाणारी ट्रॅफि चोरीला गेल्याची घटना १९६६ मध्ये घडली होती.
यावर प्रतिक्रिया देताना काही जण असं म्हणत होते की, ही एक अफवा आहे तर काही जण म्हणत होते की हे सत्य आहे.
आणि यामुळे जनमानसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गोंधळ उडालेला होता. १९६६ च्या फुटबॉल विश्वचषकाच यजमानपद खुद्द इंग्लंडने भूषविले होते.
इंग्लंडच्या गलथान कारभारामुळे विश्वचषकाची ट्रॉफी चोरीला गेली असा संदेश जगभर पसरू नये म्हणून इंग्लंड कडुन ही बातमी दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला होता.
काय आहे यामागील सत्य, जाणून घेऊयात..
१९६६ च्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद योगायोगाने इंग्लंडकडे आले. विश्वचषकाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये होती. संपूर्ण देशामध्ये विश्वचषका बद्दल उत्सुकता निर्माण करण्यात इंग्लंडला यश आले होते.
विश्वचषक सुरू होण्याच्या काही दिवस आधी बातमी येते की विश्वचषकाची ट्रॉफी चोरीला गेली. या बातमीने संपूर्ण क्रीडाविश्व बुचकळ्यात पडले.
इंग्लंडने सुरुवातीला अशा प्रकारची कुठलीही घटना घडली नाही असेच सांगितले. पण, त्यांनीही याबद्दल चौकशी केली असता त्यांनाही या बातमीमध्ये तथ्य आढळले.
लंडनमध्ये वास्तव्य करणारा एक कुख्यात गँगस्टर आणि त्याच्या भावाने मिळून अशा प्रकारच्या चोरीला सत्यात उतरवले होते.
ज्यावेळी ही ट्राँफी चोरीला गेली तेव्हा विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक होते आणि यामुळेच इंग्लंड नाक कापले जाण्याची भीती तेथील फुटबॉल प्रेमींना वाटू लागली.
ज्याने हा विश्वचषक चोरला त्याचे नाव सिडणे कुगलर असे होते. तर त्याच्या भावाचे नाव रेग होते. या दोघांनी मिळून ही ट्रॉफी वेस्टमिन्स्टर च्या लिस्ट सेंट्रल हॉलच्या सार्वजनिक प्रदर्शनालयामधून चोरली होती अशी कबुली त्याच्या मुलाने दिली आहे.
या दोन चोरांना स्कॉटलांड यार्ड या पोलिसांच्या संस्थे च्या ताब्यात देण्यात आले. स्कॉटलांड यार्डने इतिहासात कधीही एवढी चौकशी केली नव्हती तेवढी चौकशी त्यांनी या प्रकरणाची केली.
चौकशीच्या काही दिवसांनी हा सुवर्णचषक एका कुत्र्याकडे सापडला. या कुत्र्याचे नाव पिकल्स असे होते. हा कुत्रा त्याच्या पालकासोबत साऊथ लंडन येथे वास्तव्य करत असे.
हा सुवर्णचषक एका कुत्र्याकडे कसा पडला ही मात्र एक गुढ कथा बनून राहिली आहे.
सिडणे यांचा पुतण्या द मिरर शी बोलताना म्हणाला की,
“माझ्या काकांनी तो सुवर्णचषक रोमांच म्हणून चोरला होता. त्यामागे कुठलंही आर्थिक कारण नव्हतं.”
सिडणे यांचा भाऊही त्यादिवशीच्या प्रदर्शनामध्ये उपस्थित होता. पण, त्यालाही या चोरीबद्दल कसलीही माहिती नव्हती.
याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “जेव्हा आम्ही प्रदर्शन बघून बाहेर आलो आणि रस्त्यावरती चालत होतो तेव्हा त्याने त्याचे जॅकेट उचलले आणि मला म्हणाला,
“अरे हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी, आणि मी बघतो तर काय, तेथे तो सुवर्णचषक होता! माझ्या भावाला या गोष्टीची कल्पना होती की आम्ही त्या सुवर्ण चषकाचे कुठेही ही विक्री करू शकत नाही. आम्हाला तो विश्वचषक परत देणे भाग होते.”
२० मार्च १९६६ रोजी सुवर्णचषक चोरीला गेला होता आणि त्याच्या बरोबर तीन दिवसानंतरच चेल्सी फुटबॉल क्लब मध्ये एक पॅकेज डिलिव्हर करण्यात आलं.
त्याच्या वरती १५००० युरोची मागणी करणारे पत्र लावण्यात आले होते. या घटनेमुळे या फुटबॉल क्लब सोबतच पोलिसांनाही प्रचंड धक्का बसला.
डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर लिओनार्ड बगी यांना लंडन पोलिसांनी पाचारण केले, की त्यांनी या सुवर्ण चषकाच्या विषयामध्ये मध्यस्ती करुन तो सुवर्णचषक परत इंग्लंड सरकारकडे सुपूर्त करावा.
त्यांनी एडवर्ड बेचली (ज्याने पैशांची मागणी केली होती) याच्याशी संपर्क केला. बगी त्याला भेटण्यासाठी काही खोट्या नोटांची बंडलं सोबत घेऊन गेला होता. ज्यावेळी यांनी एडवर्ड ला ती पैशांनी भरलेली सुटकेस दिली त्यावेळी त्याने तिथून धूम ठोकली.
त्यां दोघांची भेट लंडनमधील बॅटरसी पार्क येथे झाली होती. तेथून पळून आल्यावर काही क्षणांमध्ये त्याच्या लक्षात आलं की आपला पोलीस पाठलाग करत आहेत आणि काही वेळातच तो पकडला गेला.
त्याने अशा प्रकारची कुठलीही चोरी न केल्याचे सांगितले त्याने. त्याने खोट्या माहितीच्या आधारे पोलिसांना फसविण्याचा प्रयत्न केला होता.
पण, या सगळ्या गडबडीमध्ये खरा चोर स्कॉटलंड यार्डला कधी सापडूच शकला नाही. द मिरर चा असा समज आहे की सिडने याला पोलिस कधीच पकडू शकले नाहीत.
त्याचा २००५ मध्ये मृत्यूही झाला आणि त्याचा भाऊ रेग २०१२ मध्ये मृत्यू पावला.
या सर्वांमध्ये तो सुवर्णचषक कुत्र्याजवळ कसा सापडला याचा तिढा मात्र अजूनही सुटू शकलेला नाही. येत्या काही दिवसांमध्ये हे गुढ उलगडले जावो एवढीच अपेक्षा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.