Site icon InMarathi

मायकल जॅक्सनचे डान्स पाहून-पाहून शिकणारा मुलगा, best कोरिओग्राफर कसा बनला?

Remo Desuza Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्यापैकी प्रत्येकाला महाभारतातील एकलव्याची कथा नक्कीच ठाऊक असेल.एकलव्याने त्याच्या गुरूंची मूर्ती समोर ठेवून नेमबाजी चा अभ्यास केला आणि त्यानंतर तो एवढा पारंगत झाला की त्याच्या यशाने त्याचे गुरु ही थक्क राहिले.

आज या लेखामध्ये आपण अशाच एका एकलव्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने भारतीय नृत्य क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम केले आहे.

युट्युब वरती मायकल जॅक्सनचे व्हिडिओ बघून त्याने ही कला अवगत केली आहे आणि आज तो या क्षेत्रातील एक नामवंत व्यक्ती म्हणून गणला जातो.

रेमो डिसूजा आज बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कोरीयोग्राफर आणी दिगदर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शनाचे कार्य केलेले आहे.

 

 

एका नृत्यावर आधारित रियलिटी शो च्या उद्घाटन प्रसंगी त्याने आपल्या संघर्षाची कैफियत मांडली आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलीतरी इच्छा असते, ज्याच्या विरुद्ध तुमचा परिवार उभा असतो आणि हे तुमच्या वरती अवलंबून असतं की तुम्ही तुमच्या मनाचे ऐकता  की परिवाराचे. असंच काहीसं रेमोच्या बाबतीतही घडलेलं आपल्याला दिसून येईल.

सुरुवातीला त्याच्या नृत्याला त्याच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीचा विरोध होता. त्याच्या परिवाराला त्याने पायलेट बनावे अशी इच्छा होेती पण कालांतराने त्याच्या आईने त्याला त्याची स्वप्न पूर्ण करण्याची मुभा दिली.

 

 

रेमोच्या प्रवासात अनेक पराभव आले पण त्याने पराभवाने खचून न जाता अधिक जोमाने प्रयत्न करण्यास सुरुवात केली. रेमोला त्याच्या आयुष्यातील पहिलं काम कोरीयोग्राफर अहमद खान यांनी दिले होते.

ज्या वेळी रेमो त्यांच्याकडे ऑडिशनसाठी गेला त्यावेळेस त्याने त्यांना असे सांगितले की तुम्ही मला माझ्या दिसण्यावरून नव्हे तर माझ्यातील कलेमुळे मला संधी द्यावी.

 

 

त्यानंतर त्याची ऑडिशन झाली. त्याने ऑडिशनमध्ये प्रत्येकाची मने जिंकली. तेव्हा कुठल्याही सावळ्या रंगाच्या नर्तकाला मुख्य अभिनेत्याच्या मागे उभारून नृत्य करण्याची परवानगी दिली जात नव्हती पण रेमोला त्याच्या कलेमुळे खुद्द सलमान खान यांच्या मागे उभा राहून नृत्य करण्याची संधी मिळाली.

 

 

रेमोने मिळालेल्या संधीचे सोने केले. एक साधारण डान्सर म्हणून काम करण्यास त्याने सुरुवात केली होती, पण नंतर त्याने स्वतः कोरियोग्राफी करण्यासही सुरुवात केली. त्याच्या कामामुळे तो बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध कोरिओग्राफर म्हणून ओळखला जाऊ लागला.

त्याने 2011 मध्ये F. A. L. T. U. चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून प्रवासाला सुरुवात केली.

 

 

त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्याने एका पेक्षा एक दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. त्याने एबीसीडी, द फ्लाइंग जाट, रेस थ्री अशा सुप्रसिद्ध चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन केलेले आहे.

 

 

रेमो त्यांच्या यशस्वीतेचे सर्व श्रेय त्यांच्या आईला देतात. रेमो बद्दल बोलताना त्यांच्या आई म्हणाले की ,

 

 

“रेमो लहानपणापासूनच खूप शांत मुलगा होता. तो लहान असताना कधी शाळेत जाण्यासाठी उत्साही नसायचा. मी त्याला नेहमी शाळेत जाण्याबद्दल समजावून सांगत असायचे.

शाळेबद्दल तक्रार सोडली तर इतर बाबतीत कुठलीही तक्रार नसायची.” रेमोला लहानपणापासूनच नृत्याची प्रचंड आवड होती.

लहानपणी जेव्हा एखादा चित्रपट बघायचा त्यावेळी तो त्या चित्रपटातील गाण्यामध्ये दाखविल्या सारखा नृत्य करण्याचा प्रयत्न करत असे. पुढे जसा मोठा झाला तसा त्याने नृत्य शिकण्यासाठी इतर अनेक गोष्टींची मदत घेण्यास सुरुवात केली.

कॉलेजला असताना तो यु ट्यूब वरती मायकल जॅक्सन याचे व्हिडिओ बघत असे .

 

 

आणि मायकल जॅक्सन सारखा नृत्य करण्याचा प्रयत्न करत असे. त्याला या प्रयत्नांमध्ये अनेक वेळेस अपयश येत असे पण तो न थकता प्रयत्न करत राहत असे.

 

 

त्याच्या अपयशाबद्दल विचारले असता तो म्हणाला की,

“माझ्या आयुष्यात जेव्हा अपयश येते त्यावेळी मी माझ्या संघर्षांच्या दिवसांचा आढावा घेतो. मला त्या सर्व गोष्टी आठवतात ज्या मी इथपर्यंत पोचन्याआधी केलेल्या आहेत. आज माझे काही चित्रपट बॉक्स ऑफिस वर चालले नाहीत म्हणून मी काही दिग्दर्शन थांबविले नाही. मी नेहमीच यशस्वीपणे संघर्ष करत राहील.

 

 

नवीन कलाकारांसाठी मला एवढेच सांगायचे आहे की जर तुमच्यामध्ये कौशल्य असेल आणि जर तुमचा तुमच्या वरती विश्वास असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

त्यामुळे तुम्ही तुमच्या वरती विश्वास ठेवा आणि तुमच्या कले वरती अभ्यास करत राहणे गरजेचे आहे.”

रेमोने अनेक दिग्गज कलाकारांसोबत यशस्वीरित्या काम केलेले आहे. त्याचा हा प्रवास असाच यशस्वीपणे चालू राहो एवढीच अपेक्षा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version