Site icon InMarathi

राजू शेट्टी यांच्या जातीयवादी वक्तव्याचा समाचार घेणाऱ्या या पोस्ट वाचायलाच हव्या अशा आहेत

shetty inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. आचारसंहिता लागलेली आहे. अनेक नेत्यांच्या सभा, मुलाखती, भाषणे रोज सुरु आहेत. मतदार राजाकडून झोळीत मते पडवीत यासाठी राजकारणी पडेल टी किंमत द्याय तयार आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी एक वादग्रस्त जातीयवादी वक्तव्य केले. ते म्हटले की,

“जोशी, देशपांड्यांची पोरं कधी सीमेवर लढत नाहीत.”

त्यांच्या या वक्तव्यानंतर समाजाच्या सर्व स्तरांतून तीव्र प्रतक्रिया उमटल्या. सैन्यात जाणाऱ्या आणि प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांच्या बाबतीत अशी जातीयवादी विधाने करू नयेत हे किमान राजकीय समाज असणार्या कोन्त्य्धी नेत्याला सहज कळायला हवे. पण यावेळी बोलताना राजू शेट्टी यांची जीभ घसरली.

 

dnindia.com

त्यांचे हे वक्तव्य खोडून काढण्यासाठी अनेक लोकांनी सोशल मीडियात परखड टीका केली.

त्यापैकी प्रत्यक्ष भारतीय सैन्यात ज्यांनी काम केले त्या कॅप्टन स्मिता गायकवाड आणि राजकीय विश्लेषक सौरभ गणपत्ये यांच्या पोस्ट इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत.

===

२००४ ची गोष्ट आहे. भारतीय सैन्यात रुजू होणाऱ्या ७५ महिला अधिकाऱ्यांच्या आमच्या कोर्स मध्ये महाराष्ट्रातून आम्ही दहा जणी होतो. त्यापैकी तीन कुलकर्णी होत्या. तीन कुलकर्णी आणि मी एक गायकवाड अशी आमची चौकडी होती. त्यामुळे आम्हाला K3G म्हटलं जायचं.

सैन्यात जाण्यासाठी तयारी करत असताना जिच्याबरोबर मी Running practice करायचे ती माझी जिवलग मैत्रीण देशपांडे होती जी नंतर भारतीय सैन्यात रुजू झाली.

ज्याच्याबरोबर गटचर्चेचा सराव करायचे तो उपासनी होता, जो सध्या भारतीय सैन्यातील एका बटालियनचा commanding Officer म्हणून नेतृत्व करत आहे.

ज्यांनी मला सैन्यात जाण्यासाठी मार्गदर्शन केलं ते कर्नल चितळे होते. सैन्यात प्रशिक्षण घेवून सुट्टीवर आल्यावर घरी बोलावून कौतुक करणाऱ्या माझ्या शाळेतील वर्गशिक्षिका आणि त्यांचे पती जनरल भट होते.

बाकी अनेक गोडबोले, रानडे, जोगळेकर ,जोशी, अभ्यंकर मी आर्मी मध्ये पाहिले आहेत.

 

deccanchronicle.com

सांगण्याचा उद्देश हा, की राजू शेट्टी किंवा Caravan सारख्या जातिवाद्यांनी कितीही विष पेरायचं काम केलं तरी हा समाज स्वानुभवातून मतं बनवत असतो आणि बनवत राहील.

आणि त्याही पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जोशी, कुलकर्णी, गायकवाड, कांबळे, निंबाळकर किंवा अजून कोणीही सैन्यात भरती होतात तेव्हा ते जोशी, कुलकर्णी, गायकवाड, कांबळे, निंबाळकर रहात नाहीत त्यांची ओळख फक्तं “फौजी” इतकीच असते.

फील्ड मार्शल करिअप्पा ह्यांचा मुलगा म्हणजे एअर मार्शल के सी नंदा.

भारत पाक युद्धाच्या वेळी के सी नंदा Sqn Leader होते. त्यांचे विमान पाकिस्तानने पाडले आणि त्यांना बंदी बनवले. नंतर अयुब खान ह्यांना समजले की फिल्ड मार्शल करीअप्पा ह्यांचा मुलगा बंदी बनवला आहे.

अयुब खान आणि करिअप्पा हे दोघं ब्रिटिश आर्मी मध्ये एकत्र लढले होते. त्यामुळे अयुब खान ह्यांनी करिअप्पांना फोन करून त्यांच्या मुलाला सोडण्याची ऑफर दिली.

करिअप्पा तेव्हा म्हणाले की ‘सगळेच POW (prisoners of war) माझी मुलं आहेत. सोडायचं असेल तर सगळ्यांना सोडा’. जिथे रक्ताची नाती त्या युनिफॉर्मच्या नात्यापुढे दुय्यम ठरतात तिथे ‘जात’ किस झाड की पत्ती?

 

indiatoday.com

राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आणि फुटीरतावाद पसरवण्यासाठी कोणी कितीही सैनिकांच्या जाती काढण्याचा प्रयत्न केलात तर त्यातून स्वतःच्या वैचारिक दारिद्र्याचं आणि संकुचित मानसिकतेचं प्रदर्शन मांडताय. ह्यापेक्षा जास्तं काही साध्य होणार नाही.

कारण बुरसटलेल्या जातीवादी संकुचित मानसिकतेपेक्षा त्या Olive green वर्दीतल्या camaradarie ची ताकद खूप जास्त आहे.

जी तुमच्या संकुचित जातीवादी मानसिकतेला आणि तुमच्या फुटीरतावादी अजेंड्याला पुरून उरेल … हा केवळ विश्वास नाही तर अनुभव आहे.

: कॅप्टन स्मिता गायकवाड

===

देशपांडे कुलकर्णी यांची मुलं कधी सीमेवर लढत नाहीत असं वाक्य राजू शेट्टी यांनी केलं. निवडणुकांच्या आदी किंवा नंतर आपल्यापेक्षा वरचढ वाटणाऱ्या एखाद्या पक्षाच्या मतदार समूहाबद्दल अश्या स्वरूपाचं भावनिक वाक्य टाकायची आपल्याकडे फार जुनी फॅशन आहे.

राजू शेट्टी स्वतः दिगंबर जैन समाजाचे आहेत.

२००७ पासून नरेंद्र मोदी गुजरातेत पुरोगाम्यांना ऐसपैस पुरून उरल्यावर गुजराती समाजाची, त्यायोगे जैन आणि मारवाडी समाजाची हेटाळणी करायचं कामच पुरोगामी पत्रकारांनी हाती घेतलं होतं.

दंगली करणारे गुजराती सैन्यात मात्र दिसत नाहीत किंवा गुजराती सैन्यात जात नाहीत कारण ते गांधीजींना मानतात, पण दंगली बघितल्या की हे दिसत नाही” अशी सरसकट वाक्य या समाजाबद्दल फेकली जायची. नरेंद्र मोदींना या टीकेने अजून मोठं केलं.

 

india.com

पुरोगामी सरकार केंद्रात असताना सीमेच्या परिसरात काही सैनिकांना भेटायचा योग आला होता.

कुठेतरी ह्या टीकेची चिरफाड व्हावी असा हेतू होताच, परंतू थेट एखाद्या समाजाचं नाव नाव घेऊन “ओ ते अमुक ढमुक जातीचे किंवा भाषा धर्माचे लोक सैन्यात असतात का हो?” असा प्रश्न विचारायला मी लिब्रांडू पत्रकार नव्हतो आणि समोर तर देशभक्तीचा अध्याय असणारे सैनिक होते.

आडून आडून विचारून घेतलं, की अमुक एका जातीचे लोक सैन्यात अधिक जातात असं मी ऐकून असतो हे खरं आहे का?

समोरचा सैनिक मराठा समाजाचा होता, तो म्हणाला जातीधर्मनिहाय लोकसंख्येप्रमाणे कमी जास्त असणारच. महाराष्ट्रातले ग्रामीण तरुण यायला धडपडत असतात.

पण आमच्या या थलसेनेमध्ये (आर्मी) अक्षरशः सर्व भाषा धर्म आणि जातीचे लोक असतात. आमची थलसेना सगळ्यांनाच सामावून घेणारी आहे. या थलसेनेला ‘मिनी इंडिया’ म्हटलं जातं ते यासाठीच. राजू शेट्टींच्या आजच्या आरोपाचं उत्तर मला तेंव्हाच मिळालं. (हा झेंडे लावलेला फोटो आर्मीने सर्वधर्माच्या लोकांसाठी केलेल्या मंदिराचा आहे.)

:सौरभ गणपत्ये

===

वरील दोन्ही पोस्ट वाचल्यानंतर हे लक्षात येईल की कुठला सैनिक कोणत्या जातीचा आहे हा वोचारही भारतीय सैन्यातील जवानांच्या मनाला शिवत नाही. सैन्याच्या बाहेर असणाऱ्या काही जातीवादी राजकीय नेत्यांनी अशा ठिणग्या पेटवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याने सैन्याला काहीही फरक पडणार नाही.

पण इथे प्रश्न आपण ज्यांना निवडून देतो त्या मुर्दाड मानसिकतेच्या लोकप्रतीनिधींचा आहे. त्यांना जितक्या लवकर ही समज येईल तेवढे त्यांच्याच हिताचे आहे.

नाहीतर कुणाला कधी राजकीय सिंहासनावरून खाली उतरवायचे याची समाज भारताती जनतेला आहे याची अशा राजकीय नेत्यांनी जाण असू द्यावी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version