Site icon InMarathi

बीग स्क्रीनचा बाजीराव आपल्या ख-या आयुष्यात कसा आहे हे नक्की वाचा!

ranveer singh InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

रणवीर सिंग, संपूर्ण देशभरातल्या तरुणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा रणवीर सिंग त्याच्या गल्ली बॉय चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर पोचला आहे, “अपना टाईम आयेगा” म्हणत अख्ख्या तरुणाईने त्याला आपल्या डोक्यावर घेतले.

गेल्या काही वर्षांत भारतीय चित्रपट उद्योगात अनेक नवनवीन कलाकार, तारेतारका आले आहेत. त्यापैकी सगळेच प्रतिभावान नसले तरी काहींनी मात्र आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने भारतीय जनमानसात आपले स्थान निर्माण केले आहे.

त्यापैकी एक म्हणजे रणवीर सिंग, एक अजब रसायन, उत्साहाचा खळाळता झरा, नायक म्हणून अगदी पाण्यासारखा.

एकदा भूमिकेत शिरला की आपण रणवीर ला विसरून जातो फक्त ती व्यक्तिरेखा लक्षात राहते इतका त्याचा अभिनय जिवंत असतो.

 

News18.com

सुपरस्टार गोविंदाचा हा खूप मोठा चाहता आहे गोविंदाच्या चित्रपटातले अनेक संवादही त्याला तोंडपाठ आहेत. कदाचित म्हणूनच की काय, अभिनया बरोबरच हा अभिनेता आपल्या गोविन्दाछाप चित्रविचित्र रंगीत पेहरावासाठीही नेहमी चर्चेत असतो.

रंगांच्या बाबतीत गोविंदा त्याचा गुरु असला तरी विचित्रपणाच्या बाबतीत मात्र हा कैक पटीने काळाच्या पुढे आहे, काहीही घातलं तरी त्यानंतर ज्याप्रकारे तो वावरतो त्यामुळे त्याचं वेगळं असणं खास वाटतं

रणवीर सिंग हा अतिशय शक्तिशाली अभिनेता आहे. विनोदी भूमिका असो वा ऍक्शन, थ्रिलर असो किंवा रोमँटिक भूमिका हा हरतर्हेच्या भूमिकेत चपखल बसतो. साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देतो.

आठवा त्याचा बँड बाजा बारात” सिनेमातला टपरीसमोर बसून भजी खातानाचा सीन, त्यावेळी तो अजिबात हिरो वगैरे न वाटता टिपिकल दिल्लीचा मुलगा वाटतो, ह्या सिनेमातला त्याचा अभिनय त्याचे वेगळेपण सिध्द करणारा ठरला, त्याच्या अभिनयाला बॉलीवूड इंडस्ट्रीत वाखाणले गेले.

 

YouTube

त्यानंतर आलेला प्रत्येक चित्रपट रणवीरच्या अभिनयसामार्थ्याची ग्वाही देत गेला.

अगदी रिक्की बहल पासून अलीकडच्या रामलीला आणि बाजीराव मस्तानीपर्यंत प्रत्येक व्यक्तिरेखा तो अक्षरशः जागलाय हे त्याला पडद्यावर बघताना क्षणोक्षणी जाणवतं.

पद्मावत मध्ये त्याने साकारलेला खिलजी तर केवळ अप्रतिम. पद्मावत पाहिल्यानंतर लक्षात राहतो तो केवळ पद्मावतीचा जोहार आणि खिलजी. खिलजीची ही नकारात्मक भूमिका साकारताना दरम्यानच्या काळात तो भूमिकेशी इतका एकरूप झाला की, तो नैराश्याने ग्रासला गेला होता असेही ऐकण्यात आले होते.

प्रत्येक भूमिकेत जीव ओतणारा हा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अगदी तुमच्या आहे. हल्लीच त्याने प्रसिध्द बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हीच्याशी नोव्हेंबर २०१८ ला विवाह केला.

तर मंडळी, आपल्या लाघवी हास्याने वेड लावणारा हा रणवीर नेमका आहे तरी कोण ? आज जाणून घेऊ रणवीरशी संबंधित अशा काही खास गोष्टी ज्या फारशा कुणाला माहिती नाहीत. ज्या ऐकून तुम्हाला नक्कीच नवल वाटेल.

 

financialexpress.com

सोनम कपूर रणवीरची मोठी बाहीण आहे; काय चमकलात ना ?

होय तुम्ही बरोबर वाचलत, हे खरंय रणवीर हा सोनमच्या आईच्या बहिणीचा म्हणजे तिच्या मावशीचा मुलगा आहे सोनामचा धाकटा भाऊ आहे.

रणवीरने आहना देओलला डेट केले आहे

चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याआधी रणवीर सिंगने हेमा मालिनीची धाकटी मुलगी आहना देओल बरोबर डेटिंग केले आहे.

रणवीरने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी काही काळ कॉपीरायटर म्हणून काम केले आहे; रणवीरने आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका नामवंत एड एजन्सीमध्ये कॉपीरायटर म्हणून नोकरी केली होती.

रणवीरला एक्स रेटेड मासिकं आवडतात; रणवीरला एक्स रेटेड मासिकांची प्रचंड आवड आहे इतकं की तो आजवर ज्या ज्या देशांत फिरलाय त्या सगळ्या देशांतून त्याने ही मासिकं गोळा केली आहेत.

रणवीरने तीन मोठ्या बॉलीवूड सिनेमांना दिलाय नकार; रणवीरला आपला डेब्यू लक्षवेधी करायचा होता त्यामुळे त्याने मोठ्या मोठ्या तीन चित्रपटांना नकार दिला आणि यशराज च्या बँड बाजा बारात” चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. ह्या चित्रपटातून प्रथमच यशराजने नायक म्हणून रणवीर सारख्या नवख्या अभिनेत्याला संधी दिली होती.

 

Film Companion

नावात केला बदल.

रणवीरचे संपूर्ण नाव आहे, रणवीर सिंग भवनानी.

परंतु हे संपूर्ण नाव त्याला मोठे वाटत असल्याने त्याने आपले आडनाव काढून टाकले आणि आडनावाच्या ऐवजी केवळ सिंग लावायला सुरुवात केली, “सिंग” हे त्याच्या आजोबांकडून आलेले आडनाव आहे त्याचे आजोबा शीख होते.

मम्माज बॉय

इतर अनेक लक्षवेधी हॉट पुरुषांप्रमाणेच रणवीरसुद्धा आपल्या आईचा लाडका आहे. आपल्या आईशी त्याचे घट्ट नाते आहे. म्हणजे रणवीरशी जवळीक साधायची तर त्याच्या आईच्या गुडबुक मध्ये असायला हवंय.

खुद्द बिग्बींनी आपल्या हातांनी लिहून पाठवले पत्र.

रणवीरचा रामलीला चित्रपट प्रदर्शित झालेला तेव्हा, रणवीरच्या अभिनयाने प्रभावित होऊन खुद्द अमिताभ बच्चन ह्यांनी आपल्या हस्ताक्षरांत रणवीरला त्याचे कौतुक करणारे पत्र पाठवले होते.

 

Times of India

पडद्यावरच्या मृत्यूला नकार ; रणवीरच्या आईला त्याला पडद्यावर मारताना बघणे सहन होत नाही आजवर अनेक चित्रपटांत जसे की, लुटेरा, गुंडे, रामलीला ह्यात शेवटी त्याचा मृत्यू होतो असे दाखवले गेले आहे.

हेच कारण आहे की त्याला त्याच्या आईने बाजीराव मस्तानी बघायला नको होता, परंतु आईने आग्रह केला आणि चित्रपट पहिला. रणवीरच्या आईची इच्छा आहे की रणवीर आणि दीपिकाचा असा एक चित्रपट यावा ज्यात शेवटी त्याचा मृत्यू होणार नाही.

कला शाखेचा पदवीधर; रणवीर इंडियाना विद्यापीठाच्या कला शाखेचा पदवीधर आहे. ज्यात थोड्याफार प्रमाणात रंगभूमीचाही अभ्यास केला जातो.

जाहिरातींना नकार ; रणवीरने आजवर अनेक जाहिरातींना नकार दिलाय, त्याचं मत आहे की त्या जाहिराती जर नव्या चेहऱ्यांनी केल्या तर जास्त प्रभावी ठरतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version