Site icon InMarathi

सुमारे सदतीस वर्षांपूर्वी अंतराळात हरवलेलं रशियाचं यान अखेर नासाला असं सापडलं होतं..  

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

पृथ्वीव्यतिरिक्त अंतराळात शोध घेण्यासाठी वर्षानुवर्षे, संशोधन होत आले आहे, त्यासाठी आवश्यक ते माहिती आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात आपल्याला यश आलेले आहेच, परंतु कधी प्रयत्न सफल होतात तर कधी अपयशाचे तोंड पाहावे लागते.

ह्यात आनंदाची बाब अशी की दिवसेंदिवस हे तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की भूतकाळातल्या हरवलेल्या गोष्टीसुद्धा शोधण्यासाठी ह्याची मदत होऊ लागली आहे कशी ते बघू.

लहानपणी हरवलेला हिरोच्या दंडावरच्या इवल्याशा खुणेमुळे शेवटी आपल्या कुटुंबाला सापडतो हे दृश्य आपल्या चांगलेच परिचयाचे आहे. दरम्यान त्यासाठी आधी त्या हिरोची हजारो गुंडाबरोबर फायटिंग होते त्यात त्याच्या शर्टाची बाही फाटून ओळख पटते आणि ‘बिछडे हुये’ एकत्र येतात.

असाच काहीसा किस्सा घडला आहे रशिया आणि त्याच्या यानाच्या बाबतीत. अक्षरशः हजारांच्या संख्येत मिळालेल्या चंद्रावरच्या फोटोशी फायटिंग केल्यानंतर त्यावरच्या अभ्यासातून हे यान नासाच्या शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या शोधून काढले आहे.

 

space.com

हे यान सुमारे सदतीस वर्षांपूर्वी अंतराळात सोडण्यात आलं होतं परंतु कालांतराने त्याच्याशी संपर्क तुटला,त्यानंतर हे यान आत्ता नासाला सापडलंय.

नासाने आपल्या चंद्राच्या नकाशाच्या मदतीने प्रकाशित केलेल्या चंद्रावरच्या छायाचित्रांचा वापर करून ३७ वर्षांच्या जुन्या जागेचे रहस्य उलगडण्यात यश आले आहे.

कसे ते बघूया.

ह्या कथेचा नायक आहे फिजीक्स अॅण्ड ऍस्ट्रोनॉमी अँड जिओग्राफीच्या वेस्टर्न डिपार्टमेंट्स येथे काम करणारे प्रोफेसर क्रॉस फिल स्टुक. स्टुक यांनी २००७ साली “चंद्राच्या संशोधनाचा आंतरराष्ट्रीय अॅटलस” या विषयावरील चंद्र संशोधना विषयी संदर्भ पुस्तक प्रकाशित केले होते.

१५ मार्च रोजी, नासाच्या ऑर्बिटर (एलआरओ) मधील प्रतिमा आणि डेटा पोस्ट करण्यात आला.

जो चंद्राच्या पृष्ठभागावरील ३१ मैल अंतरावर एक वर्षाच्या शोध मोहिमेसाठी अंतर्गत नकाशा तयार करून, संसाधनांचा शोध घेईल आणि संभाव्य सुरक्षित लँडिंग साइट शोधण्यात मदत करेल शिवाय चंद्राचे तापमान आणि किरणांची पातळी मोजेल.

नासाचा अॅटलस आणि चंद्रावरच्या हजारोंच्या संख्येत असणाऱ्या छायाचित्रांशी केलेल्या झटापटीनंतर, स्टुकने रशियन रोव्हर लुनोकहोद २  चे अचूक स्थान शोधून काढले.

 

३७ वर्षापूर्वी ह्या यानाने चंद्रावर सोडलेले ३५ किलोमीटर अंतराचे ट्रॅकचे ठसे शोधण्यासाठी त्याने चंद्राच्या नकाशाच्या मदतीने ३५ किलोमीटरचा ट्रेक केला आणि त्याच्या सहाय्याने इतर ट्रॅक शोधले.

हा प्रवास कुठल्याही रोबोटिक रोवरसाठी आजवरचा दुसऱ्या खगोलीय पिंडावर जाण्यासाठी केलेला सर्वात मोठा प्रवास होता.

ही काही महत्वाची छायाचित्रे प्रकाशित केल्यानंतर लगेच स्टुकच्या बरोबरच जगभरातल्या इतर शास्त्रज्ञांनी हारोव्हर शोधण्याचे आपले प्रयत्न सुरू केले. स्टुकेने शोध घेणे सोपे व्हावे अशा फोटोंचा डेटाबेस तयार केला आणि शेवटी तो त्या हजारो फोटो मधून त्याला हवा तो फोटो त्याने शोधून काढलाच.

१९७० साली पाठवण्यात आलेल्या ह्या यानाला शोधण्यात मुख्य भूमिका पार पाडली नासाच्या सूक्ष्म नजरेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) ने.

अॅरिझोना स्टेट यूनिव्हर्सिटीचे लूनर रिकोनिसन्स ऑर्बिटर कॅमेर्याचे मुख्य अन्वेषक मार्क रॉबिन्सन म्हणतात ,की हे एल आर ओ तंत्रज्ञान चंद्रासाठी वरदान आहे. ह्यात बसवलेला कॅमेरा अधिक अचूक आणि सुस्पष्ट छायाचित्रे टिपून ती पाठवण्यात कुशल आहे.

 

ScienceDaily.com

तर, सोवियत संघद्वारे पाठवण्यात आलेले लुनोकहोड्स नावाचे हे रोवर १९७० च्या दशकाच्या सुरवातीला लॉन्च केलेल्या आठ-चाकी रोव्हर्सपैकी एक होते.

हे रोवर दिवसभर सौरउर्जेवर चालायचे आणि रात्री चालण्यासाठी त्यात हीट रेडिएटर बसवले होते कारण रात्री चंद्रावरचे तापमान कमी झालेले असे.

हे रोवर चंद्रावरील मातीचे नमुने गोळा करण्यासाठी बनवले गेले होते.

तर आपल्या मोहिमे दरम्यान हे यान चंद्रावर नमुने गोळा करण्यासाठी उतरले असताना तिथल्या मातीचा नमुना घेण्यासाठी ते एका लहान कपारीत चालत गेले  आणि काही कारणास्तव तेथे अडकून पडले.त्यानंतर अपघाताने त्याचे हीट रेडिएटरमातीखाली गाडले गेले.

त्यातून बाहेर यायला काही त्याला जमले नाही. शेवटी ते आणखी तापत गेले आणि एका क्षणी त्याने काम करणे थांबवले. जागीच थांबल्याने त्यावर मातीची पुटं चढून काही काळाने हे यान  सुद्धा चंद्रावरच्या एका डागासारखे दिसायला लागले होते.

हे यान ज्या ठिकाणी उतरलं, तिथे त्याचे ट्रॅक दिसत होते. स्टुक ह्यांनी ह्या यानाच्या मिशन चा नीट अभ्यास केलेला होता शिवाय आधुनिक तंत्रामुळे रोव्हरने केलेल्या कामाचे बारीक सारीक तपशील मिळवणे आणि डेटा अधिक अचूक माहिती मिळवण्यासाठी त्याच मार्गावरून पुढे जात चुंबकीय क्षेत्राचा शोध घेणे सोपे झाले.

 

deccanchronicle.com

स्टुक ह्यांच्या मते, ह्या शोधानंतर आता रशियाने प्रसारित केलेल्या नकाशाच्या छाया चित्रांमध्ये बदल करून त्यात सुधारित फोटोचा समावेश करण्यात येणे आवश्यक आहे.

स्टुक म्हणतात की नासाच्या शास्त्रज्ञांनी आपला एटलस डेटा तयार करणे आणि डेटाची रिकवरी करणे ह्या दोन्ही कामांसाठी व्यवस्थित वापर केला आहे.

त्यांचा पुढचा प्रोजेक्ट मंगळावर आहे आणि ह्या प्रोजेक्ट सारखाच आहे त्यात चंद्र आणि मंगळ ह्या दोन्ही ग्रहांवरचे सर्वोत्तम नकाशे वापरले जाणार आहेत.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version