पर्ल-हार्बर हल्ला नव्हे तर “या” कारणांमुळे अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दूसरे महायुद्ध जगाच्या इतिहासामध्ये बदल घडवणारे ठरले. या महायुद्धाच्या इतिहासामध्ये अनेक प्रकारच्या खोट्या अफवा पसरवण्यात आल्या. याच अफवांमुळे महायुद्धाचा आजही बारकाईने अभ्यास करण्यात येतो.
अनेक इतिहास संशोधकांचे असे मत आहे की अमेरिका या महायुद्धापासून दूर राहणार होती पण जेव्हा पर्ल हार्बर वर हल्ला करण्यात आला त्यावेळी उद्वीग्न होऊन अमेरिकेने या महायुद्धामध्ये सहभाग घेतला.
जाणून घेऊयात या कथेबद्दल…
असं म्हटलं जातं की जेव्हा १९३९ मध्ये युरोपवर जागतिक महायुद्धाचे संकट अटळ होते तेव्हा अमेरिकेने मात्र या युद्धापासून दूर राहणेच पसंत केले होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
अमेरिकेने तोपर्यंत या महायुद्ध मध्ये सहभाग नोंदवला नाही जोपर्यंत जपान ने पर्ल हार्बर या बंदरावरती हल्ला केला नाही. त्या काळामध्ये मित्रराष्ट्र म्हणून जपान जर्मनी आणि इटली एकत्र आले होते.
या सर्व राष्ट्रांनी ११ डिसेंबर १९४१ रोजी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका या राष्ट्राविरुद्ध आपले युद्ध जाहीर केले आणि बरोबर चार दिवसांनी या राष्ट्रांनी पर्ल हार्बर या अमेरिकेच्या तळावर हल्ला चढवला. असे म्हटले जाते की याच हल्ल्यामुळे अमेरिका या महायुद्धामध्ये उतरली.
जरी हे खरं असेल तरी या महायुद्धामध्ये अमेरिकेने उतरणयामाग इतरहीे अनेक कारणे होती.
दुसरे जागतिक महायुद्ध हा काळ मानवी इतिहासातील सर्वात विदारक कालावधी म्हणून नेहमीच लक्षात ठेवला जाईल. या महायुद्धामध्ये ६० ते ८० हजार सैनिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अशा प्रकारचं कुठलं तरी युद्ध जगातील या धूर्त आणि बलाढ्य अशा देशांनी घडू दिलं.
जेव्हा युद्ध चालू झाले तेव्हा अमेरिकेने अत्यंत शांततेचा पवित्रा घेतलेला होता. या युद्धाला अमेरिकेतील काही लोकांनी युरोप मधील अडचण म्हणून बघितले आणि या युद्धापासून दूर राहण्याचे ठरवले. पण हळूहळू युरोप मधील अडचणी वाढत गेल्या आणि त्यामुळेच की काय अमेरिका ही या महायुद्धा कडे झुकू लागली.
अमेरिकेच्या संयमाचा बांध फोडणार क्षण म्हणजे जपानने पर्ल हार्बर या बंदरावर केलेला अकस्मात हल्ला. खरंतर हा हल्ला तेवढा अकस्मात नव्हता हा हल्ला होणार हे अमेरिकेलाही अपेक्षित होतं कारण या हल्ल्याच्या काही दिवस आधीपासून अमेरिका आणि जपान मधील संबंधांमध्ये तणाव जाणवू लागला होता.
हा हल्ला म्हणजे अमेरिकेला युद्धामध्ये सहभाग घेण्यासाठी दिलं गेलेलं कारण होते.
–
हे ही वाचा – या मराठी माणसाने लावलेला शोध दुसऱ्या महायुद्धात हजारो सैनिकांसाठी वरदान ठरला!
–
अमेरिका महायुद्धाच्या अनेक वर्ष आधीपासून जपान वरती अनेक निर्बंध लादायचा प्रयत्न करत होते. याचे प्रत्युत्तर म्हणून जपान नेही त्याच्या आजूबाजूच्या नैसर्गिक साधन संपत्ती वर आपला हक्क सांगितला होता. आणि या नैसर्गिक साधनसंपत्तीला अमेरिकेला देण्यास नकार सांगितला होता.
जेणेकरून जपानी नागरिक अमेरिकेकडून येणाऱ्या वस्तूंवर अवलंबून राहणार नाही. जपानच्या या निर्णयामुळे अमेरिका आणि जपान मधील संबंध तणावपूर्ण झालेले होते.
जपानलाही या गोष्टीची खात्री होते की युद्ध झाल्याशिवाय अमेरिका त्यांचा पिच्छा सोडणार नाही.
या युद्धामध्ये जपानला अमेरिकेशी लढण्यासाठी अमेरिकेची ताकद कमी करणं गरजेचं होते. यासाठीच जपानने पॅसिफिक भागात अमेरिकेचे लष्करी तळ म्हणून ओळखले जाणारे पर्ल हार्बर नावाचे बंदर उध्वस्त केले.
जपानने ७ डिसेंबर १९४१ रोजी अधिकृतपणे अमेरिकेवर ती हल्ला केला आणि या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशीच अमेरिकेनेही जपानविरुद्ध युद्ध पुकारले.
खरं म्हणजे अमेरिकेवर हल्ला यशस्वीपणे करून जपान एका अर्थाने विजयी झाले होते. तात्विक दृष्ट्या बघता जपानचा हा विजय होता कारण, यामुळे जपान आता त्यांचे सैन्य पॅसिफिक भागांमध्ये तसेच फिलिपाईन्स ब्रिटिश मलाया अशा छोट्या छोट्या भागांमध्ये सहजतेने घुसवू शकत होते.
या काळामध्ये अमेरिका आर्थिक संकटातून मार्गक्रमण करत होती आणि जपान मात्र अशा कुठल्याही आर्थिक संकटात घेरले गेलेले नव्हते.
याच काळामध्ये जपानमधील सैन्याने असा विचार केला की जर आपल्याला आर्थिक संकटांमध्ये पडायचं नसेल तर आपण आपलं सैन्यबळ वाढवणे गरजेचे आहे. या विचाराचा मागोवा घेत जपानने १९३१ मध्ये दक्षिणेतील मंजुरी याचा ताबा जपानने मिळवला.
या विजयामुळे जपानला अनेक नैसर्गिक साधन संपत्ती वरती ताबा मिळवण्यात यश आले. त्यांना आपले सैन्यबळ तपासता आले. या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे जापान ने ज्या मंचुरिया वरती ताबा मिळवला होता, तो प्रदेश चीनच्या प्रभावाखाली होता.
हा प्रदेश आंतरराष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असे. तरीही अमेरिकेने या गोष्टीमध्ये रस दाखविला नाही याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी या भागांमध्ये कम्युनिस्ट विचारधारा प्रबळ झाली होती.
या हल्ल्यामुळे जपानच्या सैन्याचे मनोबल दुपटीने वाढले. या सोबतच यु एस एस आर एक आंतरराष्ट्रीय संघटना होती. या संघटनेनेही जापान वर मंचूरिया ताब्यात घेतल्या बद्दल कठोर टीका केली होती.
अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये परराष्ट्र करार याआधी घडलेला होता, यासोबतच अमेरिकेचे आणि यु एस एस आर या आंतरराष्ट्रीय संघटनेचेही संबंध अत्यंत घनिष्ठ होते.
त्यामुळे अमेरिकेने जपानला आंतरराष्ट्रीय पातळीवर जपानला विरोध करण्यास सुरुवात केली. यामुळेच जपाननेही अमेरिकेची गय न करता अमेरिकेविरुद्ध काही काळाने आघाडी उघडलेली आपल्याला दिसून येईल.
यासंदर्भात जपानने गांभीर्याने विचार करावा यासाठी अमेरिकेने जपान सोबत असणारे समुद्र मार्गाचे सर्व संबंध तोडून टाकले. ही परिस्थिती जपान साठी अत्यंत धोकादायक होती. कारण अमेरिके मार्फतच जपानला इंधन आणि धातूंचा साठा मिळत असे.
जपानला मिळणारे रबर ब्रिटिश मलाया या भागातून मिळत असे. त्यामुळे अशा प्रकारचे निर्बंध जपानला खरंच परवडणारे नव्हते.
पण या सर्व परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी १९३७ मध्ये जपानने, चीन शी संपूर्णता शक्तीनिशी लढण्याचा निर्णय घेतला. या काळामध्ये चीन आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेले राष्ट्र होते.
या चीन-जपान युद्धाला दुसरे सिनो-जपनिज युद्ध असे जागतिक इतिहासामध्ये संबोधले जाते. खरं पाहायला गेलं तर दुसऱ्या महायुद्धाची खरी सुरुवात याच युद्धामधून झाली होती.
पुढे १९४० मध्ये जपानने नाझी जर्मनी आणि फॅसिस्ट इटली यांच्यासोबत हातमिळवणी केली एका कराराअंतर्गत या तिन्ही राष्ट्रांनी एकमेकांसोबत सह्योग करण्याचा संकल्प सोडला.
जगाचे पुनर्निर्माण करण्याचा संकल्पही या करारामध्ये करण्यात आला. या युद्धामध्ये चीनला मदत म्हणून अमेरिका आपली शस्त्रास्त्रे देऊ लागले.
कारण चीन आणि अमेरिका या राष्ट्रांमध्ये तसा करार झालेला होता. या कराराला लँड लीज करार असे म्हटले जाते. खऱ्या अर्थाने हा करार म्हणजे अमेरिकेचे एक महत्त्वाचे अस्त्र म्हणून ओळखले जाते. ज्याच्या आधारे अमेरिका त्याच्या मित्र राष्ट्राला वाटेल तेव्हा मदत करू शकते त्याच्या युद्धामध्ये सहभाग न घेता.
यासोबतच अमेरिकेने इंग्लंडलाही त्यांची मदत दिलेले होती. कारण याच काळामध्ये जर्मनीने युरोपमधील आपले वर्चस्व सिद्ध केले होते. चीनचे या युद्धामध्ये मोठे नुकसान झाले होते त्यामुळे दक्षिणेतील देशांनी चीनला मदत केली आणि जपान वर अनेक निर्बंध लादले.
–
हे ही वाचा – “पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका!” म्हणणाऱ्या भारतीयांसाठी अमेरिका-रशियाचा इतिहास
–
कदाचित यामुळेच क्रोधित झालेल्या जपानने अमेरिकेविरुद्ध एक स्वतंत्र आघाडी उघडली. अमेरिकेविरुद्ध अधिकृतपणे युद्धाची घोषणा केली आणि पर्ल हार्बर या अमेरिकेच्या अधिपत्याखाली असलेल्या बंदरावरती हल्ला चढवला, आणि अमेरिके ला या युद्धामध्ये हे सहभाग घेण्यास भाग पाडले.
पुढे या युद्धामध्ये अमेरिकेने भाग घेण्याची परिणीती म्हणून अमेरिकेने जपान वरती दोन अनु बॉम्ब टाकले हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांना अमेरिकेने बेचिराख केले.
यानंतर जपाननेही हे युद्ध मधून आपली माघार घेतली. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम आपल्या सर्वांना परीचीत आहेतच.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.