Site icon InMarathi

गणितात आपलं हक्काच स्थान मिळविलेल्या “π” या चिन्हाची जन्मकथा प्रत्येकाने वाचलीच पाहिजे

pi formula InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गणित म्हणजे शालेय जीवनातील एक अडचणच लोकांना नेहमी वाटत आली असेल, काहींना तर गणिताबद्दल खूप आवडही असेल. गणितात अनेक प्रकारची सूत्रे वापरली जातात. अनेक प्रकारच्या क्लृप्त्याही वापरल्या जातात. जेणेकरून आपल्याला गणिताचे उत्तर मिळेल.

पण गणितात अशा काही संज्ञा वापरल्या जातात की त्या केव्हापासुन वापरल्या जातात आणी त्यांचा शोध कुणी लावला याचं आजही आपल्याला गुपित उलगडलं गेलेलं नाही.

अशीच एक संज्ञा आहे ती म्हणजे पाय (“π”). तर चला जाणून घेऊयात त्याबद्दल..

खरं म्हणजे ‘पाय’ या संज्ञेचा वापर आपण गेल्या चार हजार वर्षांपासून आपन करत आलो आहोत. पण गेल्या चार हजार वर्षांमध्येही आपण या पाय ची खरी किंमत काढू शकलो नाही.

 

SlideShare

खूप वर्षांपूर्वी बेबीलोनियन्स या गणितज्ञाने वर्तुळाच्या वस्तुमानाचे आकलन करण्यासाठी नवीन प्रकारच सूत्र शोधून काढले. ज्यामध्ये तो वस्तुमान काढण्यासाठी त्या वर्तुळाच्या त्रिज्येचा वर्ग करून आलेल्या किमतीला ३ ने गुणत असे, ज्यामुळे त्याने पाय चा शोध लावला.

म्हणजेच त्याच्या मते पाय ची किंमत ही तीनच्या बरोबर असे. बेबी लियोनीन्सच्या मते याची किंमत ३.१२५ आहे. ही किंमत जवळपास बरोबर येते.

बेबी लियोन्स यांचा कालखंड सांगताना असे सांगितले जाते की त्यांनी या सर्व गोष्टींचा शोध १६८० च्या दशकाच्या आसपास लावला होता. त्या काळातील हा एक महान अविष्कार आहे असे म्हणावे लागेल.

ऱ्हेंड पपायरस हेही प्राचीन गणितज्ञ होते. ते इजिप्तमधील रहिवासी होते. इजिप्तमधील तत्कालीन पद्धतीनुसार वर्तुळाचे वस्तुमान काढण्यासाठी पाय या चिन्हाची किंमत ३.१६०५ एवढी घेतली जात असे. ही किंमत मात्र अंदाजे किमतीच्या जवळही जात नाही.

असे म्हटले जाते की आर्किमिडीज यांनी पाय या संज्ञेचा वापर गणितामध्ये पहिल्यांदा केला.

 

Famous Mathematicians

आर्किमिडीज हे जगातील नावाजलेले गणित तज्ञ म्हणून ओळखले जातात. ते सिराक्युज येथील रहिवासी होते. आर्किमिडीज यांच्या मते वर्तुळाचे वस्तुमान काढण्यासाठी पायथागोरियन थेरम चा वापर केला गेला पाहिजे होता.

या सर्व संशोधनामध्ये आर्किमिडीज यांना पायची किंमत मिळाली, पण आर्किमिडीज यांना हे ठाऊक होते की त्यांना पायची खरी किंमत मिळालेले नसून ती किंमत अंदाजे किमतीच्या जवळपास जाणारी आहे.

त्यामुळेच, आर्किमिडीज यांनी नेहमीच पाय ची किंमत 31/7 आणी 310/71 दाखविलेली आढळते.

आर्किमिडीज यांच्यासारखाच प्रयत्न एका चीनच्या गणितज्ञानेही केला होता. ते गणितज्ञ तर होतेच पण खगोलशास्त्रज्ञाची पदवीही त्यांना मिळाली होती. त्यांचं नाव झु चोंगशी होते.

त्यांनी वर्तुळाच्या वस्तुमानाचा अंदाज घेण्यासाठी काही टप्प्यांमध्ये वर्तुळाच्या त्रिज्येचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. अनेक दिवसांच्या तपश्चर्येनंतर आणि गणितीय आकडेमोड केल्यानंतर त्यांनी पाय ची किंमत नऊ डेसिमल अंकापर्यंत काढण्यात यश मिळवले.

 

india.com

सतराव्या शतकाच्या कालावधीमध्ये गणितज्ञांनी पायसाठी ग्रीक चिन्ह वापरण्यास सुरुवात केली आणि याची सुरुवात विल्यम जोन्स यांनी १७०६ मध्ये केली.

खऱ्या अर्थाने या चिन्हाला प्रसिद्धी मिळाली ती १७३७ मध्ये, याला प्रसिद्धी मिळवून देण्याचे श्रेय लियोनार्ट इ्युलर यांना जाते.

अठराव्या शतकामध्ये फ्रेंच गणितज्ञ ज्यांचं नाव जॉर्जेस बोफोन होतं, त्यांनी “प्रोबॅबिलिटी” मध्ये म्हणजेच शक्यतांमध्ये पायचा वापर करण्यास सुरुवात केली.

आता मात्र आपल्या शिक्षणामध्ये पाय हे चिन्ह एवढे प्रसिद्ध झाले आहे की आपल्याला त्याचा उगम बघायची आवश्यकता वाटत नाही, पण या माहितीतून तुम्हाला पाय बद्दल जाणून घेण्यास नक्कीच मदत होईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version