आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
दक्षिण भारतातील सर्वात मोठी ग्रामीण यात्रा व पुष्कर नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा ही श्रीक्षेञ माळेगाव येथे भरते. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालूक्यात माळेगाव हे देवस्थान आहे. नांदेड जिल्ह्यातील व तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून लाखो भक्तगण येथे यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत खंडोबाच्या दर्शनास येतात. माळेगाव यात्रा प्रसिद्ध आहे ती येथे भरणाऱ्या जनावरांच्या प्रदर्शन व विक्रीसाठी व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकामासाठी लागणाऱ्या अवजार विक्री-खरेदी साठी !
या ठिकाणी घोडे, ऊंट, गाय, बैल, म्हैस, रेडे, गाढव, शेळ्या मेंढे, अस्वल, माकड, वानर, कुञे, ससे, कासव, कोंबडे आदी पाळीव व उपयोगी पशुपक्षी आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी राज्यातून लोक खरेदी विक्रीसाठी येतात.
माणसाच्या हौशेला मोल नाही याची प्रचिती आपणास या यात्रेत आल्यावर होते. अत्यंत देखणे जातीवंत अश्व, देखण्या देवणी जातीचेच्या गायी व वळू, लालकंधारी गाई-वळू लाखो रुपयांमध्ये विकल्या व खरीदी केल्या जातात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. विलासरावजी देशमुख यांचे माधूरी नावाचे अश्व व माजी ऊपमुख्यमंञी कै. गोपीनाथ मुंडे यांचा शेरा नावाचा अश्व संपूर्ण यात्रेचं आर्कषण !
शेतकरी आणि प्राणी मालक अनेक वर्षे आपले पशुधन सांभाळतात, तयारी करतात आणि हौशेने ते जनावर इतरांना पहायला मिळावं आणि त्या पासून प्रेरणा घेऊन ईतरांनी पण आपले जनावर मग ते गाय वळू किंवा घोडा अश्याच प्रकारे तयार करावे म्हणुन अनेक लोक राहोटी टाकतात. यातच नांदेड मधील डोईफोडे परीवार पण आहे.
यात्रेच्या पुढील ५ दिवसात एक दिवस पशुप्रर्दशन, भव्य अश्या कुस्तीदंगल, शेतकऱ्यांसाठी शेतीमालाचे कृषीप्रर्दशन, लावणी महोत्सव, पारंपरिक लोककला महोत्सव व शेवटी बक्षीस वितरण असे भरगच्च कार्यक्रम आहेत. यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहे. आपल्या महाराष्ट्रात ईतक्या मोठ्या व भव्य प्रमाणात भरणाऱ्या या याञेविषयी माञ खूप कमी जणांना माहीती आहे. या यात्रेचं पुष्कर च्या यात्रेच्या धरतीवर योग्य नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन ऐवजी राज्यप्रशासनी पुढे येण आवश्यक आहे.
श्रीक्षेत्र माळेगावची यात्रा म्हणजे भटक्या व विमुक्तांची यात्रा आहे. महाराष्ट्रासह ईतर राज्यातील भटक्या जाती जमातींची जात पंचायत या यात्रेत घेण्यात येते. लोकांची पंचायत भरवून तंटे भांडण मिटवणारी ही याञा असल्याने माळेगावची वेगळी ओळख आहे.
ह्या वर्षीच्या यात्रेच्या आयोजनाचा फलक:
फोटो आणि शब्दांकन: नितीन जोशी
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.