Site icon InMarathi

या गोष्टी केल्यात, तर बॉसकडूनही होईल भरभरून कौतुक

rocketsingh im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखाद्या व्यक्तीने चांगले काम केले, की त्याच्याबद्दल आपल्या मनात आदरयुक्त भावना निर्माण होते. आपण ज्या काही कृती करत असतो त्यातून आपला त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन समोरच्याला कळतो आणि त्यानुसार तो ठरवतो आपल्याला आदर द्यायचा किंवा नाही.

मुळात आदर मागून मिळत नाही तर तो मिळवावाच लागतो – समोरच्याच्या मनात तो निर्माण करावा लागतो. अनेकांकडून आदर मिळाला की माणसाला प्रतिष्ठा मिळते. लोक त्याच्याशी उत्तम वागू लागतात. हाच आदर, हीच प्रतिष्ठा कामाच्या ठिकाणीही आपल्याला मिळावी असे प्रत्येकाला मनापासून वाटत असते.

काही अपवाद वगळता आपले सहकारी तर आपल्याशी चांगले वागतातच – परंतु आपल्याला खरी अपेक्षा असते ती बॉसने आदर देण्याची!

बॉस हा प्राणी आधीच आपल्यापेक्षा मोठ्या पदावर बसलेला – त्यामुळे तो लगेच खुश होऊन आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला आदर देईल असा विचार करणे चुकीचे!

जर तुम्हाला देखील तुमच्या बॉसकडून अजूनही आदरयुक्त भावनेने वागवले जात नसेल तर या पुढे सांगितलेल्या गोष्टीचा अवलंब करा. निदान त्या गोष्टींनी खुश होऊन तरी तुमचा बॉस तुम्हाला आदर देईल.

 

नियमित आणि अतिशय प्रभावीपणे संवाद साधा

जेव्हा कधीही तुमची बॉस बरोबर मिटिंग असेल तेव्हा आत्मविश्वासाने त्या चर्चेत भाग घ्या. छोट्यातल्या छोट्या शंकेचे बॉसकडून निराकरण करून घ्या.

ही गोष्ट बॉसला विचार करायला लावते की तुम्ही खरंच त्या ठराविक कामासाठी उत्सुक आहात. उत्तम आणि नियमित संवादामुळे तुम्ही बॉसच्या लक्षात राहता आणि त्यामुळे तो तुमच्याकडे आदराच्या नजरेने पाहतो.

 

कामाशी एकनिष्ठता

 

 

जर तुम्ही बॉसला सांगितले असेल की हे काम करण्यास मला अमुक दिवस लागतील, तर त्या अमुक दिवसाच्या आधीच कोणतीही चूक न करता ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

जर तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ राहिलात तर तुमच्या कामाच्या माध्यमातून ते तुमच्या बॉसच्या नजरेत येईल आणि उत्तम कर्मचारी म्हणून त्याच्या मनात तुमच्याविषयी आदर निर्माण होईल.

 

चुका टाळा

 

 

 

एकही चूक न करता काम पूर्ण होणे जवळ जवळ अशक्य आहे. परंतु चुकांतून माणूस शिकतो असेही  म्हटले जाते. त्यामुळे तुमच्या चुकांचा अभ्यास करा. झालेल्या चुका तुम्ही पुन्हा पुन्हा करून बॉसच्या मनात तुमच्या विषयी नकारात्मक भावना उत्पन्न होऊ देऊ नका.

बॉसची माफी मागण्याची सवय सोडून द्या आणि उत्तम कामगिरीसाठी त्याने तुम्हाला शाबासकी द्यावी यासाठी प्रयत्नशील राहा.

 

प्रत्येक गोष्टीमध्ये योगदान द्या

ऑफिसमध्ये लाजाळू बनून राहणे तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकते. कोणतीही गोष्ट असेल तर त्यात हिरहिरीने भाग घ्या, परंतु तुम्ही प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करत आहात असे इतरांना वाटू देऊ नका.

तुमच्या योगदानाचे सकारात्मक परिणाम दिसतील अश्या कृती करा, म्हणजे एकंदरीत बॉस तुमच्यावर खुश होईल.

 

नेहमी  उत्साही चेहरा ठेवा

ताण-तणावाखाली असलेला चेहरा घेऊन ऑफिसमध्ये वावरू नका, ज्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांच्या मनात तर तुमच्याविषयी नकारात्मक भावना तर निर्माण होतेच. सोबत तुमचा बॉस देखील तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नाही.

बॉसने दिलेली कोणतीही जबाबदारी हसत हसत स्वीकारा. तुमचा उत्साह बॉसच्या मनात तुमचे स्थान निर्माण करण्याची महत्त्वाची चावी आहे हे विसरू नका. ऑफिसमधील एक सक्रीय कर्मचारी म्हणून तुमच्या बॉसच्या मनात तुमची प्रतिमा उभी करा.

बॉसने आपल्याला आदर द्यावा हा विचार झटकून त्याचा आदर कमावता कसा येईल याचा विचार करा, यश तुमचेच आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version